• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /'मला वाचवा' ओरडत तरुणी रस्त्यावर धावत सुटली! आरोपी सलमानने उचलून रस्त्यावर आपटलं; गर्दी होताच फरार, नंतर समोर आला धक्कादायक प्रकार

'मला वाचवा' ओरडत तरुणी रस्त्यावर धावत सुटली! आरोपी सलमानने उचलून रस्त्यावर आपटलं; गर्दी होताच फरार, नंतर समोर आला धक्कादायक प्रकार

मेरठमध्ये एका तरुणीला भररस्त्यात उचलून हॉटेलमध्ये ओढत नेल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अखेर कारवाई केली आहे.

Reported ByShivraj Yadav
Published: Nov 25, 2026, 17:33 IST|Updated: Nov 25, 2026, 17:37 IST
joinshare
'मला वाचवा' ओरडत तरुणी रस्त्यावर धावत सुटली! आरोपी सलमानने उचलून रस्त्यावर आपटलं; गर्दी होताच फरार, नंतर समोर आला धक्कादायक प्रकार
Image Credit: तरुणीचं अपहरण करुन हॉटेलमध्ये बलात्कार

About the Author

Shivraj Yadav

Shivraj Yadav

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
'...मग अडीच वर्षे तुम्ही सरकारमध्ये काय करत होता?', सुप्रीम कोर्टात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित; शिंदेंची कोंडी? म्हणाले 'ठाकरेंची वागणूक...'

'...मग अडीच वर्षे तुम्ही सरकारमध्ये काय करत होता?', सुप्रीम कोर्टात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित; शिंदेंची कोंडी? म्हणाले 'ठाकरेंची वागणूक...'

2

'मला वाचवा' ओरडत तरुणी रस्त्यावर धावत सुटली! आरोपी सलमानने उचलून रस्त्यावर आपटलं; गर्दी होताच फरार, नंतर समोर आला धक्कादायक प्रकार

3

24 तासांत कमावला भारताच्या TOP 10 कंपन्याची एकत्रीत कमाई इतका पैसा; संपत्तीत 300000 कोटींची वाढ; कंपनीचे आणि CEO चे नाव जाणून शॉक व्हाल

4

कात्रज प्रकरण नेमकं काय? ज्यामुळे न्यायालयाच्या बाहेरच मंदार किवळेला संपण्याचा झाला प्रयत्न!

5

धक्कादायक! 19 वर्षीय मुलीची आई-वडिलांकडून हत्या; गोळ्या खाऊनही मेली नाही म्हणून उशीने दाबलं तोंड, कारण त्याहून हादरवणारं, गर्भवती...

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

मेरठमधील एका हॉटेलमध्ये 24 वर्षीय तरुणीला कथितरीत्या ओलीस ठेवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान तरुणी आपली सुटका करुन रस्त्यावर आली असताना, नाट्यमय घडामोडी घडल्या. रस्त्यावर घडलेला हा सगळा प्रकार तेथील सीसीटीव्हीत कैद झाला असून, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मंगळवारी सदर बाजार परिसरातील हॉटेलमधून बाहेर पडताना तरुणी 'मला वाचवा' अशी ओरडत मदतीसाठी विनवणी करत होती. यावेळी सलमान नावाच्या एका व्यक्तीने तिचा पाठलाग केला, तिला पकडून खाली आपटले आणि पुन्हा ओढत हॉटेलच्या आत नेले. पोलीस कारवाई करत असताना आरोपी सलमानने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तो पुलावरून खाली पडला, त्यानंतर बुधवारी पोलिसांनी त्याला अटक केली.

तरुणी रस्त्यावर ओरडत सुटल्याने आजुबाजूचे दुकानदार आणि लोकांचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. यामधील काहीजणांनी तिला वाचवण्यासाठी हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी लोकांना आतमध्ये येण्यापासून रोखलं. दरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागल्यानंतर सलमान छतावर चढला आणि उडी मारुन पळून गेला. पोलिसांनी हॉटेल सील केलं असून, सलमानच्या काही नातेवाईकांना ताब्यात घेतलं आहे.

पीडित तरुणी गाझियाबादची रहिवासी आहे. तिने सलमान मेरठमधील कांकेरखेरा परिसरातील रहिवासी असल्याचं सांगितलं आहे. तिने आरोप केला की, सलमानने तिला सोमवारपासून हॉटेलमध्ये डांबून ठेवलं होतं आणि संधी मिळताच ती तिथून पळून आली. तिने असाही आरोप केला की, सलमानने हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार केला आणि लग्नासाठी दबाव टाकला.

सदर कॅंट सर्कल ऑफिसर संजय गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीने ती सलमानला गेल्या अडीच वर्षांपासून ओळखत असल्याचं सांगितलं आहे. गुप्ता यांच्या माहितीनुसार, दोघेही हॉटेलमध्ये थांबले असताना त्यांच्यात वाद झाला, ज्याचे रूपांतर हाणामारीत झाले. पोलिसांनी तरुणीची सुटका करून तिला पोलीस ठाण्यात नेले, जिथे तिने लेखी तक्रार दाखल केली.

 

A Hindu girl from Ghaziabad held captive at knifepoint by Mohammad Salman in a hotel in Meerut, UP. The girl escapes screaming, he chases her in broad daylight, grabs her and tries to drag her back. Locals and a woman intervene and rescue her while hotel staff allegedly help him flee.

— Team Hindu United (@TeamHinduUnited) November 24, 2026

 

तरुणीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ज्यामध्ये सलमानवर तिला डांबून ठेवल्याचा, मारहाण केल्याचा आणि बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत हॉटेल कर्मचाऱ्यांची काही भूमिका होती का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

सलमानला कसे अटक केले?

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बुधवारी एका खबऱ्याकडून त्यांना सलमान नरारहेड गावाजवळ बांधकामाधीन असलेल्या एका अंडरपासच्या परिसरात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तो परिसर वेढला असता, सलमानने त्यांच्या दिशेने गोळीबार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर, पळून जाण्याच्या प्रयत्नात तो जवळच्या पुलावर चढला, परंतु त्याचा पाय घसरला आणि तो खाली पडला. या घटनेत त्याच्या उजव्या पायाला आणि डाव्या हाताला दुखापत झाली असून, त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

'लव्ह जिहाद'चा दावा

अखिल भारतीय हिंदू सुरक्षा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन सिरोही यांनी मंगळवारी हॉटेलला भेट दिली आणि पोलिसांना सतर्क केले. त्यांनी या घटनेचे वर्णन 'लव्ह जिहाद' असं केलं आणि असा दावा केला की, तरुणीचं लग्न दुसऱ्या पुरुषाशी ठरत असल्याचे समजल्यावर सलमानने तिला हॉटेलमध्ये बोलावलं होतं. सिरोही यांनी असाही आरोप केला की, जर तिने दुसऱ्या कोणाशी लग्न केलं, तर तिला मारून टाकण्याची धमकी सलमानने दिली होती. त्यांनी असाही दावा केला की, हॉटेलने त्यांची ओळख पटवणारे तपशील न घेताच रुम दिली होती.

मात्र, पोलिसांनी हा दोघांमधील वाद आणि त्यानंतर झालेल्या हाणामारीचे प्रकरण असे केले असून, यात कोणताही धार्मिक हेतू नसल्याचं म्हटलं आहे. 
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
crime