• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /विश्व
  • /खरचं 13 नोव्हेंबर 2026 रोजी जगाचा अंत होणार? 66 वर्षापूर्वीच्या भविष्यवाणीमुळे जगात खळबळ

खरचं 13 नोव्हेंबर 2026 रोजी जगाचा अंत होणार? 66 वर्षापूर्वीच्या भविष्यवाणीमुळे जगात खळबळ

सोशल मिडियावर एक भविष्यावाणी तुफान व्हायरल होत आहे. 13 नोव्हेंबर 2026 रोजी जगाचा अंत होणार असा दावा या भविष्यवाणीतत केला जात आहे. ही भविष्यवाणी 66 वर्ष जुनी आहे.

Reported ByVanita Kamble
Published: Nov 07, 2026, 10:59 PM IST|Updated: Nov 07, 2026, 11:04 PM IST
joinshare
खरचं 13 नोव्हेंबर 2026 रोजी जगाचा अंत होणार? 66 वर्षापूर्वीच्या भविष्यवाणीमुळे जगात खळबळ

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
खरचं 13 नोव्हेंबर 2026 रोजी जगाचा अंत होणार? 66 वर्षापूर्वीच्या भविष्यवाणीमुळे जगात खळबळ

खरचं 13 नोव्हेंबर 2026 रोजी जगाचा अंत होणार? 66 वर्षापूर्वीच्या भविष्यवाणीमुळे जगात खळबळ

2

‘दिवाळी येत-जात राहील, पण…’; अजित पवारांच्या आठवणीत राजेंद्र पवारांची हळवी पोस्ट, बालपणीच्या आठवणींना उजाळा

3

आधी यूपीएससी आणि मग केबीसीचही स्वप्न भंगलं, मुंबईत चोर कसा बनला इसम? धक्कादायक कहाणी समोर

4

संध्याकाळच्या भुकेसाठी बेस्ट! घरच्या घरी तयार करा टेस्टी मिनी समोसे

5

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडलं! ‘CID’ फेम अभिनेत्रीने सांगितली आठवण; 13 वर्षांपासून एकटी घालवतेय जीवन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

व्हायरल न्यूज :  66 वर्षपूर्वीच्या भविष्यवाणीमुळे जगात खळबळ माजली आहे. 13 नोव्हेंबर 2026 रोजी जगाचा अंत होणार असा दावा या भविष्यवाणीत केला जात आहे. जसजसा हा दिवस जवळ येत आहे, तसतशी 'जगाच्या अंताची' भविष्यवाणी  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोणी ज्योतिष्याने ही भविष्यवाणी केलेली नाही तर  66  वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या एका वैज्ञानिक अभ्यासाशी संबंधित आहे. यात पृथ्वीवरील लोकसंख्येच्या भविष्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. यावरुनच जगाच्या विनाशाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 

66 वर्षांपूर्वी नेमका काय दावा करण्यात आला आहे?

शास्त्रज्ञांनी सुमारे 66 वर्षांपूर्वी याच दिवशी जगाच्या अंताची भविष्यवाणी केली होती. या दाव्यामागील कहाणी खूपच रंजक आहे. या दाव्यात शास्त्रज्ञांनी प्रत्यक्षात जगाच्या विनाशाबद्दल कोणतीबही संकेत दिले नव्हते तर  वेगाने वाढणाऱ्या जागतिक लोकसंख्येच्या गणितीय अंदाजाबद्दल भाष्य केले होते.

4 नोव्हेंबर 1960 रोजी सुरू 3 संशोधकांचा अहवाल 'सायन्स' नावाच्या अमेरिकन विज्ञान मासिकात प्रकाशित झाला होता. "प्रलय: शुक्रवार, 13 नोव्हेंबर इ.स. 2026 असे या लेखाचे शीर्षक होते. जर जगाची लोकसंख्या तिच्या ऐतिहासिक दराने वाढत राहिली, तर गणितीय मॉडेलनुसार 13 नोव्हेंबर 2026 रोजी ती अनंत होईल. याचा निर्ष्कर्ष जगाचा अंतशी जोडण्यात आला. 

1960 मध्ये शास्त्रज्ञांनी 13 नोव्हेंबर ही तारीख का दिली?

ऑस्ट्रियन-अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ हाइन्झ फॉन फोर्स्टर यांनी, पॅट्रिशिया मोरा आणि लॉरेन्स अॅमियोट यांनी हे संशोधन केले.  हे तिघेही अमेरिकेतील इलिनॉय विद्यापीठाच्या विद्युत अभियांत्रिकी विभागात कार्यरत होते. संशोधकांनी ख्रिस्ती युगाच्या सुरुवातीपासून ते 1958 पर्यंतच्या जागतिक लोकसंख्येच्या 24 ऐतिहासिक अंदाजांचा अभ्यास केला. लोकसंख्या वाढीचे नमुने समजून घेण्यासाठी त्यांनी एक गणितीय मॉडेल विकसित केले. या मॉडेलनुसार, मानवी लोकसंख्या केवळ एका निश्चित दराने वाढत नाही, तर कालांतराने तिचा वेग वाढतो. याला हायपरबोलिक वाढ म्हणतात. 
मानवाच्या संवाद साधण्याच्या, सहकार्य करण्याच्या आणि संघटित होण्याच्या क्षमतेमुळे नैसर्गिक मर्यादा असूनही त्यांची झपाट्याने वाढ होऊ शकली. याच्या आधारावर, त्यांनी असा अंदाज लावला की नोव्हेंबर 2026  मध्ये लोकसंख्या गणितीय अनंततेपर्यंत पोहोचेल असा अंदाज संशोधकांनी वर्तवला .

खरंच 13 नोव्हेंबर 2026 ला जगाचा अंत होणार का?

जगाचा अतं होणार असा हा दावा असला तरी जगाचा अक्षरशः विनाश असा नव्हता. शास्त्रज्ञांनी लघुग्रहाच्या धडकेचा अंदाज वर्तवला नव्हता, किंवा भूकंप, ज्वालामुखी किंवा सौर स्फोटांमुळे मानवजातीचा विनाश होईल याचाही अंदाज वर्तवला नव्हता.  'प्रलय' हा शब्द एका काल्पनिक गणितीय परिस्थितीचे वर्णन करण्यासाठी वापरला गेला होता. जिथे लोकसंख्या अमर्याद असल्याचा दावा करण्यात आला. 
गणितामध्ये, सिंग्युलॅरिटी (एकलता) हा एक असा बिंदू आहे जिथे समीकरणाचा निकाल असामान्य किंवा अनंत होतो. वास्तविक जगात, पृथ्वीची मर्यादित संसाधने आणि पर्यावरणीय परिस्थिती पाहता मानवी लोकसंख्या अमर्याद होणे अशक्य आहे. त्यामुळे, या अभ्यासाला 13 नोव्हेंबर 2026 रोजी होणाऱ्या जगाच्या अंताची भविष्यवाणी म्हणणे चुकीचे आहे असे देखील बोलले जात आहे.

29 नोव्हेंबर 1964 रोजी इजिप्शियन वृत्तपत्र 'वतनी'मध्ये एक लेख प्रकाशित झाला होता.  लेखक मिशेल टेकला यांच्या या लेखाच्या शीर्षकातही 13 नोव्हेंबर 2026 रोजी होणाऱ्या जगाच्या अंताचा उल्लेख होता. या लेखाची एक जुनी कात्रण सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये पुन्हा शेअर करण्यात आली. त्यानंतर, सौर क्रियाकलाप, हवामान बदल आणि नैसर्गिक आपत्तींबद्दलच्या चिंतांवरही चर्चा सुरू झाली. मात्र, हा फक्त एक गणितीय सिद्धांत होता.  13 नोव्हेंबर 2026 रोजी जगाच्या विनाशाची तारीख असल्याचा दावा अनेक संशोधकांनी फेटाळून लावला आहे.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
International News
Viral News