SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

नेहा बोरा आणि अभिजीत दिपके बोलत असताना तुफान राडा; सीजेपीच्या पत्रकार परिषदेत हायव्होल्टेज ड्रामा

दिल्लीत सीजेपीची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत तुफान राडा झाला. नेहा बोरा आणि अभिजीत दिपके बोलत असताना या पत्रकारांनी प्रश्न विचारत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

Written By Vanita Kamble Edited By Vanita Kamble
Published: Oct 15, 2026, 03:50 PM IST | Updated: Oct 15, 2026, 03:56 PM IST
Join

सीजेपी पत्रकार परिषद : दिल्लीत सीजेपीच्या पत्रकार परिषदेत तुफान राडा झाला.  नेहा बोरा आणि अभिजीत दिपके बोलत असताना काही पत्रकारांनी अचानक प्रश्न विचारल्यानं मोठा गोंधळ झाला. उपस्थित पत्रकारांनी सीजेपीच्या नेत्यांचं संबोधन पूर्ण होऊ द्या नंतर प्रश्न विचारा असं समजावून सांगितलं तरी पत्रकारांचे प्रश्न सुरूच होते.  या गोंधळानंतर सदर रिपब्लिक टीव्हीच्या पत्रकारांना प्रेस क्लबमधून बाहेर काढण्यात आले. या पत्राकार परिषदेत नेहा बोरा आणि अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. मोदी सरकारा ज्ञानेश कुमार यांचा बचाव करत असल्याचा गंभीर आरोप केला. 
दिल्लीच्या रस्त्यांवर सर्वसामान्यांना फरफटत नेण्यात आले. मात्र, आमचे आंदोलन थांबणार नाही असा निर्धार नेहा बोरा यांनी व्यक्त केला. 

या पत्रकार परिषदेत अभिजीत दिपके देखील चांगलेच आक्रमक झाले.  एका ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी ममता बॅनर्जी, विद्यार्थी आणि अनेक लोकांना ताब्यात घेण्यात आले. ज्ञानेश कुमार यांच्यासाठी एवढा मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला. संपूर्ण दिल्ली ठप्प करण्याची तयारी आहे. ज्ञानेश कुमार यांच्यासाठी असं काय केलं जात आहे? जंतरमंतरवर सौरभ आणि आशुतोष गेले, तेव्हा त्यांना तिरंगा फडकवण्यापासून रोखण्यात आले. ज्ञानेश कुमार यांच्यासाठी एवढा बंदोबस्त का? त्यांना इतकं महत्त्व का दिलं जात आहे? असे प्रश्न अभिजीत दिपके यांनी उपस्थित केले. 

13 कोटी मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. हा सगळा संगनमताचा प्रकार नसेल, तर दुसरं काय आहे? बंगळुरूमध्ये मला असे लोक भेटले, ज्यांना जिवंत असूनही मृत घोषित करण्यात आले होते. ज्ञानेश कुमार यांनी त्यांना मृत घोषित केले. अखेर असं का? मोदींमध्ये आणीबाणी लागू करण्याचीही हिंमत नाही. अधिकृतपणे आणीबाणी जाहीर करून टाका! पण त्यांना जनतेच्या प्रतिमेची भीती वाटते. परदेशात लोक काय म्हणतील, याची त्यांना चिंता आहे. तिरंगा फडकवण्याला कायद्याचे उल्लंघन म्हटले जात आहे.

‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही केवळ एक घोषणा होती. खरा उद्देश आहे ‘एक देश, एक पक्ष; एक देश, एकच पक्ष!’ सरकारमध्ये बसलेल्या लोकांना आधीपासूनच तिरंग्याची अडचण आहे. यांच्यापैकी कुणाचाही नेता स्वातंत्र्यलढ्यात नव्हता. त्यांच्या शाखांमध्ये कधीही तिरंगा फडकवला जात नव्हता. नरेंद्र मोदी कितीही प्रयत्न करू देत, त्यांची महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जवाहरलाल नेहरू यांच्या बरोबरीने उभे राहण्याची पात्रता नाही असा घणाघात अभिजीत दिपके यांनी केला.  आम्ही सर्वजण तिरंगा घेऊन जाणार. त्यानंतरही पोलीस असंच वागतात का, ते पाहू. आम्ही थांबणार नाही असं ऐशा घोष म्हणाले. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.

ZEENEWS TRENDING STORIES