• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /मुंबई
  • /शिंदेंच्या वकिलांना आता कोर्टात बोलता येणार नाही, एका तासात शिवसेनेची सुनावणी संपेल? असिम सरोदे यांचा सर्वात मोठा दावा

शिंदेंच्या वकिलांना आता कोर्टात बोलता येणार नाही, एका तासात शिवसेनेची सुनावणी संपेल? असिम सरोदे यांचा सर्वात मोठा दावा

शिंदेंच्या वकिलांना आता कोर्टात बोलता येणार नाही, एका तासात शिवसेनेची सुनावणी संपेल? असिम सरोदे यांनी आजच सांगितले उद्या कोर्टात काय होणार?

Reported ByVanita Kamble
Published: Nov 25, 2026, 18:37 IST|Updated: Nov 25, 2026, 18:49 IST
joinshare
शिंदेंच्या वकिलांना आता कोर्टात बोलता येणार नाही, एका तासात शिवसेनेची सुनावणी संपेल? असिम सरोदे यांचा सर्वात मोठा दावा

About the Author

Vanita Kamble

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. जय महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून डिजीटल क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. यानंतर  tv9 मराठी, साम टीव्ही,  नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.शैक्षणिक पात्रतावनिता कांबळे यांनी मुंबईच्या किर्ती महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) चे शिक्षण पूर्ण केले आहे.  मुंबई विद्यापिठातून त्यांनी पत्रकारितेची (journalism) पदवी मिळवली आहे. वनिता कांबळे यांना लेखनासह पर्यटनाची आवड आहे. नव्या शहरांना भेट देऊन तसेच नव्या ठिकाणी जाऊन तेथील संस्कृती पर्यटनस्थळांची माहिती गोळा करण्याची आवड आहे. यासह महाराष्ट्रातील तसेच भारतातील अनोखी गावं.... जसं की मधाचं गाव, पुस्तकांचे गाव, तसेच विशिष्ट प्रकारच्या पंरपरा जपणारी गावं यांची माहिती मिळवण्याची आवड आहे. आपल्या लेखांच्या माध्यमातून त्या विविध पर्यटनस्थळांची माहिती वाचकांपर्यत पोहचवतात. अनेकदा व्हर्च्युअल टूरच्या (Virtual Tour) माध्यमातून महाराष्ट्र, भारत तसेच जगभरातील पर्यटनस्थळांची माहिती जाणून घेऊन त्या अगदी सहज सोप्या आणि फोटो गॅलरीच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचवतात. वनिता कांबळे यांना पर्यटनासह भौगोलिक घटना, ऐतिहासीक  घटना, सायन्स आणि टेक्नोलॉजी विषयाची देखील विशेष आवड आहे. या अनुषंगाने त्या स्पेस अर्थात अंतराळातील घडामोडी,  नवे संशोधन तसेच या संबधीत नवी माहिती लेखाच्या रुपात वाचकांपर्यंत पोहचवतात.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
मोठी बातमी! 80.15 कोटींच्या बँक घोटाळा! CBI कडून स्टार हाऊसिंग फायनान्सवर छापा

मोठी बातमी! 80.15 कोटींच्या बँक घोटाळा! CBI कडून स्टार हाऊसिंग फायनान्सवर छापा

2

सोनं खरं की खोटं? सोनाराकडे जाण्याची गरज नाही; घरबसल्या काही मिनिटांत ओळखा शुद्धता!

3

शिंदेंच्या वकिलांना आता कोर्टात बोलता येणार नाही, एका तासात शिवसेनेची सुनावणी संपेल? असिम सरोदे यांचा सर्वात मोठा दावा

4

'...मग अडीच वर्षे तुम्ही सरकारमध्ये काय करत होता?', सुप्रीम कोर्टात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित; शिंदेंची कोंडी? म्हणाले 'ठाकरेंची वागणूक...'

5

1.22 कोटींची फसवणूक करूनही भामटा कंगाल! SIM कार्डमुळे समोर आलं कांड; नाशिकमध्ये काय घडलं?

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

Asim Sarode On Shivsena Supreme Court Hearing : सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी सुरु आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून  जोरदार युक्तीवाद करण्यात आला आहे. आता ही सुनावणी  अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद करत शिंदेंच्या शिवसेनेला घेरलं आहे. कपिल सिब्बल  पुन्हा एकदा बाजू मांडणार आहेत. शिंदेंच्या वकिलांना आता कोर्टात बोलता येणार नाही. एका तासात शिवसेनेची सुनावणी संपेल असं म्हणत  वकिल असिम सरोदे यांनी पुढील सुनावणीत कोर्टात काय होणार याबाबत मोठा दावा केला आहे.  

सुनावणी दरम्यान असीम सरोदे  सुप्रीम कोर्टात हजर होते. यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना आजच्या सुनावणीत उपस्थित झालेले मुद्दे तसेच पुढील सुनावणीत काय होणार यावर भाष्य केले.  राहुल नार्वेंकर यांना विधानसभा अध्यक्ष करणे पक्ष विरोधी कृती आहे.  शिवसेनेच्या फुटीर आमदारांनी त्यांना पाठिंबा देणे. यानंतर भरत गोगलवे यांना मान्यता देणे की तेच व्हीप आहेत. हे सर्व मुद्दे सुप्रीम कोर्टाच्या 5 न्यायाधीशांनी बेकादेशीर ठरवले आहेत. यामुळे कोर्टाला मान्य करावे लागेल असा दावा असीम सरोदे यांनी केला. 

शिंदेंच्या आमदारांबाबत बोलताना राहुल नार्वेकरांनी म्हंटले हा पक्षांतर्गत वादाचा मुद्दा आहे.  तर, त्यांनी त्यांच्या मान्यतेबाबतचा निर्णय का घेतला. पक्षांतर्गत वादाचे प्रकरण आहे, असे सांगून न्यायालालयाकडे पाठवायचे असे का केला नाही असा सवाल कपिव सिब्बल यांनी उपस्तित केला.  

एका तासात सुनावणी संपेल

एक तास कपिल सिब्बस यांना दिला तर पूर्ण विषयावर ते बाजू मांडतील आणि पूर्ण विषयावर एका तासात युक्तीवाद होईल. नंतर फक्त  निर्णयसाठी विषय राखीव ठेवता येईल.  यामुळे एका तासात सुनावणी संपले आणि न्यायालय अंतिम निर्णय देऊ शकतो असा म्हणत असीम समोरे यांनी थेट निकालाबाबत मोठा दावा केला आहे.  संविधाच्या बाजूने विचार केला. तर संविधानाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाला आहे.  

वैचारिक मतभेद असणे हे डिसेंट असू शकत नाही.  वैचारिक मतभेद होते तर मग अडीच वर्षे तुम्ही सरकारमध्ये काय करत होता असा सवाल असिम सरोदे यांनी केला,  पक्ष सोडून जातात त्यांची वागणूक पहायची की उद्धव ठाकरे यांच्या वागणुकीची पाहणी करायची?  विधिमंडळ बहुमताच्या आधारे राजकीय पक्ष देणे, हे कायदेशीररित्या चुकीचे असल्याचे सिब्बल यांनी कोर्टात मांडले. 

निवडणूक पूर्व युती कोणाशी होती आणि नंतर कोणाशी आघाडी केली हा गौण मुद्दा आहे.  आमदार अपात्रता प्रकरण हा अकॅडमीक मुद्दा नाही. बहुमताचे स्वरूप लक्षात घेऊन अशा राजकीय हालचाली केल्या जातात, सध्या जे घडत आहे, ते याचाच भाग आहे अस असीम सरोदे म्हणाले.

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Maharashtra Politics
shiv sena
Shiv Sena UBT