घर खरेदी करणे हे केवळ स्वप्न नव्हे तर एका युद्धासारखेच आहे. कारण घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. तर, काही लोक 20-25 वर्षांच्या EMIच्या बोझ्याखाली दबले गेले आहेत. मात्र महाराष्ट्राच्या पूजाने ईएमआयचा हा गेमच पालटला आहे. तिने घर घेण्यासाठी बँकेतून एक रुपयांचेही कर्ज घेतले नाही आणि 70 लाखांचे घर खरेदी केले. ना होम लोन, ना ईएमआयचा टेन्शन. पूजाची गोष्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पूजा शहाड येथे राहते. तिने तिथेच 70 लाखांचे घर खरेदी केले आहे. पूजाना कोणतीह लॉटरीही जिंकली नाहीये. ना तिच्याकडे कोणती पिढीजात संपत्ती आहे. तिने जे केलं ते कोणीही करू शकतं. स्वतःला काही अटी घालून दिल्या. या अटींचे कटेकोटपणे पालन केले एक टार्गेट फिक्स करण्यात आले. मला तीन वर्षात घर घ्यायचं आहे. पैसे जमवायचे आहेत, हे स्वतःला सातत्याने सांगत पाहिले. प्रत्येक महिन्याच्या सॅलरीचा हिशोब तेच टार्गेट सेट करण्यासाठी लावला.
पूजाला फिक्स सॅलरीसोबतच दर महिन्याला 1 लाख ते 1.5 लाख रुपयांचे इंसेटिव्ह मिळायचा. लोक बोनसचे पैसे शॉपिंग करण्यासाठी, फिरण्यासाठी आणि मौजमजेसाठी वापरतात. पूजाने मात्र उलट केले. तिने बोनसच्या पैशाला हातदेखील लावला नाही. तिने ते पैसे थेट घरासाठी तयार करणाऱ्या फंडमध्ये टाकले. तर, सॅलरीतून घर चालवले.
पूजाने घर खरेदी करताना बिल्डरसोबतही खूप हुशारीने डिल केली. तिने पू्र्ण रक्कम एकरकमी देण्याऐवजी एक फ्लेक्सिबल पेमेंट प्लान बनवला. त्यातून तिने 3 वर्षांपर्यंत हळूहळू पेमेंट करण्याची संधी मिळाली. त्यामुळं तिच्यावर एकत्र 70 लाखांचा दबाव आला नाही व ना बँकच्या चक्कर माराव्या लागल्या.
पूजाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. कारण तिने घर घेण्यासाठी होम लोन हा एकमेव मार्ग नसल्याचे म्हटलं आहे. बचतीचा नवा पर्याय आणि थोड्याश्या एक्स्ट्रा कमाईने तुम्ही घर घेण्याचं स्वप्न पूर्ण करु शकता.
प्रत्येकाचा पगार, खर्च आणि जबाबदाऱ्या पूजाइतक्या मोठ्या नसतात. त्यामुळे, घर खरेदी करण्यापूर्वी आपल्या आर्थिक परिस्थितीचे काळजीपूर्वक मूल्यांकन करा आणि कोणताही घाईचा निर्णय घेणे टाळा.