SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

संभाजीनगरमधून लंडनमध्ये MBA साठी गेली, पण मृतदेह सापडला पिंपरीतील आलिशान फ्लॅटमध्ये; 23 ऑक्टोबरला शेवटचा कॉल अन्...

संभाजीनगरची 34 वर्षीय मुग्धा जुलै 2025 मध्ये MBA करण्यासाठी लंडनला गेली. पण 28 ऑक्टोबरला तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पिंपरीतील आलिशान फ्लॅटमध्ये आढळला.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 31, 2026, 03:39 PM IST | Updated: Oct 31, 2026, 03:42 PM IST
Image Credit: pimpr chinchwad Crime News
Join

पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  गहुंजे येथील ‘लोढा बेलमोंडो’ बिल्डिंगमध्ये एका तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. मुग्धा अविनाश देशमुख नाव असून या प्रकरणात एक ट्विस्टदेखील आहे. मुग्धा ही संभाजीनगरमधील रहिवाशी होती. मुग्धाने पुढील शिक्षणासाठी पुणे गाठवलं. तिथे तिने COEP महाविद्यालयातून पदवी घेतली. मग जुलै 2025 मध्ये MBA करण्यासाठी ती लंडनला गेली. आई -वडीलही यामुळे आनंदी होते.

मुग्धाचे आई - वडील हे संभाजीनगरमध्ये राहतात. मुग्धा ही त्यांची मोठी मुलगी होती. मुग्धाशिवाय त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुग्धाचे वडिलांचं नाव अविनाश देशमुख असून ते शासकीय सेवेतून शहर अभियंता पदावरून निवृत्त झाले आहेत. लंडनला गेली लेक आई वडिलांनी रोज फोन करत होती. अगदी अनेक वेळा व्हिडीओ कॉलही करत होती. मग ती पिंपरी - चिंचवडमध्ये कशी पोहोचली, ती भारतात कशी आली असे अनेक प्रश्न आई - वडिलांना पडले आहेत. 23 ऑक्टोबरला शेवटचा फोन नंतर त्यांना मुलीचा मृतदेह दिसल्यामुळे त्यांच्या आयुष्यात वादळ आलं आहे.

23 ऑक्टोबरला शेवटचा फोन झाला तेव्हा मुग्धा घाई होती, मला जॉब इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे असं सांगितलं, अशी माहिती आईने पोलिसांनी दिली आहे. दुसऱ्या दिवशी आई, वडील, भाऊ, बहीण अगदी नातेवाईकांपासून फ्रेंड्स सगळ्यांनी मुग्धाला फोन लावला पण तिने उचलला नाही. काही वेळा तिचा फोन स्विच ऑफ यायला लागला. मग सगळ्यांना टेन्शन आलं. त्यानंतर लंडनमधील मुग्धाच्या एका मैत्रिणीला संपर्क केला. तेव्हा तिने सांगितलं की, 22 ऑक्टोबरनंतर आम्ही बोललो नाहीय. मग तिला लंडनमध्ये मुग्धा हरवल्याची तक्रार पोलिसांकडे करायला सांगितलं.

लंडन पोलिसांनी तपास सुरु केल्यावर समजलं की, मुग्धाने ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस लंडन सोडलं असं मुग्धाच्या मैत्रिणीला लंडन पोलिसांनी सांगितलं. ही माहिती तिने मुग्धाच्या आई वडिलांना दिली. हे ऐकून त्यांना दुसरा धक्का बसला. त्यांना ही माहिती 26 ऑक्टोबरला मिळाली.  मग आता लेकीला कसं शोधायचं म्हणून तिच्या बँक अकाऊंची माहिती काढली. त्या समजलं ती भारतात आहे. शिवाय ती ऑनलाइन साइट्सवरून जेवण ऑर्डर करते. मग त्यांनी 27 ऑक्टोबरला संभाजीनगरमधील पोलीस स्टेशन गाठलं. तिथे मुग्धाचे अपहरण झाले आहे, अशी तक्रार नोंदवली. त्यासोबत त्यांनी सगळी माहिती पोलिसांना दिल्यानंतर त्यांनीही मुग्धाचं लोकेशन ट्रेस केलं असता ती पिंपरी - चिंचवडमधील एका सोसायटीमध्ये असल्याचे समजलं.

त्यानंतर पोलीस पिंपरी - चिंचवडमधील गहूंजे इथल्या बिल्डिंगमध्ये दाखल झाले. रात्री अकराच्या सुमारास मुग्धाच्या आई - वडिलांसोबत ते लोढाला पोहोचले. लोकेशन दाखवत असलेला फ्लॅट आतून लॉक होता आणि बेल वाजवल्यानंतरही कोणी दार उघड नव्हतं. त्यानंतर की मेकरच्या मदतीने चावी बनवण्यात आली आणि घराचे दार उडले. दार उघडताच दुर्गंध यायला लागला. फ्लॅटमधील बेडरूममध्ये गेल्यावर मुग्धा बेडवर एका अंगावर झोपली होती. तिच मृतदेङ कुजलेल्या अवस्थेत पाहून आई वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.

पुढे तपास केल्यावर असं आढळून आलं की, मुग्धाने हे घर  एप्रिल 2026मध्ये भाड्याने घेतला. असं ऍग्रिमेंट फ्लॅटच्या मालकाने पोलिसांना दिलं आहे. पोलिसांनी फ्लॅटच्या आजूबाजूला विचारल्यावर समजलं ती इथे एकटी राहत होती. शिवाय तिच्याकडे कोणी येत जात पण नव्हतं. घराची झाडाझडती केल्यावर तिथेही काही संशयास्पद आढळलं नाही. एवढंच नाही तर तिच्या फोन हिस्ट्रीमधूनही काही उघड झालं नाही. शवविच्छदेन अहवालदेखील समोर आला आहे, त्यातही काहीही इजा किंवा संशयास्पद आलं नाही. याचा अर्थ तिचा मृत्यू हृदयविकाराने झाला की काय असा प्रश्न उपस्थितीत होतोय. पण मुग्धाचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे.


पण ती इथं एकटीच राहायची, सोसायटीत बाहेरच्या व्यक्तीला सहसा प्रवेश मिळणं कठीणचं आहे. सुरक्षा रक्षक आणि शेजारच्यांकडे चौकशी केली असता तिच्याकडे कोणी येत होतं? किंवा तिच्या फोन हिस्ट्रीमधून ती फार कोणाच्या संपर्कात होती? असं ही काही आढळलं नाहीये. घराची झडती घेतली तर संशयास्पद ही काही आढळलं नाही. शवविच्छेदन अहवालात ही शरीरावर कोणत्या इजा दिसून आल्या नाहीत. पण खबरदारी म्हणून व्हिसेरा राखून ठेवला आहे. त्यामुळं मुग्धाचा मृत्यू अटॅकमुळं झाला असावा? असा प्राथमिक अंदाज वर्तविला जातोय.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES