• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /शरद पवार गटाचे आमदार शिंदेंच्या गळाला? थेट मंत्री पदाची ऑफर

शरद पवार गटाचे आमदार शिंदेंच्या गळाला? थेट मंत्री पदाची ऑफर

एकीकडे 2 राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाची चर्चा तर दुसरीकडे शरद पवार गटातील आमदारांच्या शिंदेंसोबतच्या वाढत्या भेटीगाठी. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चेपेक्षाही आता आमदारांच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 21, 2026, 23:26 IST|Updated: Nov 21, 2026, 23:30 IST
joinshare
शरद पवार गटाचे आमदार शिंदेंच्या गळाला?  थेट मंत्री पदाची ऑफर

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

2

मुंबईत मॅनहोलच्या एका झाकणासाठी 25 हजार रुपये! चोरी रोखण्यासाठी BMC आणणार नवी यंत्रणा!

3

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

4

रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स

5

सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर PM मोदींची पुन्हा मोठी भविष्यवाणी, पुढील 20 वर्षांचं सांगितलं भाकीत

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Maharashtra Politics : दोन राष्ट्रावादींच्या विलिनीकरणाची चर्चा रंगतेय. मात्र या चर्चेच्या पलीकडे राज्याच्या राजकारणात आणखी एक नवी समीकरणं आकाराला येतायत का? शरद पवार गटाचे आमदार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाढती जवळीक सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यातच आमदार अभिजीत पाटील यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून थेट मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली. त्यामुळे ही केवळ विकासकामांसाठीची जवळीक आहे की 2029 ची राजकीय पेरणी?

राजकारणात भेटीगाठी कधीच साध्या नसतात. कधी त्या विकासाचा मार्ग मोकळा करतात. तर कधी नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरतात. सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही असंच काहीसं घडतंय का? कारण एकीकडे 2 राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचं चित्र दिसत आहे. 

या चर्चेला निमित्त ठरला एकनाथ शिंदेंचा पंढरपूर दौरा. कार्तिकी यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शिंदे पंढरपुरात दाखल झाले आणि त्यांच्या दौऱ्यात शरद पवार गटाच्या 3 आमदारांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. माढ्याचे आमदार अभिजीत पाटील,  मोहोळचे आमदार राजू खरे आणि माळशिरसचे आमदार उत्तम जानकर विशेष म्हणजे आमदार अभिजीत पाटील यांनी एकनाथ शिंदेंना चक्क बुलेटवर बसवून पंढरपूरचा पाहणी दौरा घडवला. राजू खरेही संपूर्ण दौऱ्यात शिंदेंसोबत दिसले. तर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर उत्तम जानकर यांनी शिंदेंसोबत वाहनातून प्रवास केला.

एवढंच नाही... कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी शिंदे पुन्हा पंढरपुरात आले. तेव्हाही अभिजीत पाटील आणि राजू खरे त्यांच्यासोबत उपस्थित होते. पुण्यातील वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे यांनीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात शिंदेंची भेट घेतली.

या भेटीगाठी केवळ प्रोटोकॉलपुरत्या आहेत? की त्यामागे भविष्यातील राजकीय गणितं आहेत? या चर्चेला आणखी हवा मिळाली ती मंत्रिपदाच्या ऑफरमुळे. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावलेंनी आमदार अभिजीत पाटलांना थेट मंत्रिपदाची ऑफर दिली. त्यामुळे शिंदे गटाकडून शरद पवार गटाच्या आमदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतोय. मात्र अभिजीत पाटील यांनी या भेटीमागचं राजकीय गणित फेटाळले.  प्रोटोकॉलनुसार एकनाथ शिंदेंची भेट घेतली. आणि त्यांचं स्वागत केलं असं ते म्हणाले

शरद पवारांचा आमदार शिंदेंच्या गळाला?

दुसरीकडे शरद पवार गटाच्या आमदारांसमोर विकासकामांसाठी निधी मिळवण्याचं आव्हानही आहे. सत्ताधारी नेत्यांशी जवळीक. मतदारसंघातील विकासकामं आणि आगामी निवडणुकांची तयारी... या सगळ्याचा विचार करता राजकीय पर्यायांची चाचपणी सुरू आहे का? हा प्रश्नही आता चर्चेत आला.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
Marathi News