SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

'बचके तू रहना रे..', पुणे कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदारला दिला होता इशारा; बब्याचं इंस्टा रिल चर्चेत

पुणे कोर्टाबाहेर मंदार किवळेवर झालेल्या हल्ल्यानंतर ‘किंग ऑफ कात्रज’ अकाउंटवरील ‘बचके तू रहना रे’ रील चर्चेत आली आहे. वकील शुभांगी परुळेकर यांनी न्यायालयाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले.

Reported By Pravin Dabholkar Written By Pravin Dabholkar
Published: Nov 25, 2026, 19:30 IST | Updated: Nov 25, 2026, 19:43 IST
Image Credit: पुणे कोर्टाबाहेर हल्ला प्रकरण
Join

पुण्यातील न्यायालयाबाहेर मंदार किवळे याच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सोशल मीडियावरील एका रीलची चर्चा सुरू झाली आहे. हल्ल्याच्या पाच दिवस आधी ‘किंग ऑफ कात्रज’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ‘बचके तू रहना रे’ या गाण्यासह रील पोस्ट करण्यात आल्याचा दावा केला जातोय. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

काय घडलंय नेमकं?

‘किंग ऑफ कात्रज’ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून बब्या पवार याने ‘बचके तू रहना रे’ या गाण्याचा वापर करून रील पोस्ट केल्याचे दिसतंय. ही रील मंदार किवळेवरील हल्ल्याच्या पाच दिवस आधी पोस्ट करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. त्यामुळे या रीलची चर्चा सुरू झाली आहे.

मंदारवर हल्ला

मंदार किवळे हा शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील आरोपी होता. या प्रकरणात तुरुंगात असलेल्या मंदारला 21 नोव्हेंबर रोजी जामीन मिळाला. बुधवारी, 25 नोव्हेंबर रोजी तो न्यायालयीन कामकाजासाठी शिवाजीनगर न्यायालयात आला होता. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर दुपारी सव्वा एकच्या सुमारास त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी वार केले. घटनास्थळावरून पोलिसांनी दोन पिस्तुले आणि मॅगझिन जप्त केले. गंभीर जखमी मंदारला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य असण्याची शक्यता पोलीस तपासत आहेत.

चव्हाण टोळीशी संबंधित व्यक्तींवर संशय

या हल्ल्यामागे शुभम चव्हाण हत्या प्रकरणातून निर्माण झालेल्या वैमनस्याचा संबंध असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. राहुल चव्हाण, अमोल चव्हाण, गणेश चव्हाण आणि रोहन कानगुडे अशी चार नावे हल्ल्यातील आरोपी म्हणून दिली जात आहेत.

‘हल्ल्यावेळी मदतीसाठी कोणी पुढे आले नाही’

मंदार किवळे यांची वकील अ‍ॅड. शुभांगी परुळेकर यांनी न्यायालयाबाहेर झालेल्या या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली. मंदार न्यायालयात हजेरीसाठी आला असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हल्ल्याच्या वेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी मदतीसाठी पुढे येण्याऐवजी मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रीकरण केले, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. न्यायालयाच्या परिसरात अशा प्रकारे हल्ला होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी म्हटले.

न्यायालयाबाहेरील सुरक्षा वाढवण्याची मागणी

जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींना न्यायालयात हजेरी लावणे बंधनकारक असते. मात्र, हजेरीसाठी आलेल्या व्यक्तीवरच हल्ला होत असेल, तर हा सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न असल्याचे परुळेकर यांनी सांगितले. न्यायालयाबाहेरील पोलीस बंदोबस्त वाढवण्याची आणि जामिनावरील आरोपींना प्रत्यक्ष हजेरीतून सूट देण्याबाबत न्यायालयाने विचार करण्याची मागणी त्यांनी केली. शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील अन्य एका जामिनावरील आरोपीवरही अशाच प्रकारे हल्ला होण्याची भीती असल्याचे त्यांनी नमूद केले.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES