SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

भिवंडीकरांना थेट मुंबई गाठता येणार; ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गिकेबाबत मोठी अपडेट, मेट्रो 5 चा आणखी विस्तार होणार

ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 मार्गिकेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर येतेय. या मार्गिकेच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात मेट्रो धावणार आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Nov 02, 2026, 09:39 AM IST | Updated: Nov 02, 2026, 09:42 AM IST
Image Credit: Thane Bhiwandi Kalyan Metro
Join

ठाणे-भिवंडी मेट्रो 5 मार्गिकेच्या कामाला गती आली आहे. येत्या काही दिवसांत या मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, मेट्रोच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याबाबतही गुड न्यूज समोर आली आहे. मेट्रो 5 मार्गिकेचा 2 आणि 3 रा टप्पा यासाठी एमएमआरडीएने निविदा जारी केली आहे. यामुळं मेट्रो 5 मार्गिकेचा विस्तार असलेल्या धामणकर नाका ते दुर्गाडी चौक मेट्रो 5 टप्पा 2, दुर्गाडी ते कल्याण मेट्रो 5 अ आणि भोईरवाडी ते उल्हासनगर मेट्रो 5 अ विस्तारीत मार्ग प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई मेट्रो मार्गिका 5 ही ऑरेंज लाइन म्हणून ओखळली जाते. ही मार्गिका ठाणे कापूरबावडी ते कल्याण पर्यंत साधारण 24.90 किमी लांब असून यात 17 स्थानके प्रस्तावित होती. मात्र आता या मार्गिकेचा विस्तार करण्यात आला असून 2 आणि 3 टप्प्यांतर्गंत ही मार्गिका 34 किमीपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर यातील स्थानकांची संख्या 19 झाली आहे. येत्या काही महिन्यात या मेट्रोच्या कामाला सुरुवात होणार आहे.

एमएमआरडीएकडून मेट्रो 5 मार्गिकेच्या टप्पा 1 अंतर्गंत कापूरबावडी ते धामणकर नाका असा 11.90 किमीचा मार्ग उभारण्यात येत आहे. याची 100 टक्के कामे पूर्ण झाली असून यंत्रणेची कामे आणि चाचण्या सुरू आहेत. हा मार्ग पुढील वर्षापर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखव करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे.

आता मेट्रो 5 च्या धामणकर नाका ते दुर्गाडी टप्पा 2 या 10.48 किमीच्या मार्गाची उभारणी एमएमआरडीएकडून करणार आहे. त्यापुढे मेट्रो 5 टप्पा 3 अंतर्गत दुर्गाडी ते कल्याण मेट्रो 5 अ असा 6.51 किमी आणि पुढे भोईरवाडी ते उल्हासनगर स्पर मार्ग 5 अ 17.21 किमीचा मार्ग उभारणार आहे. या तिन्ही टप्प्यांचा मिळून 34 किमीची मेट्रोची उभारणी होणार असून त्यात 19 स्थानके असतील.

इंटरचेंज कसं असतील

मेट्रो 5 ही मार्गिका कापूरबावडी मेट्रो लाइन 4 सोबत परस्पर जोडणी प्रदान करेल. त्याचबरोबर, कल्याण-तळोजा या मेट्रो मार्गिका 12 सोबत थेट जोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर, मध्य रेल्वेसोबतही कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. या मेट्रो मार्गिकेसाठी कशेळी येथे 27 हेक्टर क्षेत्रात कारशेड करण्यात येत आहे.

अशी असतील स्थानके

१. बाळकुम नाका, २. कशेळी, ३. काल्हेर, ४. पूर्णा, ५.अंजुरफाटा, ६. धामणकर नाका, ७. भिवंडी, ८. गोपाळ नगर, ९. टेमघर, १०. रजनोली, ११. गोव गाव, १२ कोन गाव, १३. लाल चौकी, १४. कल्याण स्टेशन, १५. कल्याण एपीएमसी.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES