500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणालेत 'ज्याच्यासोबत पैसे पाठवले तोमाझ्यापर्यंत...'
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपसंदर्भात श्रीकांत शिंदेंचं नाव घेतलं आहे. यानंतर आज पहिल्यांदाच श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जरांगेंनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिपबाबत खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिलीये. जरांगेंना पडलेला प्रश्न मलाही पडलाय. पैसे पाठवले ती व्यक्ती अद्याप माझ्यापर्यंत पोहोचली नाही. त्या व्यक्तीचा शोध मीसुद्धा घेत आहे असं श्रीकांत शिंदे म्हणालेत. दोन दिवसांपासून याचं संशोधन करत आहे असंही ते म्हणालेत.
काय म्हणालेत श्रीकांत शिंदे?
खासदार श्रीकांत शिंदे म्हणालेत की, ज्याच्यासोबत 500 कोटी पाठवले होते, तोही माझ्यापर्यंत पोहोचला नाही. जो प्रश्न मनोज जरांगे पाटील यांना पडला आहे, तो मला पडला आहे. आता त्याला शोधायला चाललोय मी. आताच आम्ही इथे चर्चा करत होतो की, 500 कोटी एकत्र कसे दिसत असतील, किती गाड्या लागतील. मला वाटतं या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, कोण काय बोलतं त्याच्यावरती तुम्ही लोक प्रश्न विचारता आहात.
ते पुढे म्हणाले की, आता मला वाटतं त्याची शहानिशा जी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. कळेल काय ज्या गोष्टी आहेत. तुम्ही पण शोधत आहात ना मी पण शोधतोय. दोन दिवस तेच करत होतो, खास करु रिसर्च करत होतो. आता तुम्ही पण शोधा. तुम्हाला कळलं तर तुम्ही सांगा. मला कळलं तर मी सांगतो.