SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बॉयफ्रेंड आणि मुलगा दोघांनी साथ दिली; महिलेचे पतीसह धक्कादायक कृत्य, पोलिसही शॉक झाले

पत्नीने पतीचा खून करून हृदयविकाराचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी हा हत्याचे डाव उघडकीस आणला. पत्नीच्या प्रियकरासह चौघांना अटक झाली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 06, 2026, 04:37 PM IST | Updated: Oct 06, 2026, 04:42 PM IST
Join

सांगली क्राईम : सांगलीत एक धक्कादायक हत्या प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी मृत व्यक्तीची पत्नी आणि तिच्या प्रियकरासह पाच जणांना अटक केली आहे. पतीचा खून करून हृदयविकाराचा बनाव केला.  तपासात  समोर आलेली माहिती पाहून पोलिसही शॉक झाले आहे.  या वक्तीची हत्या कशी झाली याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. 

हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव करत पतीचा पत्नीने खून केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील डफळापुर मध्ये समोर आला आहे. याप्रकरणी पत्नी, मुलगा आणि प्रियकरासह पाच जणांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. 

आप्पासाहेब चव्हाण (वय 52) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 22 ऑगस्ट रोजी जेवणातून गुंगीचे औषध देऊन पत्नी सुनीता चव्हाण हिने पतीची हत्या केली. सुनीताने प्रियकर याच्यासोबत पतीचा गळा आवळून खून केला होता. पतीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचत अंत्यसंस्कार करून प्रियकर, मुलगा आणि इतर साथीदारांच्या मदतीने पुरावे नष्ट केले होते. मात्र सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने पत्नीच्या या खुनाचा आणि बनावाचा पर्दाफाश करत पत्नी, प्रियकर आणि मुलासह चौघांना अटक केली. अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आल्याचं तपासात समोर आले आहे. 

बारामतीत 2 महिलांची हत्या

बारामती तालुक्यातील शेरेवाडीमध्ये दोन वृद्ध महिलांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. घटनेतील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले असून, चोरीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES