• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /महाराष्ट्र
  • /'...मग अडीच वर्षे तुम्ही सरकारमध्ये काय करत होता?', सुप्रीम कोर्टात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित; शिंदेंची कोंडी? म्हणाले 'ठाकरेंची वागणूक...'

'...मग अडीच वर्षे तुम्ही सरकारमध्ये काय करत होता?', सुप्रीम कोर्टात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित; शिंदेंची कोंडी? म्हणाले 'ठाकरेंची वागणूक...'

वैचारिक मतभेद होते तर मग अडीच वर्षे तुम्ही सरकारमध्ये काय करत होता? असा प्रश्न उद्धव ठाकरेंची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विचारला आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 25, 2026, 18:02 IST|Updated: Nov 25, 2026, 18:15 IST
joinshare
'...मग अडीच वर्षे तुम्ही सरकारमध्ये काय करत होता?', सुप्रीम कोर्टात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित; शिंदेंची कोंडी? म्हणाले 'ठाकरेंची वागणूक...'
Image Credit: '21 जून रोजी मूळ पक्ष कोणाचा होता हे ठरवणे महत्त्वाचे'

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
'...मग अडीच वर्षे तुम्ही सरकारमध्ये काय करत होता?', सुप्रीम कोर्टात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित; शिंदेंची कोंडी? म्हणाले 'ठाकरेंची वागणूक...'

'...मग अडीच वर्षे तुम्ही सरकारमध्ये काय करत होता?', सुप्रीम कोर्टात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित; शिंदेंची कोंडी? म्हणाले 'ठाकरेंची वागणूक...'

2

1.22 कोटींची फसवणूक करूनही भामटा कंगाल! SIM कार्डमुळे समोर आलं कांड; नाशिकमध्ये काय घडलं?

3

'मला वाचवा' ओरडत तरुणी रस्त्यावर धावत सुटली! आरोपी सलमानने उचलून रस्त्यावर आपटलं; गर्दी होताच फरार, नंतर समोर आला धक्कादायक प्रकार

4

24 तासांत कमावला भारताच्या TOP 10 कंपन्याची एकत्रीत कमाई इतका पैसा; संपत्तीत 300000 कोटींची वाढ; कंपनीचे आणि CEO चे नाव जाणून शॉक व्हाल

5

कात्रज प्रकरण नेमकं काय? ज्यामुळे न्यायालयाच्या बाहेरच मंदार किवळेला संपण्याचा झाला प्रयत्न!

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

वैचारिक मतभेद होते तर मग अडीच वर्षे तुम्ही सरकारमध्ये काय करत होता? असा प्रश्न उद्धव ठाकरेंची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी विचारला आहे. सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांनी प्रतिवाद करताना पहाटेचा शपथविधी आणि महायुती सरकारचा दाखला दिला. पक्ष सोडून जातात त्यांची वागणूक पहायची की उद्धव ठाकरे यांच्या वागणुकीची पाहणी करायची? अशी विचारणाही त्यांनी केली आहे. विधिमंडळ बहुमताच्या आधारे राजकीय पक्ष देणे, हे कायदेशीररित्या चुकीचे असल्याचे सिब्बल यांनी कोर्टात मांडले. निवडणूक पूर्व युती कोणाशी होती आणि नंतर कोणाशी आघाडी केली हा गौण मुद्दा आहे. आमदार अपात्रता प्रकरण हा अकॅडमीक मुद्दा नाही असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.

कपिल सिब्बल यांनी सांगितलं की, "महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक 21 नोव्हेंबर 2019 रोजी झाली. यानंतर निकाल जाहीर झाले . यानंतर भाजपने राज्यपालांनी पाठवलेले सरकार स्थापनेचे निमंत्रण स्वीकारले नाही. नंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत जाऊन सरकार स्थापन केले". मग निवडणूक पूर्व युती कुठे होती? असा सवाल सिब्बल यांनी विचारला.

पुढे ते म्हणाले की, "मात्र यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला आणि त्यांचे सरकार कोसळले. मग शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. हे सरकार 2019 ते 2022 कार्यरत होते. मग या काळामध्ये शिंदे काय करत होते? या काळात त्यांना अडचणी नव्हत्या का?".

'21 जून रोजी मूळ पक्ष कोणाचा होता हे ठरवणे महत्त्वाचे'

21 जून रोजी मूळ पक्ष कोणाचा होता हे ठरवणे महत्त्वाचे आहे. विधानसभा अध्यक्षांनी आपल्या आदेशात शिंदे गटाच्या 26 जूनच्या ठरावाचा आधार घेतला.  या ठरावाला 31 आमदारांचा पाठिंबा असल्याचे नमूद करून विधिमंडळातील बहुमताच्या आधारे शिंदे गट हाच खरा राजकीय पक्ष असल्याचा निष्कर्ष काढला असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं. ठाकरेंच्या मूळ मुद्द्यांवर शिंदेंनी जाणीवपूर्वक उत्तर देणे टाळले आहे. विधानसभा अध्यक्षांसमोरील अपात्रतेची कार्यवाही आणि निवडणूक चिन्ह आदेशाच्या परिच्छेद 15 अंतर्गत होणारी कार्यवाही या दोन्ही पूर्णपणे स्वतंत्र आहेत असंही ते म्हणाले.

'शिंदे आणि त्यांच्या अन्य आमदारांनी भाजपसोबत संगनमत केले'

ठाकरेंनी 23 जून रोजी दाखल केलेल्या पहिल्या अपात्रता याचिकेत नेमकी कोणती भूमिका मांडली होती, हे मी आपल्या निदर्शनास आणून देतो. शिंदे आणि त्यांच्या अन्य आमदारांनी भाजपसोबत संगनमत केले होते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी त्यांनी आपल्या मूळ राजकीय पक्षात फूट पाडण्याचे प्रयत्न केले. हे सर्व त्यांनी स्वार्थी आणि भ्रष्ट हेतूने केले, असा आमचा आरोप होता असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं.

शिंदेंनी व्हीप बजावल्याच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे.  मात्र, न्यायालयात दाखल केलेल्या त्यांच्या उत्तरात ई-मेलबाबत काही बाबी मान्य केल्या आहेत. प्रत्येक आमदाराला कोणत्या ई-मेल आयडीवर नोटीस पाठवण्यात आली, याची माहिती कोर्टात दिली आहे. सर्व आमदारांना त्याच ई-मेल पत्त्यांवर नोटीस बजावण्यात आल्याचे स्पष्ट होते अशी बाजू त्यांनी मांडली.

'शिंदेंनी 'सदस्य' या शब्दाच्या व्याख्येचा घेतलेला आधार धक्कादायक'

कपिल सिब्बल म्हणाले की, शिंदेंनी 'सदस्य' या शब्दाच्या व्याख्येचा घेतलेला आधार धक्कादायक आहे. त्यांचा युक्तिवाद असा आहे की, सदस्याची व्याख्या विधानसभेच्या कार्यकाळाशी जोडलेली आहे.  त्यामुळे विधानसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर संबंधित व्यक्ती आमदार राहत नाही. आणि तो आमदार नसेल, तर त्याच्याविरोधात अपात्रतेची कोणतीही कार्यवाही करता येणार नाही.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
Supreme court
Eknath Shinde
Uddhav Thackeray
shiv sena
Shiv Sena UBT