SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'मी विश्वास नांगरे पाटलांचा पीए बोलतोय', पुण्यातील महिला डॉक्टरला अश्लील मेसेज अन् अटकेची भीती दाखवून...काय नेमकं प्रकरण?

वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा पीए असल्याची बातवणी करत पुण्यातील डॉक्टर महिलेला तीन लाखांचा गंडा घालण्यात आला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 20, 2026, 19:42 IST | Updated: Nov 20, 2026, 20:02 IST
Image Credit: Vishwas Nangare Patil PA
Join

नागपूर शहर पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर करत एका व्यक्तीने पुण्यातील महिलेची आर्थिक फसवणूक केली आहे. मी वरिष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा पीए असं सांगून पुण्यातील या डॉक्टर महिलेल तीन लाखांचा चुना लावण्यात आला. 43 वर्षीय महिला डॉक्टरचं नाव नेहा पेळपकर असं आहे.

नेमकं काय घडलं?

या व्यक्तीने या महिला डॉक्टरला भीती दाखवली की, आम्ही विश्वास नांगरे पाटलांचे पीए आहे,  तुमच्या आधार कार्ड आणि बँक खात्यातून दहशतवाद्यांना फंडिंग झाले आहे यामध्ये तुम्हाला अटक होईल. जर तुम्हाला यात फसायचं नसेल तर तीन लाख बँकेत ट्रान्सफर कर. त्यानंतर या महिलेने हे पैसे ट्रान्सफर केल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे.

याप्रकरणी मोबाईल धारक आणि लाभार्थी बँक खातेधारकाच्या विरोधात सिंहगड पोलिसात गुन्हे दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितलं की, महिलेने तक्रारमध्ये नमूद केलंय 22 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 22 ऑक्टोबरला या महिलेला एका अनोळखी नंबरवरून मोबाईलवर फोन आला. मी उचल्यावर तो व्यक्ती म्हणाली, मी सायबर सेल ऑफ इंडियामधून चौधरी बोलतोय आणि विश्वास नांगरे पाटील सरांचा पीए आहे. त्यानंतर परत एका अनोळखी नंबरवरून फोन आला. हा मोबाईल नंबर पहिला नंबर नव्हता. या फोनवर असलेला व्यक्ती म्हणाला की, मुंबई क्राईम ब्रँचचे वरिष्ठ अधिकारी आहे. ते म्हणाले की, तुमचे आधार कार्ड एका संशयास्पद नंबरला लिंक आहे. यातून तुम्ही अवैध जाहिरातबाजी आणि अश्लील मेसेज पाठवून पैसे कमवत आहात असं समोर आलं आहे. तुमचे नाव मनी लाँड्रिंग आणि टेरर फंडिंगच्या गुन्ह्यात समोर आलं आहे.

हेसुद्धा वाचा -  लग्नाचे आमिष, 14 तरुणींसोबत शारीरिक संबंध अन् प्रायव्हेट व्हिडीओ...त्या सराईत आरोपीला भारतात आणण्यात CBI ला मोठं यश

आता जर तुम्हाला अटक टाळायची असेल तर आम्ही सांगू त्या बँक अकाऊंटमध्ये 3 लाख रुपये ट्रान्सफर करा. अटकेच्या भीतीने महिलेने 3 लाख रुपये ट्रान्सफर केले. वरिष्ठ पोलिसांच्या नावाचा डिजिटल अरेस्टची पहिलीच वेळ नाहीय. तर विश्वास नांगरे पाटील यांचा फोटो आणि आवाजाची नक्कल करत दोन भामट्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे  यापूर्वीही 1 कोटी 4 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली होती. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES