SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

महिलेने थेट आम आदमी पक्षाच्या नेत्यालाच घातला गंडा! लग्नही केलं, अन् अखेर...; हायप्रोफाइल प्रकरणामुळे खळबळ

आप (AAP) नेत्याने असाही दावा केला की, महिलेला तिच्या आधीच्या लग्नापासून 18 वर्षांचा मुलगा आहे. खोटी ओळख आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या आधारे आपली फसवणूक करण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Oct 06, 2026, 08:27 PM IST | Updated: Oct 06, 2026, 08:30 PM IST
Join

पंजाबमधील 'आम आदमी पार्टी'च्या (AAP) एका नेत्याची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. महिलेने आपण पीसीएस अधिकारी असल्याची खोटी बतावणी केली होती. तसंच आपण अविवाहित असल्याचे भासवून या नेत्याशी लग्न केले. मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच ती सोने-चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू घेऊन पसार झाली. 'आप'चे सहसचिव अमरिंदर सिंग मांडोफल यांनी हा आरोप केला आहे. त्या महिलेने आणि तिच्या कुटुंबीयांनी ती 'पीसीएस' अधिकारी असल्याचे सांगितले होते आणि तिचे वयही खोटे सांगितले होते, असेही सिंग यांनी नमूद केले.

सिंग यांनी मनविंदर कौरशी फेब्रुवारी 2026 मध्ये विवाह केला होता. या विवाह सोहळ्याला पंजाब विधानसभेचे अध्यक्ष कुलतार सिंग संधवान आणि कॅबिनेट मंत्री तरुणप्रीत सिंग सौंद यांच्यासह 'आप'चे अनेक प्रमुख नेते व लोकप्रतिनिधी उपस्थित होते. लग्नानंतर ती महिला सोने-चांदीचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू घेऊन घर सोडून निघून गेली, असा आरोप 'आप'च्या या नेत्याने केला आहे.

अमरिंदर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी नंतर त्या महिलेबद्दल माहिती मिळवली आणि त्यांना असे समजले की ती पूर्वी विवाहित होती आणि तिचा घटस्फोट झाला आहे. तसेच, तिला 18 वर्षांचा मुलगा असल्याचेही त्यांनी सांगितले. खोटी ओळख आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन आपल्याला लग्नासाठी फसवण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला आहे.

त्यांच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी कौरसह सहा जणांविरुद्ध फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. एफआयआरमध्ये (FIR) नमूद केलेल्या इतर आरोपींमध्ये तिचा भाऊ तरलोचन सिंग, आई वरिंदरजित कौर, चुलत भाऊ नरिंदर सिंग गोल्डी, वहिनी रुपिंदर कौर आणि गावाचे माजी सरपंच सुरिंदर सिंग राणा यांचा समावेश आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सर्व आरोपी तरन तारण जिल्ह्यातील भिखीविंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 'सुर सिंग' गावचे रहिवासी आहेत.

फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या या विवाहसोहळ्याला 'आप'चे (AAP) अनेक नेते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहिल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. या समारंभातील काही फोटो आणि व्हिडिओही समोर आले होते, ज्यामध्ये राजकीय नेते नवविवाहित जोडप्यासोबत आनंद साजरा करताना आणि 'भांगडा' करताना दिसत होते.

सिंह हे जिल्हा परिषदेचे सदस्य आणि सिरहिंद बाजार समितीचे सभापतीही आहेत. या हाय-प्रोफाईल विवाहसोहळ्यानंतर काही महिन्यांनी हे आरोप समोर आले असून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि यात नाव असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा

ZEENEWS TRENDING STORIES