• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /स्पोर्ट्स
  • /कर्णधार गिलला ऋषभ पंतने दिली स्पिन बॉलिंगची ऑफर, यशस्वी जयस्वालला केलं ट्रोल

कर्णधार गिलला ऋषभ पंतने दिली स्पिन बॉलिंगची ऑफर, यशस्वी जयस्वालला केलं ट्रोल

IND VS NZ Test : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पहिल्या टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी विकेटमागे असणाऱ्या ऋषभ पंतचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतोय. यात तो गोलंदाजीवरून शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालची फिरकी घेताना दिसतेय.

Reported Bypooja pawar
Published: Nov 22, 2026, 14:34 IST|Updated: Nov 22, 2026, 15:19 IST
joinshare
कर्णधार गिलला ऋषभ पंतने दिली स्पिन बॉलिंगची ऑफर, यशस्वी जयस्वालला केलं ट्रोल
Image Credit: कर्णधार गिलला ऋषभ पंतने दिली स्पिन बॉलिंगची ऑफर

About the Author

pooja pawar

pooja pawar

पूजा सुनील पवार या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 6 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. प्रिंट मीडियापासून सुरु झालेला त्यांचा पत्रकारितेतील प्रवास हा टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया पर्यंत येऊन पोहोचला आहे. सध्या त्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. पूजा पवार या बीसीसीआयच्या मान्यताप्राप्त पत्रकार असून आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा मान्यताप्राप्त पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन, राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल क्षेत्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.प्रिंट मीडिया ते डिजिटल पर्यंतची कारकीर्द:पूजा यांनी 'सकाळ' वृत्तपत्रापासून त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात केली. यात त्यांना सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांमध्ये फिल्ड रिपोर्टींगचा अनुभव मिळाला. त्यांनी आपल्या लेखनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक समस्यांना वाचा फोडली ज्याचा इम्पॅक्ट सुद्धा प्रशासनाच्या कारभारावर पाहायला मिळाला. पूजा यांनी 'न्यूज १८ लोकमत' पासून डिजिटल पत्रकारितेत पाऊल टाकले. येथे त्यांना विशेषतः क्रीडा पत्रकारितेमध्ये भक्कम अनुभव मिळाला शिवाय मनोरंजन आणि लाईफस्टाईलशी निगडित विषयांवर देखील त्यांनी लेखन केले. त्यानंतर आता पूजा या झी २४ तास मध्ये मुख्यत्वे क्रीडा विभागासाठी काम करत आहेत.  पूजा यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्या स्वतः बॉक्स क्रिकेटमध्ये एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत.शैक्षणिक पात्रतापूजा पवार यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
IND vs PAK : पाकिस्तानने नाणेफेक जिंकले, भारतासमोर गोलंदाजीचे आव्हान! पहा दोन्ही संघाची Playing 11

IND vs PAK : पाकिस्तानने नाणेफेक जिंकले, भारतासमोर गोलंदाजीचे आव्हान! पहा दोन्ही संघाची Playing 11

2

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण नेमकी कशामुळे? ग्राहकांना दिलासा देणारी 3 कारणे आहेत? आताच घ्या जाणून!

3

बुलढाण्यातील सरपंचपुत्राचा दुर्दैवी मृत्यू, विहिरजवळ निसटलेला पाईप दुरुस्त करायला गेला अन्, धरणातच...

4

W,W, W, W... T20 पदार्पण सामन्यात 4 चेंडूत 4 विकेट्स घेणारा कोण आहे जमशेद आलम?

5

दोन दिवसांपासून बेपत्ता, शेवटचं लोकेशन ताम्हिणी घाट, रायगडच्या उद्योजकासोबत घडलं भयंकर, 1200 फूट खोल दरीत...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

IND VS NZ Test : वेलिंग्टन बेसिन रिजर्व मैदानावर सुरु असलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड टेस्ट सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताने 702 धावांची मोठी खेळी करून न्यूझीलंड समोर दुसऱ्या फलंदाजी इनिंगमध्ये आव्हान ठेवलं. त्यानंतर न्यूझीलंडचा संघ मैदानात फलंदाजीसाठी आला. यावेळी भारतीय विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतने विकेट्समागून केलेल्या मजेशीर टिप्पणीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. चौथ्या दिवशी भारताची गोलंदाजी सुरु असताना ऋषभ पंतने गिलला एक लेग स्पिनरचा पर्याय दिला आणि त्याच सगळं बोलणं हे स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड झालं.

गिलने ऋषभ पंत आणि जयस्वालची केली मस्करी :

न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाज विकेट मिळवण्याचा प्रयत्न करत असताना, ऋषभ पंतने आपल्या नेहमीच्या शैलीत एक विनोद करून मैदानावरचे वातावरण हलकेफुलके ठेवले. स्टंप माईकवर ऋषभ पंतचं बोलणं रेकॉर्ड झालं ज्यात तो म्हणत होता की, 'मी बऱ्यापैकी लेग स्पिन गोलंदाजी करू शकतो'.

ऋषभ पंतची मस्ती एवढ्यावरच थांबत नव्हती. त्याने यावेळी भारताचा ओपनर यशस्वी जयस्वालची सुद्धा मस्करी केली. पंत म्हणाला की, ' जर संघाला कोणत्या वाईट ऍक्शन असणाऱ्या गोलंदाजांची गरज असेल तर यशस्वी जयस्वाल गोलंदाजीत हात अजमावू शकतो. नंतर, जेव्हा कर्णधार शुभमन गिलने गंमतीने विचारले की त्याने स्वतः एक ओव्हर टाकावी, तेव्हा पंतने उत्तर देत गिलची फिरकी घेतली. पंत म्हणाला की, 'सोडून दे! पहिल्याच बॉलवर तुला सिक्स बसेल.' हे सगळं संभाषण स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हेही वाचा : टेस्ट क्रिकेटमध्ये 29 वर्षांनी असं काही झालं, न्यूझीलंडच्या कर्णधाराची विकेट घेऊन जसप्रीत बुमराहने नावावर केला रेकॉर्ड

ऋषभ पंतने 2024 मध्ये केलेली गोलंदाजी :

ऋषभ पंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत एकदाही गोलंदाजी केली नाही. पण 2024 दिल्ली प्रीमियर लीगमध्ये  ऋषभ पंतने विकेटकिपरचे ग्लव्हस काढून एक ओव्हर लेग स्पिन गोलंदाजी केली होती. मैदानावर ऋषभ पंतचा हा अंदाज पाहून फलंदाज सुद्धा काहीकाळ थबकला होता. ऋषभ पंतने रविवारी टेस्ट सामन्यात 153 बॉलमध्ये 128 धावांची विस्फोटक फलंदाजी केली. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडने त्यांच्या दुसऱ्या डावात 2 विकेट 119 धावा केल्या होत्या. ते अजूनही भारतापेक्षा 233 धावांनी मागे आहेत, ज्यामुळे पाचवा दिवस हा अत्यंत निर्णायक आणि रोमांचक ठरणार आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Shubman Gill
Team india
Cricket News
Marathi News