क्राईम न्यूज : सिंगापूरमध्ये राहणारा भारतीय भाच्याच्या लग्नसाठी भारतात आला आणि त्याची हत्या झाली आगे. शेजाऱ्यांसोबत झालेल्या किरकोळ वादातून त्याची गोळ्या जाडून हत्या करण्यात आली आहे. फरीदाबादमध्ये घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
फरीदाबादमधील सेक्टर 21 सी येथे शुक्रवारी रात्री पार्किंगच्या वादातून मल्टी नॅशनल कंपनी फपीटी सॉफ्टवेअर कंपनी लिमिटेड’ मध्ये ज्येष्ठ उपाध्यक्ष परमजीत धनखड यांची त्यांच्या शेजाऱ्याने गोळ्या झाडून हत्या केली. परमजीत धनखड हे सिंगापूरमध्ये स्थायिक झाले होते आणि सध्या ते व्हिएतनाम येथे मुख्यालय असलेल्या ‘एफपीटी सॉफ्टवेअर कंपनी लिमिटेड’ मध्ये ज्येष्ठ उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन शर्मा असे नाव असलेल्या संशयित आरोपीने आपली परवानाधारक पिस्तूल काढून धनखड यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्याने सुमारे 15 गोळ्या झाडल्या, ज्यातील नऊ गोळ्या धनखड यांना लागल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. पीडिताचा मुलगा शौर्य धनखड याच्या तक्रारीवरून शनिवारी सुरजकुंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) (खून) आणि आर्म्स ॲक्ट (शस्त्र कायदा) अन्वये एफआयआर (गुन्हा) दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर आरोपी फरार आहे.
एकाच चार मजली इमारतीत राहणाऱ्या या दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पार्किंग आणि पार्किंगच्या जागेत कुत्र्याला शौचास बसवण्यावरून वाद सुरू होता. धनखड हे तळमजल्यावर राहायचे, तर आरोपी दुसऱ्या मजल्यावर राहायचा, अशी माहिती तपासकर्त्यांनी दिली. शर्मा यांचा मुलगा त्यांच्या कुत्र्याला पार्किंगच्या जागेत शौचास बसवायचा, ज्यावर धनखड यांच्या कुटुंबाने वारंवार आक्षेप घेतला होता. या मतभेदांमुळे गेल्या काही दिवसांत त्यांच्यात अनेकदा वाद झाले होते, ज्यात चार-पाच दिवसांपूर्वी झालेल्या एका मोठ्या वादाचाही समावेश होता. परमजीत सिंगापूरमध्ये राहत होता आणि दोन दिवसांपूर्वी त्याच्या भाच्याच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी परत आला होता.