SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

वृक्षतोड थांबवण्यासाठी हात जोडताय, तुमचे कोयते काय करतायत? राज ठाकरे यांचे थेट स्थानिकांना आवाहन

कर्जतच्या वक्ष तोडीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आहेत. कर्जतमध्ये वृक्ष तोडीची पाहणी करुन राज ठाकरेंनी जाहीर सभा घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला.

Reported By Vanita Kamble Written By Vanita Kamble
Published: Oct 28, 2026, 07:24 PM IST | Updated: Oct 28, 2026, 08:03 PM IST
Join

Raj Thackeray Karjat Daura : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पामुळं  कर्जत-भीमाशंकर पट्ट्यात शेकडो झाडांची कत्तल सुरु आहे.. झाडांच्या या कत्तलीविरोधात आता  मनसे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरले आहेत.  राज ठाकरे यांनी वृक्षतोडीची पाहणी केली. यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत  राज ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली.  वृक्ष तोड थांबवण्यासाठी हात जोडतायं, तुमचे कोयते काय करतायतं? असं म्हणतं  राज ठाकरे यांनी थेट स्थानिकांनाच आक्रमक प्रश्न विचारला.  

कर्जतमध्ये वृथ तोडीची पाहणी करत असताना अनेकांनी मला हात जोडून वृक्ष तोड थांबवण्याची विनंती केली.   तुमचे कोयते काय करतात? तुमचे कोयते काय फांद्या कापायला आहेत का असा सवाल राज ठाकरे यांनी स्थानिकांना केला. 

वाडा, जव्हार येथून लोक वृक्ष तोड करण्यासाठी येत आहेत.  कर्जतच्या दरवाजावर टकटक झाली उद्या पालघरच्या होणार. प्रकल्पाचं टेंडर नाही , काही नाही प्रकल्प देऊन टाकलाय असं राज ठाकरे म्हणाले. 

गुजरातमधली दोन माणसं आमचा महाराष्ट्र चालवणार

गुजरातमधली दोन माणसं आमचा महाराष्ट्र चालवणार, सह्याद्री पोखरणार का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना केंद्रातल्या दोघांकडून शून्य किंमत 

गुजरात्यांसाठी जंगल कापलं जात आहे.  या प्रकल्पांची गरज काय  मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना केंद्रातल्या दोघांकडून शून्य किंमत मिळत आहे. आम्ही जे सांगु ते महाराष्ट्रात झालं पाहिजे.  महाराष्ट्र गुजरात्यांच्या हातात जायला नको हे मी विधानसभेत सांगत होतो.  ही हिंमत तुमच्यातूनच येते कुठून. निवडणूकीच्या तोंडावर जात, धर्म, पैशाच्या नावावर यांना मतदान करायचं. हा 30-35 टक्के 
मतदार, बाकी निवडणूक आयोग आहेच.  स्वत: मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं की केंद्राने ठरवलं हा प्रकल्प करायचा.  गुजरातमधली दोन माणसं आमचा महाराष्ट्र चालवणार, सह्याद्री पोखरणार आहेत. 
 

प्रकल्पाचं टेंडर नाही, काही नाही प्रकल्प देऊन टाकला आहे.  ग्रामिण भागातला जेन झी कधी जागा होणार? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. 

असे थंड आणि शांत बसणार असाल तर मला नाही तुमचं नेतृत्व करायचं, मला नाही इथे यायचं

दरम्यान. राज ठाकरेंची सभा सुरु होण्यापूर्वी मोठा गोंधळ झाला होतात.  असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या सभेला पुरविण्यात आलेल इंटरनेट बंद झाले.  मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ही माहिती दिली. सभास्थळी LAN केबल द्वारे जे इंटरनेटचे आयोजन करण्यात आले आहे. ते बंद केल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.  यावर देखील राज ठाकरेंनी भाष्य केले. इंटरनेट कापलं पण या समोरच्या नेटवर्कचं काय कराल?  असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. 
 

 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES