पुणे गोळीबार प्रकरणात सर्वात धक्कादायक अपडेट; शिवाजीनगर कोर्टाबाहेरच्या परिसरात पोलिसांच्या निर्दशानास आले भयानक वास्तव
पुणे गोळीबार प्रकरणात सर्वात खळबळजनक अपडेट समोर आली आहे. शिवाजीनगर कोर्ट परिसराची तपासणी करताना अत्यंत धक्कादायक बाब पोलिसांच्या निर्दशानास आली आहे.
Pune Crime News : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर 25 नोव्हेंबर रोजी हा गोळीबार झाला. पुणे गोळीबार प्रकरणात अत्यंत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. पोलिस तपासात अत्यंत धक्कादायक वास्तव समोर आले आहे. यामुळे पोलिसांना तपासात अडथळा देखील येवू शकतो. पोलिसांची विशेष पथकं येथे दाखल झाल आहेत.
पुण्यातल्या शिवाजीनगर कोर्ट परिसरात थरारक गँगवॉर पहायला मिळाले. 2 दुचाकीवरुन आलेल्या 5 ते 6 जणांकडून आरोपी मंदार किवळेवर गोळीबार आणि त्यानंतर कोयत्यानं वार करण्यात आलेत. या धक्कादायक घटनेनंतर रक्ताच्या थारोळ्यात असलेला मंदार किवळेला पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. हल्लेखोर पसार झाले असून यातील 6 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. समोर आलेल्या माहितीनुसार मंदार किवळे हा एका हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला आहे. हल्ल्यामध्ये त्याचा हात तुटल्याचीही माहिती मिळत आहे.
पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड
पोलिस तपासात या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. शिवाजीनगर कोर्टासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाच्या समोर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असल्याचे समोर आले आहे. हल्ला झाल्यांनतर संध्याकाळी पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, हे कॅमेरे बंद असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, आता सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बंद असलेले कॅमेरे पुन्हा सुरू करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. काल ज्या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली त्याच्या अगदी समोर हे सीसीटीव्ही कॅमेरा आहेत. पण ते चक्क बंद असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे.