SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

6 सेकंदात मृत्यू! नववधू हॉटेलच्या खोलीत शिरताच खाली कोसळली अन् क्षणात..., वडिलांनी केले गंभीर आरोप

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडिओने खळबळ उडाली आहे. यात नववधूचा अवघ्या पाच सेकंदात मृत्यू झाला आहे.

Written By Mansi Kshirsagar Edited By Mansi Kshirsagar
Published: Oct 26, 2026, 11:01 AM IST | Updated: Oct 26, 2026, 11:05 AM IST
Image Credit: CCTV captures newlywed entering hotel room with husband
Join

लग्नानंतर तीनच महिन्यात नवविवाहितेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मयत तरुणीच्या वडिलांनी पती निलेशवर हत्येचा आरोप केला आहे. 24 ऑक्टोबरची ही घटना असल्याचे समोर आले आहे. मुस्कान सिमौलिया असं तरुणीचे नाव असून ती पतीसोबत एका हॉटेलच्या रूममध्ये थांबली होती. तेव्हा अचानक ती खाली कोसळली आणि तिचा मृत्यू झाला, असा दावा मुस्कानचा पती निलेशने केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. तसंच, सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

सोशल मीडियावर 47 सेकंदाचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, तीन लोक हॉटेलच्या गॅलरीतून खोलीत जात आहेत. त्यानंतर दोन लोक खोलीत जातात व त्याच्या मागे ती तरुणीदेखील आत जाते. त्याचवेळेला ती खोलीच्या दरवाजातच अचानक खाली कोसळते. त्यानंतर नवविवाहितेला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

 

 

नवविवाहित तरुणीचे वडील रामजी लाल अहिरवार यांनी तरुणीचा पती निलेशवर हत्येचा गंभीर आरोप केला आहे. तक्रारीत त्यांनी म्हटलंय की, त्यांच्या मुलीचे लग्न 29 जून रोजी झालं होतं. लग्नानंतर मुलीने सांगितले होते की, निलेशचे पहिलेच लग्न झाले होते. व त्याची पहिली पत्नी इंदौरला राहते. यावरुन निलेश आणि मुस्कानचे वाद व्हायचे. तो तिला सतत टोमणे मारायचा. वडिलांनी आरोप केला आहे की, निलेशने तिचे केस पकडून तिचं डोकं भिंतीवर आपटले. त्यानंतर तिच्या कपाळाला मार बसला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कानला रुग्णालयात दाखल केले तेव्हा तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी मुस्कानच्या पतीची चौकशी केल्यानंतर त्याने म्हटलं की, ते दोघ ऋषभ हॉटेलमध्ये थांबले होते, सकाळी चेकआउट करताना अचानक त्याची पत्नी खाली कोसळली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. तसंच, सध्या पोलिस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत.  तसंच, वडिलांनी केलेल्या आरोपांवरुन पुढील तपास केला जात आहे. 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 10 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि जनरल बातम्यांमध्ये हातखंडा आहे. पायाभूत सुविधा म्हणजेच infrastructure, मुंबई लोकल संबंधित बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. महाराष्ट्र व मुंबईतील महत्त्वाचे प्रकल्पाचे अपडेट वाचकापर्यंत पोहोचवतात.त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड आहे.  गुन्हेविषयक बातम्या आणि त्याचे विश्लेषणात्मक लेख आणि त्याचा अभ्यासपूर्ण मसुदा वाचकांना समजेल अशा भाषेत लिहिण्याची विशेष आवड आहे. त्याचबरोबर, लाइफस्टाईल आणि हवामानासंदर्भातील बातम्यांमध्येसुद्धा त्यांचा विशेष हातखंडा आहे.डिजिटल मीडियातील कारकीर्दमानसी यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात डिजीटल मीडियापासून केली. ग्रुम अँड ग्रो या अॅपसाठी कंटेट रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये रुजू झाल्या.  मनोजरंन बातम्यांपासून सुरुवात केल्यानंतर जनरल बातम्या, अर्थविषयक बातम्या, क्राइम आणि लाइफस्टाईल विषयाशी निगडीत विषयांवर लिहिण्यास सुरुवात केली. मानसी या आता झी 24 तासमध्ये राजकीय, सामाजिक आणि इन्फ्रासंदर्भातील बातम्या प्रामुख्याने करतात.शैक्षणिक पात्रतामानसी क्षीरसागर यांची शैक्षणिक पात्रता पाहायची झाल्यास त्यांनी बॅचलर ऑफ मास मीडिया (BMM) मध्ये पदवी घेतली असून मास्टर ऑफ आर्ट्स इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (MACJ) असे पदव्यूत्तर शिक्षण घेतलं आहे. शिवाय डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा त्यांचा अभ्यास आहे. डिजिटल मीडियातील बदलते ट्रेंड तसेच बदलती वाचकवृत्ती लक्षात घेऊन बातमी अथवा लेखांचे सादरीकरण कशा प्रकारे करू शकतो याचा अभ्यास करून त्या आपल्या कामात काळानुरुप बदल करतात.

ZEENEWS TRENDING STORIES