• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /लाइफस्टाइल
  • /संध्याकाळच्या भुकेसाठी बेस्ट! घरच्या घरी तयार करा टेस्टी मिनी समोसे

संध्याकाळच्या भुकेसाठी बेस्ट! घरच्या घरी तयार करा टेस्टी मिनी समोसे

तोच बोरिंग नाश्ता खाऊन कंटाळला असाल तर मग आता तुम्हाला आज एक विशेष खास रेसिपी या लेखामध्ये सांगणार आहोत. घरच्या घरी मिनी समोसा कसा तयार करायचा यासंदर्भात तुम्हाला सांगणार आहोत.

Written ByShubhangi MereEdited ByShubhangi Mere
Published: Nov 07, 2026, 10:25 PM IST|Updated: Nov 07, 2026, 10:36 PM IST
joinshare
संध्याकाळच्या भुकेसाठी बेस्ट! घरच्या घरी तयार करा टेस्टी मिनी समोसे

About the Author

Shubhangi Mere

Shubhangi Mere

शुभांगी संतोष मेरे या 'झी २४ तास' डिजिटलमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत असून पत्रकारिता क्षेत्रात त्यांना 3.5 वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. सध्या झी 24 तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवतात. कारकीर्दमध्ये आयसीसी वर्ल्ड कप, इंडियन प्रीमियर लीग सारख्या क्रिकेट स्पर्धा, इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा पत्रकार म्हणून कव्हर केल्या आहेत. याशिवाय मनोरंजन क्षेत्रातील काही महत्त्वाच्या बातम्या त्याचबरोबर लाईफस्टाईल आणि टेक त्राशी निगडित बातम्यांमध्ये सुद्धा त्यांचा हातखंड आहे.डिजिटल मीडियाची कारकीर्द:2023 मध्ये टाईम महाराष्ट्र मधून कामाला सुरूवात केली आहे. काही महिने मीडिया क्षेत्राचा अनुभव घेतल्यानंतर 2023 ते 2026 पर्यंत नवराष्ट्र डिजिटल येथे क्रीडा संबंधी बातम्यांवर, विश्लेषण आणि संशोधनावर काम केले आहे, नवराष्ट्र वेबसाईटसाठी 2.5 वर्ष क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आवडीने मांडल्या. मागील काही वर्ष क्रीडा पत्रकारीतेमध्ये काम केल्यानंतर आता झी 24 तासमध्ये कंटेन्ट सब एडिटर म्हणून क्रीडा विभागात काम करत आहे.भारत क्रीडा पत्रकारिता ही केवळ क्रिकेट पुरतीच मर्यादीत आहे. पण मला या खेरीज टेनिस, कब्बडी, फुटबॉल, आर्चरी, कुस्ती, बॉक्सिंग या विषयात विशेष रुची आहे. या क्षेत्रातील बातम्यांवर प्रभुत्त्व मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. शुभांगी यांना लेखनासोबतच, ट्रॅव्हलिंगची खूप आवड आहे. नवनवीन विषय, ठिकाण तेथील संस्कृती, जीवनशैली इत्यादी विषयांवर अधिकाधिक माहिती घ्यायला त्यांना विशेष रस आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांना विशेष आवड असून त्यांनी आधी स्वत: मैदानावर धावपट्टू धावल्या आहेत.शैक्षणिक पात्रताशुभांगी मेरे यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
खरचं 13 नोव्हेंबर 2026 रोजी जगाचा अंत होणार? 66 वर्षापूर्वीच्या भविष्यवाणीमुळे जगात खळबळ

खरचं 13 नोव्हेंबर 2026 रोजी जगाचा अंत होणार? 66 वर्षापूर्वीच्या भविष्यवाणीमुळे जगात खळबळ

2

‘दिवाळी येत-जात राहील, पण…’; अजित पवारांच्या आठवणीत राजेंद्र पवारांची हळवी पोस्ट, बालपणीच्या आठवणींना उजाळा

3

आधी यूपीएससी आणि मग केबीसीचही स्वप्न भंगलं, मुंबईत चोर कसा बनला इसम? धक्कादायक कहाणी समोर

4

संध्याकाळच्या भुकेसाठी बेस्ट! घरच्या घरी तयार करा टेस्टी मिनी समोसे

5

बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुलीसोबत रंगेहाथ पकडलं! ‘CID’ फेम अभिनेत्रीने सांगितली आठवण; 13 वर्षांपासून एकटी घालवतेय जीवन

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

रोज तेच पोहे, शिरा किंवा उपमा खाऊन अनेकदा कंटाळा येतो त्यामुळे जर तुम्ही रोज तोच तोच बोरिंग नाश्ता खाऊन कंटाळला असाल तर मग आता तुम्हाला आज एक विशेष खास रेसिपी या लेखामध्ये सांगणार आहोत. आपल्याला घरी काहीतरी स्वादिष्ट खाण्याची इच्छा होते आणि आपल्या पाहुण्यांनाही आपल्या हातच्या पदार्थांची चव द्यायची असते; कारण त्यामुळेच आपल्याला प्रशंसा मिळते. आजच्या लेखामध्ये तुम्हाला टेस्टी मिनी समोसे कसे तयार करायचे यासंदर्भात सांगणार आहोत. 

मिनी समोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मैदा – 2 कप
तूप किंवा तेल – गरजेनुसार
अजमोदा – अर्धा चमचा
मीठ – चवीनुसार
पाणी – गरजेनुसार
उकडलेले बटाटे – 4
उकडलेले वाटाणे – अर्धा कप
धणेपूड – 1 चमचा
लाल तिखट – अर्धा चमचा आमचूर
पूड – अर्धा चमचा
जिरे – अर्धा चमचा
गरम मसाला – अर्धा चमचा
बडीशेप – एक चमचा
हिरवी कोथिंबीर – 1 मोठे चमचे

कसा बनवायचा मिनी समोसा?

मिनी समोसा तयार करण्यासाठी सर्वात आधी पीठ मिळून घ्या. त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये मैदा घ्या आणि त्यामध्ये ओवा मीठ आणि 3-4 चमचे तूप घाला. त्यानंतर ते मिश्रण चांगले मिसळून घ्या आणि पाणी घालून ते पीठ चांगले घट्ट मळून घ्या. पीठ मळून झाल्यावर सुमारे 20 मिनिटे बाजूला ठेवा. यानंतर, बटाट्याचे सारण तयार करा. एका कढईत थोडे तेल गरम करून त्यात जिरे आणि बडीशेप घाला. सर्व मसाले, उकडलेले बटाटे आणि वाटाणे घालून ते चांगले कुस्करून घ्या, नंतर, मीठ आणि कोथिंबीर घाला, सारण तयार आहे.

हे ही वाचा

हलवाईसारखी बालुशाही आता घरातच; परफेक्ट चवीसाठी फॉलो करा ही रेसिपी

समोस्याचे सारण तयार केल्यानंतर मळलेल्या पिठाचे लहान लहान गोळे तयार करा आणि ते लाटून घ्या, त्यानंतर ते अर्धे कापून घ्या आणि त्याचे दोन समान भाग करा. प्रत्येक भागामध्ये बटाट्याचे सारण भरा आणि त्यानंतर कडांना पाणी लावून समोशांचा आकार देऊन ते बंद करा. एक महत्त्वाची टीप म्हणजेच समोशाच्या एकमेकांना घट्ट चिकटतील याची काळजी घ्या. आता एका कढईत तेल गरम करा. त्यात समोसे घालून सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. सोनेरी तपकिरी आणि कुरकुरीत झाल्यावर ते एका प्लेटमध्ये काढून ठेवा. तुमचे गरमा गरम मिनी समोसे तयार आहेत.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
recipes
Lifestyle News