SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

विलिनीकरणाबाबत अजित पवार बोलत होते अन्..., अपघाताआधी देवगिरी ते एयरपोर्ट प्रवासादरम्यान नेमकं काय झालं? सुधीर राऊतांनी सांगितली कहाणी

देवगिरी ते एयरपोर्ट असा अजित पवार यांचा प्रवासादरम्यान सुधीर राऊत सोबत होते. दादांसोबतची शेवटची भेटदरम्यान काय बोलणं झालं याबद्दल त्यांनी सांगितलं आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Sep 29, 2026, 01:40 PM IST | Updated: Sep 29, 2026, 02:00 PM IST
Image Credit: Sudhir Raut and Ajit Pawar
Join

अजित पवार आपल्यामध्ये नाहीत हे आजही खरं वाटत नाही. एका क्षणी त्या विमान अपघातात अजित पवार आपल्या आयुष्यातून गेलं. त्यांच्या जाण्यामुळे पवार कुटुंबासोबत अख्खा महाराष्ट्र पोरका झाला. अजित पवारांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार देवगिरी बंगल्यापासून विमानतळाच्या गेट नंबर आठ पर्यंतचा एक तासांचा प्रवास होता. या एक तासांच्या प्रवासात अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी कृषी पदवीधर संघटनेचे अध्यक्ष सुधीर राऊत होते. त्या एका तासात अजित पवार यांनी काय गप्पा मारल्या त्याबद्दल सुधीर राऊत यांनी सांगितलं आहे. 

त्या अखेरच्या प्रवासात अजित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार यावर काही भाष्य केलं आहे. सुधीर राऊत यांनी सांगितलं की, अजित पवारांनी मला सकाळी ७ वाजता देवगिरीला बोलवलं. त्यांना बारामतीला लवकर जायचं होतं. म्हणून दादांनी विमानतळापर्यंत मला सोबत यायला सांगितले. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की, प्रवासात मला त्यांनी १२ तारखेला आपण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करत आहोत. साहेब आपल्यासाठी विठ्ठल असून त्यामुळे आपण त्यांची माफी मागायची हे.  झालं गेलं सोडून द्यायच आणि त्यांच्या नेतृत्वात ते सांगतील तसं काम करायचं, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. 

ते पुढे म्हणाले की, मी एयरपोर्टला गेट नंबर ८ पर्यंत सोबत गेलो होतो. त्यानंतर मी तिथून शरद पवारांना भेटायला पुन्हा माघारी सिल्वर ओकला परतलो होतो. सिल्वर ओक जवळ थांबलो असताना अजित पवारांच्या अपघाताची बातमी समजली. त्यावेळी मला विश्वासच बसला नाही. ज्या माणसासोबत १ तासापूर्वी होतो, तो आता हयात नाही यावर विश्वास बसत नव्हता.

अजित पवार यांचा अपघातात 28 जानेवारीला निधन झालं होतं. ते जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीत जात होते तेव्हा हा अपघात झाला. बारामती विमानतळानजीक असलेल्या गोजुबावी गावाच्या हद्दीत अजित पवारांचे चार्टर्ड विमान धावपट्टीवर कोसळलं आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES