SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

तुकाराम मुंडेंच्या घरी दरोडा! बंगल्याच्या खिडकीचं ग्रील तोडून प्रवेश केला अन्... एका महिन्यानंतर चोरांची गँग अटकेत; स्क्रू ड्रायव्हरचा धाक दाखवून...

सोशल मीडियावर यासंदर्भातील माहिती व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सविस्तर तपशील देताना खरी माहिती सांगितली आहे. नक्की झालंय काय? जाणून घ्या घटनाक्रम...

Reported By Swapnil Ghangale Written By Swapnil Ghangale
Published: Nov 26, 2026, 08:01 IST | Updated: Nov 26, 2026, 08:34 IST
Image Credit: 17 नोव्हेंबर रोजी पडलेला हा दरोडा (प्रातिनिधिक फोटो)
Join

मुंब्रा, टिटवाळा, वाशिंव, कुळगाव-बदलापूर परिसरातील बंगले आणि फार्म हाऊसच्या खिडकीचे ग्रील तोडून दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. या टोळीचा म्होरक्या विजय चव्हाण (45)  याच्यासह पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी बुधवारी दिली. या टोळीकडून दिव्यातील तुकाराम मुंडे यांच्या घरातील दोन लाख 39 हजारांच्या दरोड्यांसह सात गंभीर गुन्ह्यांची उकल झाली आहे.

नेमकं घडलं काय?

17 नोव्हेंबर 2026 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आठ ते नऊ सशस्त्र दरोडेखोरांनी दिव्यातील आगासन गावातील उद्योजक तुकाराम मुंडे यांच्या 'त्रिनेत्र' बंगल्यात प्रवेश केला. बंगल्याच्या खिडकीची ग्रील तोडून दरोडेखोरांनी बंगल्यात झोपलेल्या संतोष शेडगे यांना स्क्रू ड्रायव्हरच्या धाकावर खुनाची धमकी दिली होती. त्यानंतर त्यांच्या तोंडाला रुमाल व हात-पाय बांधून एक लाख 55 हजारांचे सोन्याचे दागिने आणि 84 हजारांची रोख रक्कम असा दोन लाख 39 हजारांचा ऐवज लुटून नेला होता.

सात दरोड्यांची कबुली

आरोपींनी दिवा वैचील दरोड्यांसह कुळगाच, कल्याण तालुका, वाशिंद आणि पडघा पोलिस ठाण्याच्या परिसरात सात दरोडाघांचे गुन्हे केल्याची कबुली दिली. विजय चव्हाणवर यापूर्वी पुणे, लोणावळा, मुरबाड, तळेगाव आणि अलिबाग भागातील पोलिस ठाण्यामध्ये 18 गुन्हे, तर नारायण ठोंबरेवर कुळगाव पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल असल्याचेही उपायुक्त जाधव यांनी सांगितले. सर्व आरोपींना मुंब्रा पोलिसांकडे सोपवण्यात आलं आहे.

सीसीटीव्ही फुटेज ठरले महत्त्वाचे

याप्रकरणी 17 नोव्हेंबरला मुंब्रा पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पाच आणि मुंब्रा पोलिसांच्या पाच पथकांकडून तपास सुरू होता. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल (सीएसएमटी) ते बदलापूर, कसारा रेल्वे स्थानक परिसरातील सुमारे 150 ते 200 सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणातून मुख्य आरोपी विजय चव्हाण याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं. त्यापाठोपाठ लक्ष्मण भोसले (43), सतीश वाघे (27), नारायण ठोंचरे (27) आणि जयेश कथोरे (35) यांना ताब्यात घेतले. आरोपींपर्यंत पोहचण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज फार महत्त्वाचे ठरले.

गोंधळाबद्दल सरकारकडूनच स्पष्टीकरण

दरम्यान, हा दरोडा आयएएस (IAS) अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या घरी दरोडा पडलेला नसून, नामसाधर्म्यामुळे सोशल मीडियावर गैरसमज पसरला आहे. राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त असलेले तुकाराम मुंढे यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे त्यांच्याच घरी दरोडा पडल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली होती. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) आणि पोलिसांनी हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट केले आहे. यासंदर्भातील पोस्टही त्यांनी केली आहे.

 

या टीमने आरोपींना पकडलं

ठाणे गुन्हे अन्वेषण ठिभागाच्या कल्याण युनिटचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक गणेश दळवी, सर्जेराव पाटील, किरण भिसे आणि उल्हासनगर युनिटचे राजेश गज्जल आदींच्या पथकाने या गुन्ह्याची उकल केली.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मोजक्या शब्दांमध्ये...स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.पत्रकारितेचा श्रीगणेशास्वप्निल यांनी पत्रकारितेच्या दुसऱ्या वर्षापासूनच 'ठाणे वैभव' या ठाण्यातील स्थानिक वृत्तपत्रामध्ये शिकाऊ पत्रकार म्हणून कामाला सुरुवात केली. सांस्कृतिक आणि गुन्हेगारी यासंदर्भातील वृत्तांकन यांनी या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये केलं. बीएमएमच्या तृतीय वर्षाला ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयातील 'ऋत' या पत्रकारिता विभागाच्या महाविद्यालयीन वृत्तपत्रासाठी स्वप्निल यांनी उपसंपादक म्हणून काम पाहिले.डिजिटलमध्ये एन्ट्री'महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉम'च्या माध्यमातून पहिल्यांदा डिजिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वप्निल यांनी सुरुवातीला सोशल मिडिया व्यवस्थापक म्हणून काम पाहिले. त्यानंतर हळूहळू ते डिजिटल वृत्तांकनाकडे वळले. त्यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' वृत्तपत्रामध्येही माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लेखन केलं. मुख्य पुरवणीसोबतच अनेकदा रविवार विशेष अंकांमध्येही त्यांचे लेख छापून आले आहेत. 'मुंबई टाइम्स' या पुरवणीअंतर्गत विद्यार्थ्यांच्या विश्वातील अनेक विषय त्यांनी कॉलेज क्लब रिपोर्ट्सच्या माध्यमातून हाताळले. कॉलेज क्लब रिपोर्टर्ससोबतच्या कामासोबतच त्यांनी 'मटा सन्मान', 'मटा श्रावण क्विन' यासारख्या कार्यक्रमांसाठी डिजिटल आणि प्रिंटदरम्यान संयोजक म्हणून काम पाहिलं. जवळपास पाच वर्ष ते मटामध्ये कार्यरत होते.प्रगल्भतेची आसमहाराष्ट्र टाइम्सनंतर तितक्याच तोलामोलाच्या 'लोकसत्ता'मध्ये स्वप्निल यांनी काम केलं. या ठिकाणीही ते पाच वर्ष कार्यरत होते. 'मटा'पासून सुरु झालेल्या प्रवासाला 'लोकसत्ता'मध्ये प्रगल्भता लाभली. राजकीय बातम्या, ताज्या घडामोडी, ट्रेडींग बातम्या याबरोबरच त्यांनी डिजिटल आणि प्रिंटमधील समन्वयाचं (इंटीग्रेशन) कामही त्यांनी लोकसत्तामध्ये केलं. 'लोकसत्ता'मधील 'व्हिवा' या पुरवणीमध्ये तरुणाईसंदर्भातील विषयांवर त्यांनी लेखन केलं. तसेच 'लोकप्रभा'च्या माध्यमातून त्यांनी माहिती-तंत्रज्ञान या विषयावर लिखाण केलं. लोकसत्ता डॉट कॉममध्ये स्वप्निल यांनी चार ते पाच सेक्शनसची जबाबदारी पार पाडली.तो सध्या काय करतो?'लोकसत्ता'नंतर स्वप्निल यांनी पहिल्यांदाच टीव्हीशी संलग्न वेबसाईटसाठी म्हणजेच 'झी 24 तास'च्या वेबसाईटसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी ते ताज्या घडामोडींबरोबरच, राजकीय बातम्या, ब्रेकिंग बातम्या, ट्रेडिंग बातम्या हाताळतात. बातमीमधील अचूक माहिती, व्याकरण, उत्तम मथळे यासारख्या गोष्टींकडे त्यांचं कटाक्षाने लक्ष असतं. लिखाणबरोबरच मॅरेथॉन पळणं, वेगवेगळ्या ठिकाणी खादडीसाठी जाणं, पुस्तकांसोबतच अवांतर वाचन यासारख्या गोष्टींना ते प्राधान्य देतात.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES