'... हे खपवून घेतलं जाणार नाही', एकनाथ शिंदेंचा विरोधकांना इशारा, 'इतिहासात असं कधी झालं नाही...'
हे फेक नरेटिव्ह पसरवतात आरे पण हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे. युवकांच्या हाताला काम देण्याचे काम मोदीजी करत आहेत, एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
'विरोधकांचा खरा चेहरा, बुरखा फाडला पाहिजे.आणीबाणी आहे म्हणता. इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली तेव्हा नेते जेलमध्ये होते. मीडिया जेलमध्ये होते. आता असं काही आहे का? सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. इतिहासात कधी असं झालं नाही. हे आम्ही खपवून घेतलं जाणार नाही,' असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसला प्रत्युत्तर म्हणून देशभरात भाजपाच्या वतीने पदयात्रा/मोर्चे आयोजित आहेत. ठाण्यात लोकतंत्र बचाव पदयात्रा- या यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
'विरोधकांचे खायचे दात वेगळे आहेत. हे दाखवले पाहिजे. चोराच्या उलट्या बोंबा दाखवल्या पाहिजेच ही आणिबाणी आहे. आणिबाणी आहे म्हणतात. इंदिरा गांधीनी आणीबाणी लावली तेव्हा नेते जेलमध्ये होते. मीडिया जेलमध्ये होते. आता असं काही आहे का?', असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
'या देशाच्या इतिहासातील काळा दिवस होता. जेव्हा यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेचा अपमान केला. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. इतिहासात कधी असं झालं नाही. याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. सगळीकडे दबावाचे राजकारण करतात. हे खपवून घेतलं जाणार नाही. हे खऱ्या अर्थाने सत्तेपासून बाहेर आहे. जनतेमध्ये जा आणि निवडून या,' असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
'2029 मध्ये म्हणतात मोदी जायेंगे... कोणी म्हणतो एप्रिलमध्ये जाणार, तुम्हारे बाप का राज है क्या? 140 कोटी जनतेने निवडून दिलं आहे. त्यामुळं निवडणुकीला सामोरे जा. लोकांनी तुम्हाला नाकारलं आहे. तीन-तीन वेळा रिजेक्टची हॅट्रिक केली आहे. तुम्ही पुढचे 50 वर्ष देशात सत्ता येऊ शकत नाही,' अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
'2014 पूर्वीचं आठवा तेव्हाची स्थिती आठवा. टूजी स्पेक्ट्रम घोटाळा, बोफोर्स घोटाळा, कॉमनवेल्थ, चारा घोटाळा गोबर घोटाळा शेण पण खाल्लं सोडलं नाही. सिरीयल बॉम्बब्लास्ट, मुंबई हल्ला, तेव्हा तुम्ही काय केलं. तेव्हा हे पाकिस्तानला चिठ्ठ्या लिहायचे. यांच्यात हिंमत नव्हती पाकिस्तानमध्ये घुसायची,' असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
'केरळमधून राहुल गांधी निवडून आले. त्या केरळ काँग्रेसने सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीशांचा राजीनामा मागितला. नंतर ट्विट डिलीट केलं. हा न्यायमूर्तींचा अपमान आहे. जब तक सूरज चांद रहेगा, बाबासाहेब आंबेडकर जी का संविधान रहेगा,' असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.