• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त 18,000 स्पेशल ट्रेन; रेल्वे स्थानकांवर महाभयानक गर्दी

दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त 18,000 स्पेशल ट्रेन; रेल्वे स्थानकांवर महाभयानक गर्दी

दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त 18,000 स्पेशल ट्रेन धावणार आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता ही घोषणा करण्यात आली आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 07, 2026, 11:31 PM IST|Updated: Nov 07, 2026, 11:35 PM IST
joinshare
दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त 18,000 स्पेशल ट्रेन; रेल्वे स्थानकांवर महाभयानक गर्दी

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
सिंगापूरमध्ये राहणारा भारतीय भाच्याच्या लग्नासाठी भारतात आला आणि जीव गमावून बसला

सिंगापूरमध्ये राहणारा भारतीय भाच्याच्या लग्नासाठी भारतात आला आणि जीव गमावून बसला

2

दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त 18,000 स्पेशल ट्रेन; रेल्वे स्थानकांवर महाभयानक गर्दी

3

खरचं 13 नोव्हेंबर 2026 रोजी जगाचा अंत होणार? 66 वर्षापूर्वीच्या भविष्यवाणीमुळे जगात खळबळ

4

‘दिवाळी येत-जात राहील, पण…’; अजित पवारांच्या आठवणीत राजेंद्र पवारांची हळवी पोस्ट, बालपणीच्या आठवणींना उजाळा

5

आधी यूपीएससी आणि मग केबीसीचही स्वप्न भंगलं, मुंबईत चोर कसा बनला इसम? धक्कादायक कहाणी समोर

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Festival Season Special Trains : दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त रेल्वेने 18,000 स्पेशल ट्रेनची मोठी घोषणा केली आहे.  दिवाळी आणि छठ पूजेनिमित्ताने अनेक जण आपल्या गावी जात आहेत.  प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन, रेल्वेने दिल्लीतील स्थानकांवर  सुरक्षेत वाढ केली आहे.  व्यवस्थापनतही बदल करण्यात आले आहेत. या दरम्यान दिल्लीच्या रेल्वे स्थानकांवरून दररोज 8 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतील अशी अपेक्षा आहे. गर्दीचे सुरक्षितपणे व्यवस्थापन करण्यासाठी देशभरात विक्रमी 18,000 विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. सुरक्षेसाठी तनवी दिल्ली रेल्वे स्थानकावर 700 हून अधिक अत्याधुनिक एआय-आधारित कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

दिवाळी आणि छठ महापर्वामुळे दिल्ली-एनसीआरच्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने स्थलांतरित मजूर, विद्यार्थी आणि कामगार सणांसाठी आपापल्या घरी जात आहेत. यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. 

विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पूर्व भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांची संख्या खूप जास्त आहे. नवी दिल्ली, आनंद विहार, जुनी दिल्ली आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे.

सहा स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री थांबवली

रेल्वे स्थानकांवर होणारी प्रवाशांची गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी, उत्तर रेल्वेने 3 ते 14 नोव्हेंबर दरम्यान दिल्ली-एनसीआरमधील सहा प्रमुख रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री बंद केली आहे. यामध्ये नवी दिल्ली, ओल्ड दिल्ली, आनंद विहार टर्मिनल, हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद आणि दिल्ली सराय रोहिल्ला स्थानकांचा समावेश आहे. 

अतिरिक्त तिकीट काउंटरची तरतूद

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा कक्ष तयार करण्यात आले आहेत. आरक्षित आणि अनारक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांसाठी स्वतंत्र प्रतीक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. आनंद विहार टर्मिनलवरही प्रवाशांना पद्धतशीरपणे प्लॅटफॉर्मवर पोहोचवले जात आहे. अतिरिक्त तिकीट काउंटर, बसण्याची सोय, पिण्याचे पाणी आणि खानपान सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.
सुरक्षेसाठी 1300 अतिरिक्त सैनिक तैनात 
प्रवाशांची सुरक्षा आणि गर्दीचे व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी, उत्तर रेल्वेने प्रमुख स्थानकांवर 1,300 अतिरिक्त रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) जवान तैनात केले आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर 700 हून अधिक एआय-आधारित कॅमेऱ्यांच्या साहाय्याने निगराणी ठेवली जात आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Railway News