• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /पुणे
  • /देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचं पालकत्व घ्यावं; पुण्यातील रक्तरंजित थरारानंतर सुप्रिया सुळेंची मोठी मागणी; 'अजितदादा असताना...'

देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचं पालकत्व घ्यावं; पुण्यातील रक्तरंजित थरारानंतर सुप्रिया सुळेंची मोठी मागणी; 'अजितदादा असताना...'

मुख्यमंत्र्यांनी पुण्याची जबाबदारी स्वत: घ्यावी, पालकत्व घ्यावं. कारण पुण्याला हे न शोभणारं, झेपणारं आहे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 25, 2026, 19:23 IST|Updated: Nov 25, 2026, 19:32 IST
joinshare
देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचं पालकत्व घ्यावं; पुण्यातील रक्तरंजित थरारानंतर सुप्रिया सुळेंची मोठी मागणी; 'अजितदादा असताना...'
Image Credit: देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचं पालकत्व घ्यावं; सुप्रिया सुळेंची मागणी

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
तरुणीला उचलून हॉटेलात नेणाऱ्या सलमानचा हाफ एन्काऊंटर! पोलिसांनी ठोकल्या बेड्या, चौकशीत धक्कादायक खुलासे

तरुणीला उचलून हॉटेलात नेणाऱ्या सलमानचा हाफ एन्काऊंटर! पोलिसांनी ठोकल्या बेड्या, चौकशीत धक्कादायक खुलासे

2

'बचके तू रहना रे..', पुणे कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदारला दिला होता इशारा; बब्याचं इंस्टा रिल चर्चेत

3

देवेंद्र फडणवीसांनी पुण्याचं पालकत्व घ्यावं; पुण्यातील रक्तरंजित थरारानंतर सुप्रिया सुळेंची मोठी मागणी; 'अजितदादा असताना...'

4

पुण्यात कोर्टाबाहर भरदिवसा गोळीबार; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी डायरेक्ट पोलिसांना आदेश दिले

5

मोठी बातमी! 80.15 कोटींच्या बँक घोटाळा! CBI कडून स्टार हाऊसिंग फायनान्सवर छापा

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

पुण्यातील रक्तरंजित थरारमुळे राज्य हादरलं आहे. शिवाजीनगर कोर्टाबाहेर मंदार किवळेवर 5 ते 6 जणांनी आधी गोळीबार केला. नेम चुकल्यानंतर कोयत्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला... या हल्ल्यात मंदार किवळे गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक म्हणजे या हल्ल्यामागे शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील जुन्या वैमनस्याचा संशय व्यक्त होत आहे. 4 दिवसांपूर्वीच मंदार किवळे कारागृहातून बाहेर आला होता. या घटनेनंतर पुण्यातील टोळीयुद्धाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुण्याची जबाबदारी घेण्याची विनंती केली आहे.

सुप्रिया सुळेंनी काय म्हटलं आहे?

"मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलं आहे. हा राजकीय विषय नसून, जरी ते गृहमंत्री असले तरी मला टीका करायची नाही. मला हा विषय फार गांभीर्याने घ्यायचा आहे. देशातील वेगाने विकसित होणारं शहर म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं. अनेक मोठ्या शैक्षणिक संस्था पुण्यात आहेत. मोठी उलाढाल, व्यवसाय पुण्यात होत असताना गुन्हेगारी इतकी वाढणं हे पुणे शहर नाही, राज्य नाही तर देशाच्या हिताचं नाही," अशी भावना सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे.

"पुण्यातील राजीव गांधी इंफोटेक पार्क येते 6 लाख काम करतात. त्या पुण्यात घडलेली घटना चिंताजनक आहे. लोकप्रतिनिधी, महिला आणि पुण्याची नागरिक म्हणून माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, आपण पुण्याची जबाबदारी स्वत: घ्यावी, पालकत्व घ्यावं. कारण पुण्याला हे न शोभणारं, झेपणारं आहे".

"माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर प्रचंड प्रेम, विश्वास आहे. मला पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. पण तेच पोलीस पुण्यात आल्यावर काय होतं? पुण्यातील पोलीस प्रमुखांना याचं उत्तर द्यावं लागेल, मुख्यमंत्र्यांनी सर्वांच्या वतीने अधिकाऱ्यांना जाब विचारावा," अशी मागणीही त्यांनी केली आहे.

"पुण्याची आताची परिस्थिती फार चिंताजनक असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून मार्ग काढला पाहिजे. दादा (अजित पवार) अनेक वर्ष पालकमंत्री होता, पण कधी इतका क्राइम नव्हता जितका मागील काही वर्ष आणि महिन्यात झाला आहे," असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.

सुप्रिया सुळेंची पोस्ट

याआधी सुप्रिया सुळेंनी पोस्ट शेअर केली होती. त्यात त्यांनी म्हटलं होतं की, "विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी आणि सुरक्षित शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या पुण्याची ओळख आज गुन्हेगारीचे आणि दहशतीचे शहर अशी होत चालली आहे, ही अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी बाब आहे.  पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयाच्या परिसरात आज भरदिवसा एका व्यक्तीवर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार करण्यात आले. ही घटना पुणेकरांच्या आणि एकंदरीत शहराच्या सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे".

"न्यायालय हे सर्वसामान्य माणसासाठी 'न्यायदानाचे मंदिर' असते. जिथे प्रत्येक नागरिक न्यायाच्या आणि संरक्षणाच्या अपेक्षेने येतो, त्याच पवित्र वास्तूच्या परिसरात जर भरदिवसा रक्ताचा सडा पडत असेल, तर सर्वसामान्य पुणेकरांनी कोणाकडे पाहायचे? विशेष म्हणजे, या परिसरात पोलीस चौकी आहे, सुरक्षा बंदोबस्त आहे आणि पोलिसांची सततची वर्दळ असते. तरीही भरदिवसा शस्त्रे घेऊन येण्याची आणि खून करण्याची हल्लेखोरांची हिंमत होतेच कशी? गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नाही, हेच यावरून स्पष्ट होते," अशी टीका त्यांनी केली.

गेल्या काही काळापासून पुण्यात कोयता गँगची दहशत, गोळीबाराच्या घटना, भररस्त्यात होणारे खून आणि महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कायदा आणि सुव्यवस्था नावाची चीज पुण्यात शिल्लक उरली आहे की नाही, असा गंभीर प्रश्न आता प्रत्येक पुणेकर विचारत आहे. पुण्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीनतेरा वाजले आहेत. जर न्यायालयासारख्या अतिसंवेदनशील ठिकाणीच नागरिक सुरक्षित नसतील, तर शहरातील इतर भागांत राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या जीवाची हमी कोण घेणार? अशी विचारणा त्यांनी केली आहे.

पोलीस प्रशासन नेमके काय करत आहे? गुन्हेगारांवर जरब बसवण्यात पुणे पोलीस आणि गृहखाते पूर्णपणे अपयशी ठरले आहे का? केवळ आश्वासने देऊन किंवा कागदोपत्री कारवाया करून शहरातील गुन्हेगारी थांबणार नाही. पुणे पोलीस आयुक्तांनी आणि राज्याच्या गृहखात्याने या घटनेचे गांभीर्य ओळखून यातील सर्व गुन्हेगारांना तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच, शहरातील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था तातडीने पूर्वपदावर आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत, जेणेकरून सर्वसामान्य पुणेकरांना पुन्हा एकदा निर्भयपणे जगता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Supriya Sule
Devendra Fadnavis
Pune