SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

बंगळुरू सामूहिक हत्याकांडात धक्कादायक ट्विस्ट; 7 जणांसोबत अजून 2 जणांच्या हत्येचा होता कट, त्या अल्पवयीन मुलीने...

बंगळुरूमधील एकाच कुटुंबातील 7 जणांची 19 दिवसात हत्या करण्यात आली. पोलिसांनी त्या नराधमाला अटक केली आहे. पण अजून दोन जणांना मारण्याचा त्याचा कट होता.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 07, 2026, 01:26 PM IST | Updated: Nov 07, 2026, 01:29 PM IST
Image Credit: Bengaluru mass murder case
Join


कर्नाटकातील बंगळुरूमधील श्रीरामपुरामधील सामूहिक हत्याकांडामुळे देश हादरला आहे. एका 52 वर्षीय नरामधमाने पत्नीसह सासू, दोन मेहुणे, त्यांच्या बायका आणि एका लहान मुलाची हत्या केली आहे. या नराधमाला पोलिसांनी अटक केली आहे. पण या प्रकरणात धक्कादायक ट्विस्ट समोर आलं आहे. त्याला अजून दोन जणांची हत्या करायची होती पण त्यापूर्वी त्याला अटक झाली. हा नराधम एक टॅक्सी चालक असून त्याचे नाव इंदुशेखर आहे.

न्यूज 18 कन्नडच्या वृत्तानुसार शेखरला या भयानक हत्याकांडात त्याला 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने मदत केली आहे, असा आरोप पोलिसांच्या तपासात समोर आला आहे. पोलिसांच्या कथित जबाबानुसार या अल्पवयीन मुलीने इंदुशेखरला मृतदेह बाहेर नेणे, ते पिशव्यांमध्ये भरणे आणि रक्ताचे डाग साफ करण्यात मदत केल्याचा तपासातून समोर आला आहे. ही अल्पवयीन मुलगी इंदुशेखरची मुलगी आहे. तपासातून असं समोर आलंय की,  इंदुशेखरने आपल्या मुलीवर सतत आईच्या माहेरीच्या लोकांबद्दल द्वेष भरला होता. त्यामुळे या मुलीनेही मानलं होतं की, आईच्या कुटुंबातील लोक हे आपले शत्रू आहेत. म्हणून या अल्पवयीन मुलीने आपल्या इंदुशेखरला हत्या करण्यासाठी मदत केली. बुधवारी जेव्हा इंदुशेखरला अटक झाली त्याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगा सापडला होता. तो त्याचा आठवा बळी ठरला असता.

पोलिसांनी सांगितलं की, या हत्या 16 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2026 दरम्यान झाल्या आहेत. या सात जणांमध्ये इंदुशेखरची पत्नी सुनीता, सासू रुपावती, मेहुणे शिवकुमार आणि शंकर, त्यांच्या पत्नी दिव्या आणि नलिनी, शिवकुमारचा सात वर्षांचा मुलगा पुनीत हे आहेत. धक्कादायक म्हणजे पुनीतचा मृतदेह सापडला आहे. पण इतर मृतदेह अजून सापडले नाहीत. इंदुशेखरने हे सर्व मृतदेह शव चिकबल्लापूर जिल्ह्यातील नंदी हिल्स आणि किनारपट्टीवरील कर्नाटकच्या चर्माडी घाट अशा विविध ठिकाणी फेकून दिले आहेत. त्यामुळे हे शोधण्यात पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

त्याने एक एक व्यक्तीला आपल्या बसवेश्वर सर्कलजवळील एका निवासी भागात बोलावून त्यांची हत्या केली. पत्नीची हत्या पहिले केली. त्यानंतर सासूची हत्या केली. त्यानंतर पार्टीच्या बहाण्याने मेहुण्यांचा कुटुंबियांना घरी बोलावलं आणि त्यांची हत्या केली. इंदुशेखरने पोलिसांना दिलेल्या जबाबमध्ये सांगितलं की, त्याचे हत्याचे लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर तो स्वत:चाही जीव देणार होता. धक्कादायक म्हणजे तो हत्या करताना घरातील टीव्हीचा आवाज मोठा ठेवायचा. जेणे करून पीडिताचे ओरडणे घराबाहेर कोणाला ऐकू येऊ नये.

हे हत्याकांड कौटुंबिक वादातून झाल्याचे बोलं जातंय. 20 वर्षांच्या संसारात इंदुशेखर आणि त्याची पत्नी सुनीतामध्ये वादविवाद व्हायचे. सुनीताचा कल जास्त करून माहेरी असायचा. ती वरच्यावर माहेरी जात होती. नवरा बायकोमध्ये 12 वर्षांचा फरक होता. त्यामुळे बायको इंदुशेखरला मुडुका म्हणजे म्हातारा असं म्हणायची. या रागातून इंदुशेखर याने या हत्या केल्या आहेत. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.

ZEENEWS TRENDING STORIES