Explained : केतन अग्रवाल प्रकरणात सियाच्या चुलत भावाचं कनेक्शन समोर, केतनला लोहगडावरून ढकलल्यानंतर मिसळपावावर ताव अन् बंगळुरुमध्ये धक्कादायक कृत्य...
केतन अग्रवाल प्रकरणात चार्जचीट दाखल करण्यात आल्यानंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात सिया गोयलच्या चुलत भावाचं कनेक्शन समोर आलंय.
पुण्यातील लोहगड किल्ल्यावरून धक्का देऊन केतन अग्रवालची हत्या करण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिच्या प्रियकर चेतन चौधरीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 5053 पानांची चार्जचीट दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितलं की, सियाने हत्येपूर्वी वापरलेला फोन सापडला आहे. सियाने हा फोन एका ड्रॉव्हरमध्ये ठेवला होता. या फोनमधून फॉरेन्सिक डिपार्टमेंटने अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत.
माही नावाचं अकाऊंट अन् चुलत भावाचं कनेक्शन
चार्जशीटमध्ये असाल उल्लेख करण्यात आला आहे की, सियाने चुलत भावाकडून इन्टाग्राम अकाऊंट घेतलं. याच अकाऊंटचे युझर आयडी आणि पासवर्ड बदलून माही ठेवण्यात आलं होतं. त्या अकाऊंटवर तिच्या एका मैत्रिणीचा फोटो तिच्या परवानगीने लावला होता. महत्त्वाचे म्हणजे चेतनकडे देखील या अकाऊंटचा अॅक्सेस होता.
पोलिसांना या तपासात अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे. तपासात असं समोर आलं की सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या कथित गुप्त विवाह केल्याच समोर आलं आहे. या दोघांनी राजस्थानमधील खाटूश्याम मंदिरात लग्न केल्याचं समोर आलं आहे. पण या प्रकरणात लग्नाची अधिकृत नोंद किंवा सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले नाही. पण दुसरीकडे सियाच्या भांगेत सिंदूर आणि चेतनच्या गळ्यात फुलांचा हार असलेला फोटो आरोपींच्याच मोबाईलमधून मिळाला आहे.
त्याने हत्येनंतर मिसळ खाल्ली
लोहगडावरून केतनची हत्या केल्यानंतर चेतन खाली उतरला आणि जुन्या पुणे - मुंबई महामार्गावरून परत जाताना तो एका हॉटेलमध्ये थांबला होता आणि त्याने मिसळ खाल्ली होती. हे सगळं सीसीटीव्हीमध्ये दिसून आलं आहे. याच सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपास पुढे गेला आहे. पोलिसांनी माहिती दिली की, चेतन आणि सियाने अनेक वेळा केतनला मारण्याचा प्रयत्न केला आहे. पण ते अपयशी ठरले होते. पण त्यादिवशी लोहगडावरील त्याचे कारस्थानला यश आलं आणि केतनचा मृत्यू झाला.
बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट अन्...
केतनला लोहगडवर आणण्यासाठी सियाने इन्स्टाग्रामवर एक फेक अकाऊंट तयार केलं होतं. हे अकाऊंट सियाने माही नावाने सुरु केले होते आणि ती तिच्या मैत्रिणीचे होते असं दाखवलं. याच अकाऊंटवरून केतनला मेसेज करुन लोहगडावर बोलवण्यात आलं होतं. १९ जूनला सियाचा वाढदिवस होता. तर १८ जूनला सियाला सरप्राईज म्हणून लोहगडवर ट्रेकिंगला घेऊन जा असा मेसेज या अकाऊंटवरून करण्यात आला होता. नंतर हे अकाऊंट डिलीट करण्यात आलं. पण सायबर पोलिसांनी फॉरेन्सिकने ते अकाऊंट रिकव्हर केले.
या गोष्टींचा शोध घेण्यात आला...
केतनची हत्या करण्यापूर्वी आणि केल्यानंतर सिया आणि चेतनने केल्यानंतर Google/YouTube सर्च हिस्टरी, व्हॉट्सॲप चॅट्स, आयक्लॉड डेटा आणि कॉल लॉग्स डिलीट करून पुरावे नष्ट केले होते. पण हेसगळं पण पोलिसांनी फॉरेन्सिकच्या मदतीने रिकव्हर करण्यात आलं. एवढंच नाही तर चेतनने आपले लोकेशन लपवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचा मोबाईलचा वापर केला होता, असं तपासात समोर आं आहे.