SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

कचऱ्याच्या पोत्यात आढळले दोन पाय;सिमकार्ड कव्हरने उघडलं हत्येचं गूढ; 12 तासांत पोलिसांनी कशी केली आरोपीला अटक?

पिंपरी-चिंचवडच्या पिंपळे गुरवमध्ये अनिल खाडे यांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. पोत्यातील सिमकार्ड कव्हरमुळे सांगवी पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आलंय.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 07, 2026, 04:26 PM IST | Updated: Nov 07, 2026, 05:06 PM IST
Image Credit: पिंपरी क्राइम
Join

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात शुक्रवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. काटेपुरम चौक ते रामकृष्ण मंगल कार्यालयादरम्यान श्रीनगर गल्ली क्रमांक तीन येथे कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका पोत्यावर रक्ताचे डाग दिसले. सुरुवातीला त्यांना पोत्यात प्राण्याचे अवशेष असल्याचा संशय आला. पण पुढचा प्रकार पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकरील. कर्मचाऱ्यांनी पोते उघडून पाहिले आणि त्यात गुडघ्यापासून वेगळे केलेले पुरुषाचे दोन पाय  दिसले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया

मृताची ओळख पटली

घटनास्थळी दाखल झालेल्या सांगवी पोलिसांनी तपास सुरू केला. पोत्यामध्ये पोलिसांना एक सिमकार्डचे कव्हर आढळले. त्यावरील मोबाइल क्रमांकाच्या आधारे तपासाची दिशा मिळाली. पोलिसांनी संबंधित क्रमांकाचा माग काढत मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यातून मृताची ओळख अनिल खाडे नावाने पटली. त्यांचे वय 50 वर्षे होते. त्यानंतर अनिल यांचे मित्र आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची चौकशी सुरू करण्यात आली.

सिमकार्ड कव्हरमुळे उलगडा

पोलिसांनी आजुबाजूच्या परिसरात चौकशी सुरु केली. जवळचे नातेवाईक, शेजारी यांच्याकडे चौकशी केली असता अनिल खाडे यांचा विष्णू उर्फ पिंट्या कुंभार याच्याशी जवळचा संपर्क असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी विष्णूचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांचे पथक त्याच्या घरी पोहोचले. घराची पाहणी केली असता तेथे अनिल खाडे यांचा उर्वरित मृतदेह आढळला. पोत्यातील सिमकार्ड कव्हरपासून सुरू झालेला तपास अखेर संशयिताच्या घरापर्यंत पोहोचला. या एका महत्त्वाच्या पुराव्यामुळे पोलिसांना हत्येचा उलगडा करण्यात मदत झाली.

दारू पिण्यावरून वाद

अनिल खाडे आणि विष्णू कुंभार हे मित्र होते. दोघांमध्ये मद्यपान करताना वाद झाला. या वादातून विष्णूने अनिल यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही माहिती समोर आली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे तुकडे करून दोन्ही पाय पोत्यात भरून कचऱ्यात टाकल्याचे तपासात समोर आले आहे.

सांगवी पोलिसांची 12 तासांत कारवाई

या गंभीर गुन्ह्याचा तपास सांगवी पोलिसांनी वेगाने केला. पोत्यात सापडलेले सिमकार्ड कव्हर, मोबाइल क्रमांक आणि मित्रांकडून मिळालेली माहिती या धाग्यांच्या आधारे पोलिसांनी विष्णू तानाजी कुंभार याला अटक केली. अवघ्या 12 तासांत आरोपीपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. पोलीस उपायुक्त संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त मनीषा कदम आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू असून या हत्याकांडामागील सर्व बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.

ZEENEWS TRENDING STORIES