SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुण्यात धक्कादायक घटना! महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये मोठे रॅकेट उघड, 11 कंत्राटी डॉक्टरांकडून...नेमकं काय घडलं?

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी देणार असं सांगून 11 कंत्राटी डॉक्टरांची आर्थिक फसवणूक झाली आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 21, 2026, 19:56 IST | Updated: Nov 21, 2026, 20:41 IST
Image Credit: Job scam at Pune Municipal
Join

बीड जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राला हादरवणाऱ्या बातमीनंतर आता वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून 11 कंत्राटी डॉक्टरांना गंडवण्यात आलंय. या 11 कंत्राटी डॉक्टरांकडून नोकरी देण्यासाठी प्रत्येकाकडून 10 लाख घेण्यात आले. या घटनेमुळे पुण्यामध्ये खळबळ माजली आहे.

धक्कादायक म्हणजे तक्रारदार डॉक्टरांनी आरोप केलाय की, या नोकरीसाठी तीन डॉक्टरच एजंट म्हणून काम करतात. ही घटना तेव्हा उघड झाली तेव्हा या डॉक्टरांनी पैसा दिला, पण नोकरी मिळाली नाही. एवढंच नाहीतर त्यांना पैसेही परत देण्यात आले नाही. त्यामुळे या 11 पीडित डॉक्टरांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करून पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमधील या रॅकेटचा भांडाफोड केला. या तक्रारीनंतर डॉ. नानासाहेब भांगरे, डॉ. इरफान मुल्ला आणि डॉ. हेमंत वैद्य यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

 

हेसुद्धा वाचा -  मोठी बातमी! महाराष्ट्रातील 73 शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरीवरून काढलं, शैक्षणिक वर्तुळात खळबळ

 

नोकर भरती रॅकेटचा भांडाफोड

एमडी आणि एमएस शिक्षण घेतलेल्या 28 डॉक्टरांना अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये कायमस्वरूपी निवड कऱण्यात येणार आहे. त्यामुळे याच गोष्टीचा फायदा घेत कंत्राटी डॉक्टरांकडून प्रत्येकी 10 लाख उकळण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे पुणे महापालिकेने अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज चार वर्षांपूर्वीच सुरू केलं आहे. दरम्यान पीडित डॉक्टरांनी या घटनेची माहिती सगळ्यात पहिले कॉलेजच्या ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या महापौरांकडे तक्रार केली. त्यानंतर तिथून काही मदत न मिळाल्यामुळे या डॉक्टरांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES