• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /कोकणातील खेडेगावात दिल्ली, बंगळुरू, हैदराबादमधील श्रीमतांची घरं; सिंधुदुर्ग जिल्ह्यात 900 कोटींच्या जमीनीचे बेकायदा व्यवहार

कोकणातील खेडेगावात दिल्ली, बंगळुरू, हैदराबादमधील श्रीमतांची घरं; सिंधुदुर्ग जिल्ह्यात 900 कोटींच्या जमीनीचे बेकायदा व्यवहार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 900 कोटींची बेकायदा जमीन विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दिल्ली, बंगळुरू, हैदराबादमधील श्रीमतांनी तळ कोकणात घरं बांधली आहेत.

Reported ByVanita Kamble
Published: Sep 28, 2026, 09:08 PM IST|Updated: Sep 28, 2026, 09:36 PM IST
joinshare
कोकणातील खेडेगावात  दिल्ली, बंगळुरू, हैदराबादमधील श्रीमतांची घरं; सिंधुदुर्ग जिल्ह्यात 900 कोटींच्या जमीनीचे बेकायदा व्यवहार

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज़
  • फोटो
  • व्हिडीओ
अभिजित बिचुकलेंना किती मतं पडली पाहिलं का? पुण्यात प्रचारादरम्यान, 'शिक्षकांसाठी वाटेल तो संघर्ष करेन' असा दिलेला शब्द

अभिजित बिचुकलेंना किती मतं पडली पाहिलं का? पुण्यात प्रचारादरम्यान, 'शिक्षकांसाठी वाटेल तो संघर्ष करेन' असा दिलेला शब्द

2

धक्कादायक! भारताला 3 वेळा गोल्ड जिंकवणाऱ्या नीरज यादवचा मृतदेह फ्लॅटमध्ये संशयास्पद अवस्थेत...

3

भूगोलाच्या पुस्तकात 'उज्जैन पृथ्वीचा केंद्रीयसंदर्भ बिंदू' असा उल्लेख, तर विज्ञानाच्या पुस्तकात...; सहावीच्या 3 पाठ्यपुस्तकांमध्ये बदल

4

₹100 च्या नोटांचे बंडल, आधी 'लंच ब्रेक'चं कारण अन् नंतर...; SBI मध्ये ग्राहकाने शूट केलेला धक्कादायक Video पहिला का?

5

'...तर तुम्ही ठाण्यातून परत जाणार नाही'; आदित्य ठाकरेंच्या उद्याच्या दौऱ्याआधीच शिंदेंच्या शिवसेनेचा विरोधकांना इशारा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

सिंधुदुर्ग : कोकणात परप्रांतियांकडून मोठ्या प्रमाणात बेकायदेशिररित्या जमिन खरेदी होत असल्याचे प्रकार समो आले आहेत. इतकंच नाही तर काही शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचाही आरोप आहे. तसच जमिनीच्या सपाटीकरणासाठी कुठलीही परवानगी न घेता हजारो झाडांची कत्तल झाल्याचंही ग्रामस्थांचं म्हणणं आहे. तर हा 900 कोटींचा घोटाळा असून एका मंत्र्यांचा यात सहभाग असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला.

कोकणातल्या जमिनी परप्रांतियांच्या घशात

900 कोटींच्या शेतजमिनीची बेकायदेशिर खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे. वनखात्याचे नियम डावलून हजारो झाडांची कत्तल करण्यात आली आहे.  व्यवहारांमागे सिंधुदुर्गातले मंत्री असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. कोकणातल्या जमिनींची परप्रांतियांकडून खरेदी हा मुद्दा कायम चर्चेत असतो. राज ठाकरे सुद्धा अनेक सभांमधून याबद्दल बोलत असतात. पण आता पुन्हा एकदा याची चर्चा होण्यामागे एक नवी माहिती कारणीभूत ठरली. सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणात कायद्याला हरताळ फासून जमिनीचे कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे पुढे आलंय.

सावंतवाडी, वेंगुर्ल्यात  परप्रांतियांकडून बेकायदेशिर जमीन खरेदी 

कोकणातल्या जमिनींची परप्रांतियांकडून बेकायदेशिर खरेदी केल्याचे समोर आले आहे.  दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ल्यात मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी विक्री झाली आहे. खोटी कागदपत्र देऊन कृषी जमिन खरेदी केल्याची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.  बहुतांश खरेदीदार दिल्ली, बंगळुरू आणि हैदराबादमधील आहेत.

परप्रांतियांनी कोकणात जमीन खरेदी कशी केली? 

शेतकरी नसतानाही कृषी जमिनींची खरेदी, कुळ कायद्याचा नियम डावलला.  वनक्षेत्रासंदर्भात कथितपणे अनियमितता, गैरव्यवहार केल्याचा आरोप.  खरेदी केलेल्या शेतजमिनीवर अनधिकृत बांधकामं करण्यात आली. पावसाळी अधिवेशनात जयंत पाटलांकडून मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.  नंतर महसूल विभागाकडून प्रकरणाची चौकशी सुरु झाली.  गेल्या 3 वर्षातील जमिनीच्या सर्व मोठ्या व्यवहारांची तपासणी करण्यात आली. 

परप्रांतियांची जमिन विकत घेण्यासाठी सिंधुदुर्गला पसंती का?

गोव्यातील उत्तर भागात पेडणे जवळ 'मोपा' हे आंतरराष्ट्रीय विमानतळ सिंधुदुर्ग सीमेलगत आहे.  गोव्यात  विक्रीसाठी जमीन शिल्लक नसल्यानं सिंधुदुर्गला पसंती देण्यात आली.  याच परिसरात केरळच्या नागरिकांकडून रबर लागवडीसाठी जमीन खरेदी करण्यात आली.  आता याच जमिन व्यवहारांच्या चौकशीचा अहवाल हिवाळी अधिवेशनात सादर केला जाणार आहे. पण यावरुनच राऊतांनी 900 कोटींच्या जमिन घोटाळ्याचा आरोप करत एका मंत्र्यांकडे बोट दाखवलंय. तर मंत्री नितेश राणेंनी राऊतांवर पलटवार केला.

खासदार संजय राऊतांनी मंत्र्यांकडे बोट दाखवलं असताना राणेंनी राऊतांवर पलटवार केलाय. तर नवनाथ बन यांनीही ठाकरेंवर आणि राऊतांवर अलिबागमध्ये बंगले असल्याचा आरोप केला. 
कोकणातल्या जमिन गैरव्यवहारांबद्दल विरोधक सत्ताधार्यांवर आरोप करतायत तर सत्ताधारी विरोधकांवर. पण  दोडामार्ग तालुक्यातील सासवडे, सासोली या गावातील शेतकऱ्यांनी आज कोकण आयुक्तांना भेट देत  घोटाळ्याचे पुरावे सादर केले. वनखात्याचे नियम डावलत हजारो झाडांची कत्तल झाल्याचाही आरोप ग्रामस्थांनी केलाय. तसच गेल्या 10 वर्षांपासून हे जमिनीचे व्यवहार सुरु शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याचाही आरोप केला. 

कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी

वास्तविक राज्याच्या कुळ कायद्याप्रमाणे शेतकरी नसताना शेतजमीन खरेदी करता येत नाही. त्यामुळे कोकणातील या जमिन व्यवहाराची कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरु आहे. पण या गैर व्यवहारांमध्ये प्रशासनातील काही घटकांचा सहभाग असेल, शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या असतील आणि हजारो झाडांची कत्तल केली असेल तर शाहनिशा होऊन कठोरात कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे. त्यामुळे नेमका काय अहवाल सादर होतो आणि त्यानंतर काय कारवाई होते याकडे आता लक्ष असेल.  

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Sindhudurg
Maharashtra Tourism
Kokan
Maharashtra News