SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'भाकरी नीट केली नाही म्हणून...'; पायल झांबरे मृत्यू प्रकरणात कोर्टात धक्कादायक खुलासे, 'आम्ही श्रीमंत आहोत, त्यामुळे...'

पुण्याच्या शिवाजीनगर कोर्टात पायलच्या सासू - सासऱ्यांना हजर करण्यात आलं त्यावेळी धक्कादायक खुलासे झाले आहेत.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 05, 2026, 09:21 AM IST | Updated: Nov 05, 2026, 09:24 AM IST
Image Credit: Payal Pawar Zhambre
Join

पुण्यातील पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात तिचा नवरा अक्षय झांबरेला अटक केल्यानंतर सासू - सासऱ्यालाही अटक करण्यात आली आहे. अक्षयला शिवाजीनगर कोर्टात हजर केलं असता त्याला 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर सासू सासऱ्यालाही शिवाजीनगर कोर्टात 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अरविंद झांबरे (सासरा) आणि मंगल झांबरे (सासू) असं त्यांचं नाव असून त्यांच्या वकिलांनी धक्कादायक युक्तीवाद केला आहे. शिवाजीनगर कोर्टात सुनावणीदरम्यान काय खुलासे झाले याबद्दल पालयचे वकील पुष्कर पाटील यांनी माहिती दिली आहे.

पायल झांबरे प्रकरणाची सुनावणीत काय झालं?


पायल झांबरेच्या सासू - सासऱ्याला कोर्टात हजर केल्यावर दोन्ही पक्षाकडून युक्तीवाद करण्यात आला. त्यात पायलचे वकील पुष्कर पाटील यांनी सांगितलं की, आरोपीच्या वकिलांकडून असं म्हणणं होतं जे त्यांनी न्यायालयासमोर मांडलं भाकरी नीट केली नाही यावरून सासू - सुनेचा वाद झाला म्हणून या कारणाने त्यांनी आत्महत्या केली. त्यावर आम्ही असा युक्तीवाद केला की, जेव्हा एखादी स्त्री मुलाला जन्म देते तो त्रास भाकरी करण्यापेक्षा जास्त कठीण असतो.

'ते खूप श्रीमंत लोक आहेत...'

पुढे आरोपीच्या वकिलाने सांगितलं की, ते खूप श्रीमंत लोक आहेत आणि श्रीमंत लोक असं करत नाहीत. त्यावर आम्ही युक्तीवाद केला की, ते श्रीमंत आहेत म्हणून असं करतील असं कोणी लायसन्स दिलं नाहीय, असं करण्याचं. या प्रकरणाची सखोल चौकशी आणि तपास होणे गरजेचे आहे.

हेसुद्धा वाचा -  बेदम मारहाण, आदल्या रात्रीच मेसेज केला अन्..., पायल झांबरे मृत्यू प्रकरणात भावाचा मोठा खुलासा! नेमकं काय घडलं?

सासू जबाबदार आहे!


महत्त्वाचे म्हणजे सासू - सासऱ्याला दुपारी दीड वाजता अटक झाली. त्यानंतर त्यांना कोर्टात पाच वाजता हजर करण्यात आलं. त्यामुळे पोलिसांना चौकशी करायला पूरेसा वेळ मिळाला नाही. त्यासोबत त्यांचे मोबाईल जप्त झालेले नाही. त्या ठिकाणाचे सीसीटीव्ही जप्त करण्यात आलेले नाही. मुळात पाहता चार भिंतीमध्ये नेमकं त्या दिवशी काय झालं याचा तपास करण्यासाठी जास्त जास्त पोलीस कोठडीची त्यांना गरज आहे. दरम्यान नणंद अजून अटक झाली नाही आहे. आम्हाला पोलिसांवर आणि न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.

त्यासोबत महत्त्वाचे म्हणजे पायलने तिचा भाऊ ऋषिकेशला मेसेज केला होता की, सासू जबाबदार आहे. त्यामुळे त्या अनुषंगाने कोर्टाने पायलचा नवरा अक्षयसह सासू सासऱ्याला 7 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES