SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुणेरी मेट्रोचे उद्धाटन, मेट्रो-3 हिंजवडीचं ट्रॅफिक कसं कमी करेल?, तिकिटाचे दर किती? वाचा A TO Z माहिती

हिंजवडी मेट्रो चार नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. मेट्रोच्या पिंक लाईनवर संपूर्ण ट्रेन ऑपरेशन महिला चालकांच्या हाती असणार आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 03, 2026, 01:24 PM IST | Updated: Nov 03, 2026, 01:28 PM IST
Image Credit: Hinjewadi Shivajinagar Metro fares 17 Stations From November 4 check timetable
Join

माण–हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे मेट्रो लाईन-3 मार्गिकेचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने लोकार्पण झाले. 4 नोव्हेंबरपासून सकाळी 6 वाजल्यापासून 17 स्थानके प्रवाशांसाठी खुली होणार असून, गर्दीच्या वेळेत दर सहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. पुण्याची ही मेट्रो हिंजवडी आयटी पार्कची वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी करणार असून या मेट्रोतून 14 हजार लोक प्रवास करतील अशी शक्यता आहे.

पुणे मेट्रोची मार्गिका 3 याला पिंक लाइन मार्ग नाव देण्यात आलं आहे. तसंच, पुणे आयटी सिटी मेट्रो म्हणूनही ओळख मिळणार आहे. हिंजवडीत आयटी पार्कमुळं मोठी वाहतूक कोंडी होते. पुणेकरांना तासनतास या वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत होते. मात्र या मेट्रोमुळं ही वाहतूक कोंडी फोडण्यास मदत होणार आहे.

हिंजवडी आयटी पार्क हे काही दिवसांपूर्वी चर्चेत आले होते. आयटी पार्कमध्ये कार्यरत असणारे अनेक कर्मचारी स्वतःची कार किंवा दुचाकी वापरतात. त्यामुळं येथील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. शिवाजीनगर ते हिंजवडी हे अंतर पार करण्यासाठी सध्या रस्त्याने पीक अवर्समध्ये 1 ते दीड तास लागतो. मात्र मेट्रोमुळं हे अतंर फक्त अर्धा ते पाऊण तासांत पार करता येणार आहे.

मेट्रो स्थानकांवरून आयटी कंपन्यांपर्यंत पोहोचण्यासाठी फीडर बस सेवा, ई-सायकल आणि शेअरिंग रिक्षांचे नियोजन केले जात आहे. यामुळे प्रवाशांना मेट्रोतून उतरून कंपनीत जाणे सोपे होईल आणि मुख्य रस्त्यांवर गर्दी होणार नाही, अशी माहितीही समोर येत आहे.

मेट्रो 3 मार्गिका शिवाजीनगर आणि दिवाणी न्यायालय (Civil Court) इंटरचेंज स्टेशनला जोडली जाईल. त्यामुळे पिंपरी-चिंचवड (PCMC), वनाझ, किंवा रामवाडीहून येणारे प्रवासी थेट मेट्रो बदलून हिंजवडीला जाऊ शकतील. यामुळे संपूर्ण पुण्यातून हिंजवडीकडे जाणाऱ्या खाजगी वाहनांचा ताण कमी होईल.

मेट्रो मार्गिका 3 ही बुधवार 4 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या मेट्रोतून जिल्हा न्यायालय ते हिंजवडी फेज 3 पर्यंत प्रवास करण्यासाठी 62 रुपये मोजावे लागणार आहेत. पहिल्या टप्प्यात केवळ 17 स्थानकांवर मेट्रो थांबणार असून, तर उर्वरित सहा स्थानके जानेवारीत सुरू होण्याची शक्यता आहे. शिवाजीनगर, बाणेर, बालेवाडी फाटा, बाणेर गाव, बाणेर-पाषाण लिंक रोड आणि भोसलेनगर ही स्थानके सध्या बंद आहेत.

तिकीट दर असे आहेत...

0-2 किमी 12 रुपये
2-4 किमी 25 रुपये
4-8 किमी 37 रुपये
8-12 किमी 45 रुपये
12-18 किमी 49 रुपये
18 किमीच्या पुढे 45 रुपये

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES