• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /मोठी बातमी! 80.15 कोटींच्या बँक घोटाळा! CBI कडून स्टार हाऊसिंग फायनान्सवर छापा

मोठी बातमी! 80.15 कोटींच्या बँक घोटाळा! CBI कडून स्टार हाऊसिंग फायनान्सवर छापा

80.15 कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयकडून स्टार हाऊसिंग फायनान्सवर छापा टाकण्यात आला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 25, 2026, 18:40 IST|Updated: Nov 25, 2026, 18:43 IST
joinshare
मोठी बातमी! 80.15 कोटींच्या बँक घोटाळा! CBI कडून स्टार हाऊसिंग फायनान्सवर छापा
Image Credit: CBI कडून स्टार हाऊसिंग फायनान्सवर छापा

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
मोठी बातमी! 80.15 कोटींच्या बँक घोटाळा! CBI कडून स्टार हाऊसिंग फायनान्सवर छापा

मोठी बातमी! 80.15 कोटींच्या बँक घोटाळा! CBI कडून स्टार हाऊसिंग फायनान्सवर छापा

2

सोनं खरं की खोटं? सोनाराकडे जाण्याची गरज नाही; घरबसल्या काही मिनिटांत ओळखा शुद्धता!

3

शिंदेंच्या वकिलांना आता कोर्टात बोलता येणार नाही, एका तासात शिवसेनेची सुनावणी संपेल? असिम सरोदे यांचा सर्वात मोठा दावा

4

'...मग अडीच वर्षे तुम्ही सरकारमध्ये काय करत होता?', सुप्रीम कोर्टात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित; शिंदेंची कोंडी? म्हणाले 'ठाकरेंची वागणूक...'

5

1.22 कोटींची फसवणूक करूनही भामटा कंगाल! SIM कार्डमुळे समोर आलं कांड; नाशिकमध्ये काय घडलं?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

80.15 कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी सीबीआयकडून स्टार हाऊसिंग फायनान्सवर छापा टाकण्यात आला आहे. उदयपूर आणि मुंबईतील सहा ठिकाणी सीबीआयकडून छापेमारी करण्यात आली आहे. कंपनीचे संचालक आणि संबंधित व्यक्तींच्या ठिकाणांची झडती यावेळी घेण्यात आली.  बनावट कर्जांच्या माध्यमातून नॅशनल हाऊसिंग बँकेची 80.15 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

कर्जाच्या नावाखाली वितरित केलेली रक्कम अन्यत्र वळवल्याचा ठपका ठेवण्यात आला असून,  नॅशनल हाऊसिंग बँकेच्या तक्रारीवरून सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. छापेमारीत महत्त्वाची कागदपत्रे आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आलं आहे. आरोपींच्या यादीतआशिष जैन, कविश जैन, अनिल कृष्णन सचिदानंद आणि निर्मल कुमार जैन यांची नावे आहेत. फसवणूक, कटकारस्थान, विश्वासघात आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी केली जात आहे.

सीबीआयने बुधवारी उदयपूर आणि मुंबईतील सहा ठिकाणी शोधमोहीम राबवली असून, ही ठिकाणे 'स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड'च्या माजी संचालकांशी संबंधित आहेत. नॅशनल हाऊसिंग बँकेने दाखल केलेल्या एफआयआरच्या (FIR) आधारे ही कारवाई करण्यात आली असून, यात 80.15 कोटी रुपयांच्या कथित बँक फसवणुकीचा आरोप आहे.

'स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड' आणि त्यांच्या संचालकांवर गुन्हेगारी कट रचणे, फसवणूक करणे आणि बनावट कर्जाद्वारे निधी वळवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या कथित फसवणुकीमुळे नॅशनल हाऊसिंग बँकेचे 80.15 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

'स्टार हाऊसिंग फायनान्स'विरुद्ध सीबीआयची एफआयआर (FIR) नोंद

नॅशनल हाऊसिंग बँकेकडून प्राप्त झालेल्या लेखी तक्रारीच्या आधारे, सीबीआयने 'स्टार हाऊसिंग फायनान्स लिमिटेड', तिचे संचालक आणि काही अज्ञात सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवली आहे. सीबीआयच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, "तक्रारीत असा आरोप करण्यात आला आहे की, कर्ज घेणाऱ्या कंपनीने बनावट कर्जे (फँटम लोन) मंजूर करून निधीची अफरातफर केली, ज्यामुळे नॅशनल हाऊसिंग बँकेचे 80.15कोटी रुपयांचे नुकसान झाले. या छाप्यात तपासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आक्षेपार्ह दस्तऐवज आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे."

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Breaking News