'राहुल गांधी थायलंड, व्हिएतनामला का जातात?' मुख्यमंत्र्यांचा सवाल; म्हणाले, 'चीनच्या पैशावर काँग्रेस...'
इंदिरा गांधी यांचं उदाहरण देत, काँग्रेस हा संविधान चोर असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात केला. भाजप - महायुतीच्या वतीने लोकतंत्र बचाव पदयात्राचे आयोजन करण्यात आलं आहे.
ठाण्यात भाजप - महायुतीच्या वतीने लोकतंत्र बचाव पदयात्राचे आयोजन करण्यात आलंय. या यात्रेसाठी ठाण्यातील पाचपाखाडी इथे ठाणे महापालिका मुख्यालयाजवळ भाजप - महायुतीचे कार्यकर्ते एकत्र आले. या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, आणि गणेश नाईक उपस्थित आहेत. या यात्रेला संबोधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससह राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला.
'दारू तीच आहे बॉटल बदलली'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणामध्ये म्हटलं की, इंदिरा गांधी यांचं उदाहरण देत, काँग्रेस हा संविधान चोर आहे. काँग्रेसची लढाई देश, संविधानविरोधीत आहे. इंदिरा गांधींकडून अनेकदा संविधानाची मोडतोड झाली आहे. देशात अराजकता आणण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. 1976 साली जनता पक्षाने नागरिकांना त्यांचे मूलभूत अधिकार बहाल केले होते. हे संविधान चोर आहेत, त्यांच्याविरोधात आपल्याला रस्त्यावर उतरावे लागेल. इंदिरा गांधी यांचा नातू तेच करत आहे. दारू तीच आहे बॉटल बदलली आहे. तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला आम्ही धक्का बसू देणार नाही.
राहुल गांधी थायलंड, व्हिएतनामला का जाता?
ते पुढे म्हणाले की, मला राहुल गांधींना विचारायचं आहे, राहुल गांधी थायलंड, व्हिएतनामला का जाता? चीनकडून काँग्रेस पक्षाला मदतनिधी मिळता. त्यांच्या ट्रस्टला फंड मिळतो. त्या चीनच्या पैशावर काँग्रेस देशात अराजकता निर्माण करत आहे. सध्या एक लाल पुस्तक समोर येत आहे. संविधानालाही लाल रंगात आणलं जात आहे. हे संसदेला शिव्या देतात. निवडणूक आयोगाला शिव्या देत आहेत, आता तर ते सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा घेऊन गेले.
'जोपर्यंत शेवटच्या बांगलदेशीचं नाव काढत नाही...'
ते पुढे म्हणाले की, बांगलादेशींची नावं मतदान यादीतून बाहेर काढल्यामुळे काँग्रेसला कसं कसं होतंय. त्यांना मळमळतंय. त्यांना आपलं पोटचं मूल गेल्याचं दुख होतं आहे. पण मी सांगतो की, जोपर्यंत शेवटच्या बांगलदेशीचं नाव काढत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया थांबणार नाही. मोदींजींच्या नेतृत्वात विकासीत भारत घडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.