• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /रिक्षा चालकाचे नशीब फळफळले! खोदकाम करताना सापडला 3.17 कॅरेटचा हिरा, किंमत तब्बल...

रिक्षा चालकाचे नशीब फळफळले! खोदकाम करताना सापडला 3.17 कॅरेटचा हिरा, किंमत तब्बल...

एका रिक्षा चालकाचे नशीब रातोरात चमकले आहे. खोदकाम करताना त्याला 3.17 कॅरेटचा हिरा सापडला आहे.

Written ByMansi KshirsagarEdited ByMansi Kshirsagar
Published: Nov 21, 2026, 12:56 IST|Updated: Nov 21, 2026, 12:58 IST
joinshare
रिक्षा चालकाचे नशीब फळफळले! खोदकाम करताना सापडला 3.17 कॅरेटचा हिरा, किंमत तब्बल...
Image Credit: auto rickshaw driver finds 317 carat diamond in a mine got 15 lakh

About the Author

Mansi Kshirsagar

Mansi Kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

2

मुंबईत मॅनहोलच्या एका झाकणासाठी 25 हजार रुपये! चोरी रोखण्यासाठी BMC आणणार नवी यंत्रणा!

3

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

4

रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स

5

सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर PM मोदींची पुन्हा मोठी भविष्यवाणी, पुढील 20 वर्षांचं सांगितलं भाकीत

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मध्य प्रदेशातील एका छोट्याश्या गावातील रिक्षा चालकाचे नशीब फळफळले आहे. रिक्षा चालक सोनू रॅकवार याला लॉटरी लागली आहे. हिऱ्यांचे शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पन्ना गावाने सोनूला एका रात्रीत मालामाल बनवलं आहे. खोदकाम करताना त्यांना 3.17 कॅरेटचा हिरा सापडला आहे. आता हा हिरा त्यांनी कार्यालयात जमा केला आहे.

हिरा पारखी अनुपम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिऱ्याची किंमत अंदाजे 15 लाख  इतकी आहे. हिरा कार्यालयात आत्तापर्यंत 175 हिरे जमा करण्यात आले असून त्यांचे एकूण वजन 387.21 कॅरेट असून अंदाजे 3 कोटी रुपये किंमत असू शकते. हिऱ्यांची अंतिम लिलाव डिसेंबर 2024 मध्ये झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनूला गेल्या महिन्याभरापासून स्वप्न पडत होते की त्याला हिरा सापडला आहे. त्याने कुटुंबाला जेव्हा ही गोष्ट सांगितली तेव्हा कुटुंबाने त्याला खाण सुरु करण्याची कल्पना दिली होती. त्यानंतर त्यांनी हिरा कार्यालय ते रानीपुर क्षेत्रात पहिल्यांदा खाणकाम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर 15 दिवसांत त्याला मेहनतीचे फळ मिळाले.

सोनूला खाणीत 3.17 कॅरेटचा हिरा मिळाला होता. या हिऱ्याची किंमत 11 ते 15 लाख रुपये सांगितली जात आहे. सोनुच्या म्हणण्यानुसार, लिलावातून मिळालेल्या रक्कमेतून तो आणखी खाण सुरू करण्यात आल्याचा त्यानी म्हटलं आहे. कारण त्यांना आताही हिरा मिळण्याची स्वप्न येतात.

पन्ना येथे हिरे का सापडतात?

मध्य प्रदेशातील पन्ना येथे अतीव दाब आणि उष्णतेखाली तयार झालेले किंबरलाइट खडकांचे थर आणि गाळाचे साठे असल्यामुळे नैसर्गिक हिरे मोठ्या प्रमाणात मिळतात. पन्ना हा विंध्य खोऱ्याच्या उत्तर भागात स्थित असून, येथील मझगवां आणि हिनोता येथील किंबरलाइट पाईप्स तसेच गाळाच्या मातीमध्ये हिऱ्यांचे साठे आढळतात.

देशातील उपलब्ध हिऱ्यांच्या साठ्यांपैकी मोठा हिस्सा मध्य प्रदेशात (प्रामुख्याने पन्ना परिसरात) आहे.  सरकारी नियमांनुसार लहान जमिनीचा पट्टा घेऊन स्थानिक लोक माती चाळून हिऱ्यांचा शोध घेतात आणि सापडलेले हिरे सरकारी कार्यालयात जमा करून लिलावाद्वारे विकले जातात.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी मोतीलाल यांना 1.5 कोटी रुपयांचा हिरा सापडला होता. 2018 साली मध्य प्रदेशातील बुंदेलखंडमध्ये मिळेल ते काम करून जेमतेम उदरनिर्वाह करणाऱ्या एका 50 वर्षीय व्यक्तीचे नशीब रातोरात उजळले होते. मोतीलाल प्रजापती यांनी एक भूखंड भाड्याने घेतला आणि काही आठवड्यांतच त्यांचे नशीब उजळले. त्यांना अंदाजे1.5 कोटी रुपये किमतीचा एक हिरा सापडला. त्यांनी भोपाळपासून 413 किलोमीटर अंतरावर असलेल्या पन्नाच्या हिऱ्यांच्या खाण प्रदेशातील कृष्णा कल्याणपूर पट्टी गावाजवळ 25 चौरस फुटांचा भूखंड भाड्याने घेतला होता. त्या भूखंडाने रातोरात त्यांचे आयुष्य बदलून टाकले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india
Gold Price
Marathi Batmya