• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /हिवाळ्यात शरीर हायड्रेटेड कसं ठेवायचं? बाबा रामदेवांनी दिल्या खास टिप्स

हिवाळ्यात शरीर हायड्रेटेड कसं ठेवायचं? बाबा रामदेवांनी दिल्या खास टिप्स

हिवाळ्यामध्ये फक्त पाणी प्यायल्यानेच त्वचा हायड्रेटेड राहत नाही असे योगगुरु बाबा रामदेव यांचे मत आहे. आपली त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी काय करावे यासंदर्भात सविस्तर वाचा.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 07, 2026, 04:54 PM IST|Updated: Nov 07, 2026, 05:27 PM IST
joinshare
हिवाळ्यात शरीर हायड्रेटेड कसं ठेवायचं? बाबा रामदेवांनी दिल्या खास टिप्स

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
हिवाळ्यात शरीर हायड्रेटेड कसं ठेवायचं? बाबा रामदेवांनी दिल्या खास टिप्स

हिवाळ्यात शरीर हायड्रेटेड कसं ठेवायचं? बाबा रामदेवांनी दिल्या खास टिप्स

2

कचऱ्याच्या पोत्यात आढळले दोन पाय;सिमकार्ड कव्हरने उघडलं हत्येचं गूढ; 12 तासांत पोलिसांनी कशी केली आरोपीला अटक?

3

₹18000 पगारात सिक्योरीटी गार्ड कसं चालवतो घर? खर्च आणि सेव्हिंग ऐकून म्हणाल, 'हे आम्हालापण शक्य'

4

तुम्हाला परफेक्ट Diwali Portrait पाहिजे? हे काही ChatGPT आणि Gemini प्रॉम्प्ट्स वापरा, तुमचे फोटो ठरतील बेस्ट

5

'गेल्या 12 वर्षांच्या नुकसानीची भरपाई...', 2004 साली पंतप्रधानपद..'; सोनिया गांधींचा गौप्यस्फोट

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

थोडी थोडी थंडी वाजायला लागली आहे यावेळी मग आपण कधीतरी चुकून थंड पाणी वैगरे प्यायले तर मग आपल्याला सर्दी होऊ शकते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये आपल्याला भरपूर तहान लागते म्हणून आपण जास्त पाणी पितो. पण हिवाळ्यामध्ये लोक कमी पाणी पिऊ लागतात, त्यामुळे देखील तुम्हाला डीहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. अनेकांचा असाही विश्वास आहे की फक्त पाणी पिल्यामुळे त्यांची त्वचा हायड्रेटेड राहते पण हे कितपत खरे आहे? हिवाळ्यामध्ये फक्त पाणी प्यायल्यानेच त्वचा हायड्रेटेड राहत नाही असे योगगुरु बाबा रामदेव यांचे मत आहे. आपली त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी काय करावे यासंदर्भात सविस्तर वाचा.

योगगुरु बाबा रामदेव यांनी सांगितले आहे की, अनेकजण हे गरजेपेक्षा जास्त लोक पाणी पितात, पण एखाद्या गोष्टीचे अतिरेक सेवन करणे हे देखील वाईट आहे. आपण जर पाणी, तूप आणि दूध यांचे अतिरेक सेवन केले तर हे आपल्या शरीरासाठी हानिकारक असते. जास्त पाणी प्यायल्याने सूज आणि जळजळ होऊ शकते, तसेच शरीरात पाणी साठू शकते. त्यामुळे, जास्त पाणी पिणे टाळणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर, बरेच लोक खूप कमी पाणी पितात. खूप कमी पाणी पिणे देखील धोकादायक ठरू शकते.

हे ही वाचा

हाय कोलेस्टेरॉलची ही लक्षणं दिसताच व्हा सतर्क; दुर्लक्ष पडू शकतं महागात

हिवाळ्यामध्ये लोक कमी पामी पितात त्यामुळे रामदेव बाबांचे म्हणणे आहे की, या ऋतूतही पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. उन्हाळ्यामध्ये लोक हळद, आले , मध आणि केशर घालून पाणी पिण्याचा सल्ला रामदेव बाबा देतात त्यामुळे त्याचा फायदा शरीराला होता. तर हिवाळ्यामध्ये केवळ पाणीच पिल्याने शरीर हायड्रेटेड होते अस नाही.  तर गाजराचा रस, डाळिंबाचा रस, बीटचा रस किंवा आवळ्याचा रसही प्यावा. ताकही पिऊ शकता. यामुळे शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही.

शरीरामध्ये पाण्याची कमतरता आणि हीटरच्या वापरामुळे शरीरामधील त्वचा ही हिवाळ्यामध्ये कोरडी पडू शकते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये बदामाचे तेल किंवा गाईचे तूप लावले तर ते फायदेशीर आहे. तूप किंवा तेल लावल्याने पाण्याची कमतरता कमी होण्यास मदत होते. त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि कोरडेपणा दूर करण्यासाठी कोरफडीचा रस सेवन केला जाऊ शकतो. 

अस्वीकरण – ही बातमी केवळ सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी, तज्ञांचा सल्ला घ्या किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Lifestyle News
Health News