SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

डोंबिवलीत खळबळ! 8 वर्षाचं रिलेशनशिपनंतर ब्रेकअप, गर्लफ्रेंडसह तिचे आई-वडील घरात असताना बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य

डोंबिवलीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. गर्लफ्रेंडने 8 वर्षाचं रिलेशनशिपनंतर ब्रेकअप केल्यामुळे बॉयफ्रेंडने तिचं घर पेटवलं.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 22, 2026, 17:16 IST | Updated: Nov 22, 2026, 17:21 IST
Image Credit: dombivli Crime
Join

प्रेमात प्रेमाशिवाय भांडण, वाद होणे स्वाभाविक आहे. पण अनेक वेळा प्रत्येक प्रेम हे लग्नाच्या नात्यापर्यंत पोहोचत नाही. डोंबिवलीतील बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडमधील नात्याचे एक भयानक अंत झालं. मिळालेल्या माहितीनुसार 8 वर्षाचं रिलेशनशिपनंतर गर्लफ्रेंडने ब्रेकअप केल्यामुळे बॉयफ्रेंडला राग अनावर झाला. त्याने गर्लफ्रेंडचे घर जाळलं आहे. धक्कादायक म्हणजे त्याने घरात त्याची एक्स गर्लफ्रेंड, आई वडील असताना घराला आग लावली.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डोंबिवलीतील एका वस्तीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी दीपेश यांचं एका तरुणीसोबत गेल्या सात ते आठ वर्षांपासून अफेयर होतं.  पण त्यांच्या नात्यात काही काळानंतर वाद सुरु झाले. सतत होणाऱ्या भांडण आणि वादाला कंटाळून तरुणीने त्याच्यासोबत नातं तोडलं. तिने दीपेशला आपलं ब्रेकअप झालं आहे. मला आता भेटू किंवा फोन करु नकोस. गर्लफ्रेंडच्या ब्रेकअपच्या निर्णयानंतर दीपेशला भयानक राग आला. त्याने या रागाच्या भरात प्रेयसीचं घर गाठलं.  तिथे जाऊन त्याने घरात प्रेयसी, तिची आई वडील असतानाच घराला आग लावली.

हेसुद्धा वाचा -  पंढरपूर राजा भिंगे हत्या प्रकरणात नवीन वळण, 9 वर्षांपूर्वीच्या नगरसेवक मित्राच्या हत्येचा बदला? काय आहे इनसाईट स्टोरी?

घराला आग लावल्याचे समजताच तरुणी आणि तिची आई-वडील घरातून तातडीने पळाले. त्यामुळे सुदैवाने या भीषण आगीतून तिघांचा जीव वाचला आहे. तर या घटनेमुळे परिसरात भीतीदायक वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी गेले आणि त्यांनी तपास केला. पीडितांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दीपेश रस्तोगीला अटक केली आहे. 

राजा भिंगे यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा

पंढरपूरमधील शिवा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र उर्फ राजा भिंगे यांच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. या हत्येप्रकरणी पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून, माजी नगरसेवक नामदेव भोईटे यांच्या २०१७ मधील हत्येचा बदला घेण्यासाठी हा खून केल्याची माहिती पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिली आहे

या प्रकरणांमध्ये पुणे येथून नागे नावाचा शूटर बोलविण्यात आला होता. हा शूटर काही दिवस पंढरपूरमध्ये राहून त्याने भिंगे यांची रेकी केली होती. जेवणानंतर शतपावलीसाठी बाहेर पडण्याच्या वेळेची माहिती घेण्यात आली. त्यानंतर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तीन गोळ्या झाडून त्यांची हत्या केली.

हत्येनंतर अवघ्या १२ तासांत पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. दोघांना सुरुवातीला अटक करण्यात आली, तर उर्वरित तिघांना गुजरातमधील सोमनाथ येथून पकडण्यात आले. हत्येसाठी वापरलेले पिस्तूलही पोलिसांनी जप्त केले आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES