माणगाव पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात कार दरीत कोसळून झालेल्या अपघातात रायगडमधील प्रसिद्ध उद्योजक श्रीनिवास बेंडखळे यांचा मृत्यू झाला आहे. बेंडखळे हे गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. त्यानंतर आज त्यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
श्रीनिवास बेंडखळे शनिवारी पहाटे पासून ते आपल्या कारसह बेपत्ता होते. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाटात होते. त्या भागात शोध घेतला असता खोल दरीत त्यांची गाडी आढळून आली. पुणे हद्दीतील ताम्हिणी घाटात तब्बल 1200 फूट खोलदरीत त्यांची कार सापडली. रात्री उशिरापर्यंत SVRSS आणि शेलार मामा या रेस्क्यू टीम कडून हे शोधकार्य सुरू होते त्यानंतर या दोन्ही रेस्कु टीमला मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
श्रीनिवास बेंडखळे हे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथील एक प्रसिद्ध उद्योजक होते. . मागील दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. पोलीस तपासात त्यांच्या वाहनाचे लोकेशन ताम्हिणी घाटात आढळून आल्यानंतर शोधकार्याला गती मिळाली. त्यानंतर पुणे हद्दीतील ताम्हिणी घाटात 1200 फूट खोल दरीत त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
अथक प्रयत्नांनंतर या दोन्ही रेस्क्यू टीमला मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर मृतदेह पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पौंड पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आला असून, या दुर्घटनेबाबत पुढील तपास पोलीस प्रशासन करत आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत रात्री उशिरा खोल दरीतून बेंडखळे यांचा मृतदेह बाहेर काढला. ही कार नेमकी कशी आणि कोणत्या कारणामुळे दरीत कोसळली, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर रायगडच्या महाडमध्ये भीषण अपघात घडलाय. भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने महामार्गावरून जाणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, धडकेनंतर कारही पलटी झाली. मुंबई-गोवा महामार्गाच्या कोकण लेनवर हा अपघात घडला. राकेश जगोटीया असं मृत पादचाऱ्याचं नाव असून तो मुंबईतील चेंबूर इथला राहणारा आहे . दरम्यान, या अपघातात कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.