सोनिया गांधींनी भाजप-आरएसएसवर जोरदार हल्लाबोल केलाय. गेल्या 12 वर्षांत देशाच्या लोकशाहीचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधींनी हे आरोप केले. गेल्या 12 वर्षांत देशाची लोकशाही, घटनात्मक संस्था आणि सामाजिक सलोख्याला मोठा फटका बसल्याचे वक्तव्य सोनिया गांधी यांनी केले. सध्याचे सरकार सत्तेतून गेल्यानंतरही देशाची व्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील, असेही त्या म्हणाल्या.
देशातील लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांचे रक्षण करणे ही मोठी जबाबदारी असल्याचे मत सोनिया गांधींनी व्यक्त केले. 2004 मध्ये पंतप्रधानपद स्वीकारले नाही, या निर्णयाबद्दल आजही कोणतीही खंत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आत्मचरित्राच्या प्रकाशनापूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत सोनिया गांधी यांनी राजकीय आणि वैयक्तिक आयुष्याविषयी भूमिका मांडली.
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. गेल्या 12 वर्षांत देशाच्या लोकशाहीचे, घटनात्मक संस्थांचे आणि सामाजिक रचनेचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आपल्या आगामी आत्मचरित्राच्या प्रकाशनापूर्वी एका वृत्तपत्राला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी देशातील राजकीय परिस्थितीवर परखड भाष्य केले.सरकार बदलल्यानंतरही देशाची व्यवस्था पूर्वपदावर आणण्याचे आव्हान असेल, असेही त्यांनी सांगितले.
गेल्या 12 वर्षांत झालेल्या नुकसानीची भरपाई करणे सोपे नसेल. सध्याचे सरकार सत्तेतून गेल्यानंतरही देशातील लोकशाही संस्था आणि व्यवस्था पुन्हा सुदृढ करण्यासाठी वेळ लागेल. त्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीशी काँग्रेसने कधीही तडजोड केलेली नाही आणि भविष्यातही करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सोनिया गांधी यांनी मांडली. देशातील धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि सामाजिक सलोखा टिकवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
2004 मध्ये यूपीएला सत्ता मिळाल्यानंतर पंतप्रधानपद स्वीकारण्याची संधी होती. मात्र, आपण तो निर्णय घेतला नाही. त्या निर्णयाबद्दल आजही कोणतीही खंत नसल्याचे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले.
1975 ते 1977 या आणीबाणीच्या काळाबाबतही सोनिया गांधींनी भाष्य केले. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा महत्त्वाचा आणि वादग्रस्त कालखंड असल्याचे त्यांनी नमूद केले.
सोनिया गांधी यांच्या बिलॉंगिंग- अ जर्नी ऑफ लव्ह या आत्मचरित्राचे 10 नोव्हेंबर 2026 रोजी प्रकाशन होणार आहे. इटलीतील बालपण, राजीव गांधी यांच्याशी झालेली प्रेमकहाणी, भारतात आगमन, गांधी कुटुंबाशी जुळलेले नाते आणि भारतीय राजकारणातील प्रवास यांचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, या मुलाखतीत सोनिया गांधी यांनी केवळ राजकीय परिस्थितीवरच नव्हे, तर भारताशी निर्माण झालेल्या भावनिक नात्यावरही भाष्य केले आहे. त्यामुळे हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर देशाच्या राजकारणात कशी खळबळ होईल? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.