SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे गटाने थेट फोटो दाखवला; फोटो पाहून पूर्णेकरांचा मुलगा म्हणाला...

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मोठी कारवाई झाली आहे. मीनाक्षी शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर ठाकरे गटाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 29, 2026, 06:54 PM IST | Updated: Oct 29, 2026, 07:00 PM IST
Join

ठाणे : ठाण्यातील विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात पहिली मोठी कारवाई झाली आहे. या प्रकरणात मीनाक्षी शिंदे यांचे नाव चर्चेत होते. या प्रकरणात मीनाक्षी शिंदेंनी शिवसेनेतील पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर ठाकरे गटाने थेट ठाण्यात पत्रकार परिषद घेत यावर प्रतिक्रिया दिली.  संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यसुत्रधारांना अचक करण्याची मागणी केली आहे. यावेळी संजय राऊत यांनी एक फोटो देखील दाखवला. यावेळी पूर्णेकर यांचा मुलगा देखील उपस्थित होता. 

मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा नको, त्यांना अटक करा, अशी मागणी राम पूर्णेकरांनी केलीय. तसंच याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं राम पूर्णेकरांनी म्हटले.  न्यायासाठी जीव गेला तरी चालेल, अशी भूमिका त्यांनी घेतली.  आजही आम्हाला अपेक्षित उत्तरे मिळाले नाहीत सर्व पुरावे दिलेले आहेत. माझ्या आईचा फोटो व्हायरल होत आहे. चौकशी सुरू आहे. तपास सुरू आहे इतकेच पोलीस सांगत आहे. नरेश मस्के हे नकळत सर्व खरं माध्यमांसमोर बोलत आहेत मीनाक्षी शिंदे यांचा फक्त राजीनामा नको तर त्यांच्यावर ठोस कारवाई व्हावी ज्या महिला या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत त्यांनी विचार करावा त्यांच्या घरी देखील  मुलं बाळ आहेत असे यावेळी पुर्वेकर  कुटुंब म्हणाले आहेत. हेच फोटो संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेत दाखवले.  

आदित्य ठाकरेंनी ठाण्यात जाऊन प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी पालकमंत्री शिंदे काय करत आहेत?असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. तर ठाणेकरांना बाहेरटचे लोक येऊन त्रास देतात. काही लोक राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शिंदेंनी केली.. आदित्य ठाकरे आणि राऊतांनी पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर सीपी ऑफिसलाही भेट दिली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना वाचवण्यात एवढे उत्सुक का?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीनाक्षी शिंदेंना वाचवण्यात एवढे उत्सुक का आहेत, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. तसंच राम पूर्णेकर न्याय मागण्यासाठी पालकमंत्र्यांकडे गेले असता त्यांना पोलिसांकडून डिटेन करण्यात आल्याचं त्यांनी म्हटल आहे. दरम्यान मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा झालाय, मात्र अटक कधी होणार, असा सवालही त्यांनी केलाय. त्याचबरोबर पूर्णेकर हत्येप्रकरणी ठाण्याची अवस्था बीडपेक्षा वाईट झाल्याचं संजय राऊतांनी म्हटल.

हातात सत्ता असली की कुत्र्याला देखील वाटते आम्ही वाघ आहोत.. अनिल परब यांना कायद्याचे कळते त्यांनी आयुक्तांना विचारले त्यांच्याकडे उत्तरे नाही. पोलिस खाते बरखास्त करावे ते कुणाचे खासगी सेवक म्हणून काम करत आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. 

चार किंवा पाच लोकांना पकडले ते हुकमाचे दावेदार आहेत. काही आरोपी बोगस आहेत. मीनाक्षी शिंदे राजेंद्र शिंदे मूख्य आरोपी आहेत असा आरोप संजय राऊतांनी केला. आरोपींना वाचवण्यासाठी  शिवसेना रस्त्यावर उतरली आहे का? असंही संजय राऊत म्हणाले.  दोन फोन पोलिसांना आले ते पालकमंत्री यांचे असतील असा दावाही त्यांनी केला. CBI देखील अमित शहा यांच्याकडे आहे. 

अशा हत्या होत असतील तर नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा. पोलिसांन कडून उत्तरे काही आले नाही.  जो व्हिडिओ दिला कुटुंबाने त्यातून अनेक महत्वाचे गोष्टी आहे. स्थानिक खासदारांची भाषा शिवराळ आहे त्यांना भाव देण्याची गरज नाही.  गृहमंत्री राजकारण पक्ष फोडण्यात झाडे तोडण्यात व्यस्त आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली. 

ठाण्यातील चिंतामणी चौकात मनसे शिवसेना UBT काँग्रेस राष्ट्रवादी SP पक्ष करणार होते आंदोलन. आंदोलनात आदित्य ठाकरे राज ठाकरे अनिल परब जितेंद्र आव्हाड केदार दिघे राजन विचारे राहणार होते उपस्थित. मात्र, याला परवानगी नाकरण्यात आली. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES