• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /IND vs NEP : तिलक-कुशाग्रसमोर नेपाळचे फलंदाज हतबल! नेपाळसमोर 333 धावांचे लक्ष्य

IND vs NEP : तिलक-कुशाग्रसमोर नेपाळचे फलंदाज हतबल! नेपाळसमोर 333 धावांचे लक्ष्य

इमर्जिंग आशिया कप 2026 च्या मोहिमेला भारताच्या संघाने आजपासून सुरुवात केली, संघाचा कर्णधार तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्रने शतके झळकावली. या सामन्यामध्ये भारतीय संघाची कामगिरी कशी राहिली यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 20, 2026, 18:51 IST|Updated: Nov 20, 2026, 19:30 IST
joinshare
IND vs NEP : तिलक-कुशाग्रसमोर नेपाळचे फलंदाज हतबल! नेपाळसमोर 333 धावांचे लक्ष्य

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
'माझ्याशी लग्न कर,' इन्फ्लुएनसर तरुणीच्या घरात घुसला तरुण; नंतर रुममध्येच...; धक्कादायक घटना; पोलीस आले तेव्हा जखमी अवस्थेत...

'माझ्याशी लग्न कर,' इन्फ्लुएनसर तरुणीच्या घरात घुसला तरुण; नंतर रुममध्येच...; धक्कादायक घटना; पोलीस आले तेव्हा जखमी अवस्थेत...

2

IND vs NEP : तिलक-कुशाग्रसमोर नेपाळचे फलंदाज हतबल! नेपाळसमोर 333 धावांचे लक्ष्य

3

'अशोक खरातने मला ओश्नो जल आणि चिंचोके दिले अन् पूजा...', अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा मोठा खुलासा, 'राजकीय सल्लाही...'

4

चंद्रपूरमध्ये बालसुधारगृहातील धक्कादायक घटना! मुलींनी काच फोडली नंतर सुरक्षारक्षकाला धमकावलं अन्...; रात्री एकच खळबळ, सर्वच्या सर्व 6 मुली...

5

4,4,4,4,4,4,4,4,4,6,6... कुशाग्र-तिलकची खेळी भारतासाठी वरदान! टी20 चे स्टार नेपाळविरुद्ध फेल

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भारत विरुद्ध नेपाळ यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यामध्ये भारताच्या संघाने पहिले तीन विकेट्स गमावल्यानंतर तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांनी संघासाठी कमालीची कामगिरी केली. भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करत पहिल्या डावामध्ये  तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांच्या खेळीमुळे नेपाळचा संघ मैदानावर पूर्णपणे दोन्ही फलंदाजांसमोर हतबल पाहायला मिळाला. कुमार कुशाग्र आणि संघाचा कर्णधार तिलक वर्मा यांच्या खेळीसमोर नेपाळचा संघाने गुडघे टेकले होते. भारताचा संघ या सामन्यामध्ये विजय मिळवण्याच्या इराद्यामध्ये आहे. ज्याप्रकारे भारतीय संघाची फलंदाजी पाहायला मिळाली, त्याचबरोबर टीम इंडियामध्ये हर्षित राणा, प्रिन्स यादवसारखे गोलंदाज संघामध्ये आहेत. पहिल्या डावामध्ये संघाने कशी कामगिरी केली यासंदर्भात सविस्तर वाचा. 

कुमार कुशाग्रचे शतक

भारत अ संघाचा स्टार फलंदाज कुमार कुशाग्रने आज त्याची शैली दाखवली आणि संघासाठी मोठी खेळी कठीण काळामध्ये खेळली. कुमार कुशाग्रने आजच्या सामन्यामध्ये 102 चेंडूमध्ये 112 धावा केल्या, यामध्ये त्याने 5 षटकार आणि 10 चौकार मारले. कुमार कुशाग्रने संघासाठी 93 चेंडूमध्ये शतक झळकावले, त्याच्या या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

हे ही वाचा

आर्यवीरची आयपीएलमध्ये होणार एंट्री! वीरेंद्र सेहवागने स्वत: केला खुलासा

तिलक वर्माने ठोकले नेपाळविरुद्ध शतक

भारत अ संघाचा कर्णधार तिलक वर्मा देखील आजच्या सामन्यामध्ये कमालीच्या फॅार्ममध्ये पाहायला मिळाला. तिलक वर्माने नेपाळविरुद्ध शतक झळकावले, त्याने आजच्या सामन्यामध्ये 113 चेंडूमध्ये 107 धावा केल्या. यामध्ये त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्या या कामगिरीमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाचे योगदान मिळाले. 

भारताचे सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी दोन्ही फलंदाज पूर्णपणे फेल झाले. अभिषेक शर्माने संघासाठी 13 चेंडूमध्ये 9 धावा केल्या. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Team india
Cricket News