SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'होय, मी प्रदीप पूर्णेकरांच्या पाचही मारेकरांना ओळखतो...', मीनाक्षी शिंदेंच्या पतीचा मोठा खुलासा! 'माझी पत्नी नगरसेविका...'

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे यांच्या पतीने पोलिसांसमोर मोठा खुलासा केला आहे.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Oct 15, 2026, 04:43 PM IST | Updated: Oct 15, 2026, 04:46 PM IST
Image Credit: pradeep purnekar
Join


शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आहे. पोलिसांचा तपास जसा जसा पुढे जातोय यात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात पाचही मारेकरांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर याने वेगळाच संशय बोलून दाखल्यामुळे या प्रकरणाला वेगळेच वळण आले आहे. या प्रकरणातील बाइकवरील मारेकरी आणि पकडलेला मारेकरी यामध्ये साम्य नसल्याचा राम पूर्णेकर यांच्या संशय आहे. ते दोन्ही आरोपी एकच नाही असं राम पूर्णेकरला संशय आहे.

त्यात पोलिसांनी आता शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पती राजेंद्र शिंदेंची चौकशी करण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे पोलिसांनी राजेंद्र शिंदे आणि मारेकरी यांची समोरासमोर चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चौकशीदरम्यान राजेंद्र शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला अधिक मजबूती आली आहे, असं पोलिसांचं मत आहे.

राजेंद्र शिंदे यांचा मोठा खुलासा!

पोलिसांनी सलग दोन दिवस राजेंद्र शिंदे यांची प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येसंदर्भात चौकशी केली. पहिल्या दिवशी नऊ तास आणि दुसऱ्या दिवशी आठ तास चौकशी करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. चौकशीदरम्यान प्रदीप पूर्णेकर यांच्या पाचही आरोपीला आपण ओळखतो अशी कबुली राजेंद्र शिंदे यांनी पोलिसांनी दिली आहे. ते म्हणाले की, माझी पत्नी मीनाक्षी शिंदे त्या परिसराच्या दोन तीन वेळा नगरसेविका राहिल्या आहेत. त्यामुळे आरोपींचे त्यांच्या घरी किंवा त्यांच्याकडे येणे-जाणे होते, याच कारणाने मी त्यांना ओळखतो. पण माझा प्रदीप पूर्णेकर हत्याकांडाशी काहीही संबंध नाही.

राजेंद्र शिंदे यांच्या जबाबामुळे राम पूर्णेकर यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे, असं पोलिसांना वाटतंय. राम पूर्णेकर यांनी म्हटलं होतं की, हत्येच्या आदल्या दिवशी मारेकरी हे राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे यांच्या घरी निळकंठ इमारती बाहेर दिसले होते. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES