• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /राजकीय उलथापालथ, आंदोलनानंतर महिलांची सत्ता येणार अन् 7 दिवसात पाऊस कोसळणार, फरांडे बाबांची भाकणूक चर्चेत

राजकीय उलथापालथ, आंदोलनानंतर महिलांची सत्ता येणार अन् 7 दिवसात पाऊस कोसळणार, फरांडे बाबांची भाकणूक चर्चेत

कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेते फरांडेबाबांनी देववाणीतून अनेक धक्कादायक भाकीत केलं आहे. त्यांनी नेमकं काय सांगितलं? पाहा.

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Oct 30, 2026, 11:19 AM IST|Updated: Oct 30, 2026, 11:33 AM IST
joinshare
राजकीय उलथापालथ, आंदोलनानंतर महिलांची सत्ता येणार अन् 7 दिवसात पाऊस कोसळणार, फरांडे बाबांची भाकणूक चर्चेत
Image Credit: kolhapur yatra

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
सहावी IPL ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबईचा मास्टरस्ट्रोक! तिघांच्या जागी चौघे आले; पडद्यामागे MI चं चाललंय काय?

सहावी IPL ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबईचा मास्टरस्ट्रोक! तिघांच्या जागी चौघे आले; पडद्यामागे MI चं चाललंय काय?

2

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे एकत्र येणार? संजय राऊतांनी एका वाक्यात संपवला विषय; म्हणाले, 'आम्ही दूर आहोत ते...'

3

राजकीय उलथापालथ, आंदोलनानंतर महिलांची सत्ता येणार अन् 7 दिवसात पाऊस कोसळणार, फरांडे बाबांची भाकणूक चर्चेत

4

Explained: ....आता सोनिया गांधींकडून शेवटची आशा; CTI चं पत्र; 'राहुल गांधींना आम्ही तीन वेळा..'; 10 ते 12 हजार कोटींचं संकट

5

'राज ठाकरेंना टुरिझमची खाज असेल तर...', कर्जतमधील वृक्षतोडीनंतरच्या जंगल भेटीवरुन अमित साटमांचा हल्लाबोल; म्हणाले, 'राज पाकीस्तानचा...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यातील ही यात्रा महाराष्ट्रातच नाहीतर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्येही प्रसिद्ध आहे. या यात्रेसाठी देशविदेशातून भाविक येत असतात. ही यात्रा आणखीन एका कारणासाठी प्रसिद्ध आहे. ती म्हणजे फरांडे बाबांचं भाकणूक... देशात राजकारणापासून पावसापर्यंत प्रत्येक गोष्टचं भाकीत ते करतात. यावर्षी नेमकं भाकनूकमध्ये काय येणार हे ऐकण्यासाठी सर्व भक्त आतुर असतात.

फरांडे बाबांनी भाकणूक काय केली?

या यात्रेतील प्रसिद्ध फराडे बाबांनी भाकनुकीत काय सांगितलं पाहूयात. फरांडे बाबा म्हणाले की, पुढील सात दिवसात पाऊस कोसळणार आहे. रोहिणीचा पाऊस आणि मृग नक्षत्रातील पेरणी सर्वत्र होणार आहे. तर केंद्रासह राज्यात राजकीय उलथापालख पाहिला मिळणार आहे. अनेक ठिकाणी राजकीय गोंधळ निर्माण होणार आहे. त्यासोबत देशावर महिला राज येणार आहे. मिरची आणि साखरेचे दर वाढणार आहे.  इतकंच नाही तर मोठी आंदोलनं होणार असून लढाई होणार आहेत.  

तर धान्याचे दर परिस्थितीनुसार बदलणा आहे. तेवढंच नाही तर कडधान्ये महागणार आहे. सोन्या-चांदीच्या दरांत मोठी चढ-उतार पाहिला मिळणार आहे.  तर देशात भक्तिमय वातावरण राहणार आहे. जगात अनेक ठिकाणी नवे संशोधन होणार आहे; पण त्यातून मानवी जीवनाला त्रास होण्याचे संकेत आहेत. जगाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तर देवाची उपासना करणारे भक्त रोगराईपासून दूर राहतील. तर गुरूंची सेवा करणाऱ्यांवर कृपा राहील,असं भाकणुकीतून सांगण्यात आलंय. 
पट्टणकोडोलीतील ही यात्रा तीन दिवस असून 29 ऑक्टोबरला सुरूवात झाली आहे. तर 31 ऑक्टोबरला यात्रेची सांगता होणार आहे. पहिल्याच दिवशी भंडाऱ्याची उधळण करत भाविकांनी यात्रेचा आनंद घेतला आहे. 

विठ्ठल-बिरदेव यात्रा उत्साहात 10 लाख भाविकांची उपस्थिती पाहिला मिळाली. शेकडो टन भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. धनगरी ढोलांचा निनाद आणि ‘चांगभलं’चा अखंड गजर अशा भक्तिमय वातावरणात कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीची श्री विठ्ठल- बिरदेव यात्रा उत्सव डोळे दिपवणारा होता. खारीक, खोबरे आणि पिवळ्या भंडाऱ्याची उधळण, कैताळाचे सूर यामुळे संपूर्ण पट्टणकोडोली भक्तिरंगात न्हाऊन निघाले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Kolhapur
Hindu Religion
Hindu Festivals