SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! हवामानाबद्दल मोठी अपडेट समोर; पुढील तीन दिवसांत...

पुण्यातील हवामानात पुढील तीन दिवसांमध्ये मोठी बदल पाहिला मिळणार आहे. उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होणार की, पावसाच्या सरी कोसळणार नेमकं हवामान खात्याने काय इशारा दिलाय जाणून घ्या.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 24, 2026, 11:07 AM IST | Updated: Oct 24, 2026, 11:13 AM IST
Image Credit: pune weather
Join

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून उष्णतेमुळे त्रस्त असणाऱ्या पुणेकरांना लवकरच दिलासा मिळणार आहे. हवामान विभागाने पुणे शहरातील वातावरणाचा अंदाज वर्तविला आहे. या अंदाजानुसार पावसाच्या सरी की थंडीची चाहुल नेमकं काय हवामान खात्याचा काय अंदाज आहे जाणून घ्या. कारण छत्री की स्वेटर नेमकं कसली तयारी करायची ते पाहा.  

हवामानाबद्दल मोठी अपडेट समोर!

भारतीय हवामानशास्त्र यांनी इशारा दिला आहे की, पुढील तीन दिवसात पुण्यात थंडीची चाहुल लागणार आहे. पुढील तीन दिवसांत कमाल तापमानत घट होण्याचे संकेत आहे, असं हवामान खात्याने सांगितलंय. त्यामुळे पुणेकर स्वेटर आणि बॉकेट स्वच्छ करून ठेवा. दरम्यान शुक्रवारी कमाल तापमानात किंचित वाढ पाहिला मिळाली आहे. शुक्रवारी पुण्यात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18.5 अंश सेल्सिअस होतं. शुक्रवारी थोडं ढगाळ वातावरण होतं खरं पण दुपारी मात्र उन्हाचे चटके पुणेकरांना सहन करावे लागले. पण संध्याकाळी पुन्हा एकदा ढगाळ वातावरण पाहिला मिळाले.

 

शनिवारी कसं असेल पुण्यातील वातावरण?


पुणे शहर आणि आजूबाजूच्या भागात आज कमाल तापमान स्थिर असेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. पुण्यात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस जवळपास तर किमान तापमान 19  अंश सेल्सिअस राहू शकतं असा अंदाज हवामान विभागाला आहे. पण पुणेकर कोजागरी पौर्णिमेनंतर सोमवारी वातावरणात बदल होणार असून थंडीची चाहूल लागणार आहे. त्यामुळे पुणेकर दिवाळीपूर्वीची गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी तयार राहा. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES