SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

शेतकरी आंदोलन तापलं! राजू शेट्टींनी रात्र पुणे-बंगळुरू हायवेवर झोपून काढली; आज मोठा निर्णय? फटका मुंबई, पुण्याला?

मागील अनेक तासांपासून आंदोलकांनी हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग आडवून धरला असून शेकडो गाड्या आहेत तिथेच उभ्या दिसत आहेत. या आंदोलकांनी रात्रही या रस्त्यावरच झोपून काढली.

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 04, 2026, 07:20 AM IST | Updated: Nov 04, 2026, 07:39 AM IST
Image Credit: रात्रभर रस्त्यावर झोपून होते आंदोलक
Join

ऊस दराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे पुणे-बेंगळुरू महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे.  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी कालची रात्र महामार्गावरच काढली. काहीशी थंडी असतानाही शेतकरी रस्त्यावरच झोपून राहिले. या आंदोलनाचा थेट फटका आता मुंबई, पुण्यातील लोकांना बसण्याची दाट शक्यता आहे. नेमकं काय होऊ शकतं पाहूयात...

19 तासांपासून महामार्गावरील वाहतूक बंद

ऊस दराच्या मागणीसाठीच्या शेतकरी आंदोलनामुळे तब्बल 19 तासांपासून पुणे-बेंगळुरू महामार्गावरील वाहतूक बंद आहे. प्रशासनाकडून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली असली, तरी या मार्गांवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलनाची पुढील दिशा ठरवणार आहे.

शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही, तर...

मुंबई आणि पुण्याला होणारा दूध आणि भाजीपाला पुरवठा रोखण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या आंदोलनाकडे प्रशासनासह राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला ऊस दराचा तोडगा न निघाल्यास दूध आणि भाजीपाला पुरवठा रोखण्याचा थेट इशारा दिला आहे. "शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली नाही, तर मंत्र्यांची आणि सरकारचीही दिवाळी साजरी होऊ देणार नाही," अशा आक्रमक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

मुख्य मागणी काय?

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूरमधील किणी टोलनाका आणि सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे चक्काजाम आंदोलन सुरु आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनामागची मुख्य मागणी उसाला पहिली उचल प्रतिटन 4500 ते 5000 रुपये दर मिळावा अशी आहे. सध्या कारखानदारांकडून दिला जाणारा 3600 ते 3800 रुपयांचा दर शेतकऱ्यांना मंजूर नाही. साखरेची किमान आधारभूत किंमत प्रति किलो 50 ते 60 रुपये करावी, जेणेकरून कारखान्यांना आर्थिक स्थैर्य मिळून ते शेतकऱ्यांना चांगला दर देऊ शकतील, असंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.

इतर मागण्या काय?

इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचीही या आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. सी-हेव्ही मळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचा खरेदी दर प्रतिलिटर 70 रुपये करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. साताऱ्यातील नागठाणे येथील आंदोलनात उसाच्या दरासोबतच ऊर्मोडी धरणातून तात्काळ पाणी सोडण्याची मागणीही स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे. पुणे-बेंगळुरू महामार्गाच्या कर्नाटक सीमा भागात म्हणजेच बेळगावी आणि कोगनोळी टोलनाका येथील आंदोलक शेतकरी प्रतिटन 5500 रुपये दराची आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करत आहेत. या मागण्यांवर प्रशासन, सरकार आणि साखर कारखानदार यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.

ZEENEWS TRENDING STORIES