• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे एकत्र येणार? संजय राऊतांनी एका वाक्यात संपवला विषय; म्हणाले, 'आम्ही दूर आहोत ते...'

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे एकत्र येणार? संजय राऊतांनी एका वाक्यात संपवला विषय; म्हणाले, 'आम्ही दूर आहोत ते...'

भविष्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र येऊ शकतात, धंगेकरांच्या या वक्तव्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी थेट उत्तर दिलं आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Oct 30, 2026, 11:25 AM IST|Updated: Oct 30, 2026, 11:27 AM IST
joinshare
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे एकत्र येणार? संजय राऊतांनी एका वाक्यात संपवला विषय; म्हणाले, 'आम्ही दूर आहोत ते...'
Image Credit: sanjay raut reaction on ravindra dhangekar comment

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
सहावी IPL ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबईचा मास्टरस्ट्रोक! तिघांच्या जागी चौघे आले; पडद्यामागे MI चं चाललंय काय?

सहावी IPL ट्रॉफी जिंकण्यासाठी मुंबईचा मास्टरस्ट्रोक! तिघांच्या जागी चौघे आले; पडद्यामागे MI चं चाललंय काय?

2

उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे एकत्र येणार? संजय राऊतांनी एका वाक्यात संपवला विषय; म्हणाले, 'आम्ही दूर आहोत ते...'

3

राजकीय उलथापालथ, आंदोलनानंतर महिलांची सत्ता येणार अन् 7 दिवसात पाऊस कोसळणार, फरांडे बाबांची भाकणूक चर्चेत

4

Explained: ....आता सोनिया गांधींकडून शेवटची आशा; CTI चं पत्र; 'राहुल गांधींना आम्ही तीन वेळा..'; 10 ते 12 हजार कोटींचं संकट

5

'राज ठाकरेंना टुरिझमची खाज असेल तर...', कर्जतमधील वृक्षतोडीनंतरच्या जंगल भेटीवरुन अमित साटमांचा हल्लाबोल; म्हणाले, 'राज पाकीस्तानचा...'

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

भविष्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र येऊ शकतात, असं वक्तव्य शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलं आहे. रवींद्र धंगेकरांच्या या विधानावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट उत्तर दिलं आहे. तसंच, ते बाळासाहेबांच्या विचारांचे द्रोही आहेत, असं राऊतांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे हे विचारांचे वारसदार आहेत. तर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे रक्ताचा वारसदार आहेत, असं वक्तव्य धंगेकर यांनी केलं होतं. त्यावर राऊतांनी महाराष्ट्र लुटणाऱ्या शहांचा उदोउदो हा काही बाळासाहेबांचा विचार आहे का? असा सवाल केला आहे. तसंच,  ज्या प्रकारे अमित शहा आणि त्यांची लोक महाराष्ट्र मुंबई लुटताहेत. मराठी माणसाविरोधात भूमिका घेतात. कदाचित ते मुंबई वेगळं करण्याची योजना आखताहेत. हा काय बाळासाहेबाचा विचार आहे? हे बाळासाहेबांच्या विचारांचे द्रोही आहेत आणि असे लोक फडणवीसांच्या सरकारमध्ये असतील तर आम्ही दूर आहोत ते बरं आहोत, असं म्हणत फटकारलं आहे.  

एकनाथ शिंदे आणि अमित शाह यांनी महाराष्ट्रांच्या भल्याचा विचार केला असता. तर त्यांनी शिवसेनेचे पक्ष आणि चिन्ह अशा ऐरागैराच्या हातात दिलं नसतं, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.

'पूर्णेकर प्रकरणात गृहमंत्र्यांचा बळी जाईल'

मीनाक्षी शिंदे यांनी त्यांच्या पक्षातील पदाचा राजीनामा दिला हा त्यांचा अंतर्गंत प्रश्न. प्रदीप पूर्पणेकर यांच्या हत्येचा कट रचण्यामागे मीनाक्षी व राजेंद्र शिंदे दोघांचा समावेश आहे. याचे पुरावे आहेत. सर्व आरोपी एकत्र बसले आहेत हत्येच्या एक तास आधी. त्यात राजेंद्र शिंदे आहेत. मुख्य सूत्रधार मिनाक्षी शिंदे आहे. त्यांनी राजेंद्र शिंदेला सुपारी दिली आणि राजेंद्र शिंदेंनी त्याच्या खालच्या लोकांना सूपारी दिली. हे ठाणे पोलिसांना, ठाणे एसआयटीला माहितीय ठाण्याच्या पालकमंत्र्यांना माहितीये. मग पोलिस का वाचवताहेत? हा प्रश्न आहे. आम्ही जे पुरावे पाहिलेत आयुक्तांनी ते देखील मान्य केले आहेत. की ते दोघेच सूत्रधार आहेत. तरी जर अटक होत नसेल तर राज्याला दुर्बळ आणि हतबल गृहंमत्री लाभला आहे.  या प्रकरणात पोलीस आयुक्त आणि गृहमंत्र्यांचा बळी जाईल. पूर्णेकर प्रकरण ठाण्याच्या पालकमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना महागात पडेल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

पुढे ते म्हणाले, तुम्ही कोणाला वाचवताहेत. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना इतकी अमानुष नव्हती. पण तुम्ही ड्युप्लिकेट आहात. त्यांच्यामुळं तुम्हाला ज्याची हत्या झालीये त्याचं दुखः कळणार नाही. पूर्णेकरांचा मुलगा पालकमंत्र्याना निवेदन जायला जात होता. त्याला फरफटत रिक्षात कोंबलं. का कशासाठी? त्यामुळं पूर्णेकर प्रकरण ठाण्याच्या पालकमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना महाग पडल्याशिवाय राहणार नाही, असंही राऊतांनी म्हटलं आहे.

महायुतीतील वादावरही राऊतांची प्रतिक्रिया

दोन्ही केस गॉन आहेत. आपल्या मराठी आणि गल्लीतल्या आणि शिवसेनेच्या भाषेत गॉन केस. त्याच्याविषयी न बोललेलं बरं.  यांचे केस इतके काही मोठे नाही आणि धारदार नाहीत. त्यामुळं शब्दांचे धार फक्त आणि ती पण नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया राऊतांनी दिली आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Uddhav Thackeray
Eknath Shinde
Sanjay Raut