• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /ठाणे
  • /'...म्हणजे धोकायंत्र', डिलिमिटेशनवरुन शरद पवारांबद्दल राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य, 'सत्तेसाठी अजित पवारांनंतर ही दुसरी टीम...'

'...म्हणजे धोकायंत्र', डिलिमिटेशनवरुन शरद पवारांबद्दल राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य, 'सत्तेसाठी अजित पवारांनंतर ही दुसरी टीम...'

डिलिमिटेशन बिलावरून राज ठाकरे यांनी शरद पवारांवर मोठा आरोप केला आहे. सत्तेकडे जाणारा अजित पवारांचा पहिला गट तर आता...

Written ByNeha ChaudhariEdited ByNeha Chaudhari
Published: Nov 29, 2026, 12:58 IST|Updated: Nov 29, 2026, 13:01 IST
joinshare
'...म्हणजे धोकायंत्र', डिलिमिटेशनवरुन शरद पवारांबद्दल राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य, 'सत्तेसाठी अजित पवारांनंतर ही दुसरी टीम...'
Image Credit: raj Thackeray on sharad pawar

About the Author

Neha Chaudhari

Neha Chaudhari

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

50 वर्षांची कट्टर राजकीय मैत्री भाजपने 24 तासात तोडली? इंडिया आघाडीला पहिला सर्वात मोठा धक्का! MK स्टॅलिन असं का म्हणाले पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नाही

2

सुपरमॅन प्रमाणे लगावली उडी, यशस्वी जयस्वालने एका हाताने पकडला जबरदस्त कॅच

3

6 खासदारांवर दावा करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिदेंच गटाचे उत्तर; उर्वरीत 3 खासदारांबाबत खळबळजनक दावा

4

रोहित शर्मासाठी मुंबईच्या रस्त्यावर 100 किमी धावला जबरा फॅन, दिलेला शब्द केला पूर्ण!

5

'आम्ही याला संपवू...' आकाश दीपच्या डोक्यावर बॉल मारण्याची प्लॅनिंग, समोर आला न्यूझीलंड गोलंदाजांचा धक्कादायक Video

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

देशात डिलिमिटेशन बिलावरून राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्रासह प्रत्येक राज्यात पक्षात, नेत्यांमध्ये अगदी कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ सुरू आहे. केंद्र सरकारकडून संसदेत आणल्या जाणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना (परिसीमन) विधेयक आणि महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारच्या धोरणांवरून शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. अशातच कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर सर्वात बोचरी टीका केली.

'शरद पवार म्हणजे धोकायंत्र'

पत्रकार परिषद घेत राज ठाकरे म्हणाले की, हे सर्व आताच का सुरू आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. महिला आरक्षण उभे करायचे आणि हे सर्व कशासाठी चालले आहे? सध्याचे ५४३ खासदार काय दिवे लावतायेत, की अजून खासदार वाढवावेसे वाटत आहेत? या विधेयकामुळे राज्यांच्या अधिकारांवर गदा येईल. रोजच्या रोज राज्यांचे प्रश्न बिकट होत आहेत. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर प्रत्येक राज्याला काय मिळणार आहे? संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा हा मोदी सरकारचा डाव आहे. मी हे निश्चितपणे सांगतो की उत्तर विरूद्ध दक्षिण हा संघर्ष पेटल्याशिवाय भविष्यात राहणार नाही. कारण उत्तरेत ज्या प्रकारच्या संख्या वाढत आहेत त्या प्रमाणात दक्षिणेत नाहीत. दक्षिण म्हणजे महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, केरळ, गोवा, तमिळनाडू ही राज्यं धरतो आहे. या राज्यांमध्ये भविष्यात अन्यायच होणार आणि तो जास्त प्रमाणात होणार आहे.

हेसुद्धा वाचा  - 'डिलिमिटेशन'वरून शरद पवारांचा पक्ष तुटतोय; सलग दुसऱ्या दिवशी दुसरा राजीनामा, बड्या नेत्याने सोडली पवारांची साथ

राज ठाकरे पुढे म्हणाले की,  दक्षिण म्हटलं तरीही आपलं राज्य हा दक्षिणेचाच भाग आहे. केंद्रावर अवलंबून राज्यं ठेवणं यासाठीचा हा डाव आहे. याच्याही खोलात अनेक गोष्टी आहेत, त्या हळूहळू तुम्हाला कळतील. मी मागे एकदा म्हणालो होतो ना जंतर-मंतर तसाच प्रकार आहे. होकायंत्र दिशा दाखवतं पण इथे धोकायंत्र आहे. अजित पवार जेव्हा महायुतीबरोबर गेले तेव्हा मी एक ट्वीट केलं होतं. काल पुन्हा मी ते पोस्ट केलं आहे. त्यामध्ये मी म्हटलं होतं की पहिली टीम रवाना झाली आहे दुसरी लवकरच होईल, त्याप्रमाणे ते झालं आहे.

'अजित पवार सत्तेच्या दिशेनं गेलेली पहिली टीम'


राज ठाकरे म्हणाले की, मागे मी पत्रकार परिषदेत बोललो होतो की ते जंतरमंतर आहे. आपल्याकडे दिशा दर्शवण्यासाठी होकायंत्र असते. मात्र, हे धोका यंत्र आहे. मी आधीच बोललो होतो की अजित पवारांची एक टीम गेली आहे आणि दुसरी टीमही वेळीच तिकडे जाईल. 


Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Breaking News
Sharad Pawar
Raj Thackeray