SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

स्विगी, झोमॅटो, ओला-उबर कामगारांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी! डिसेंबरअखेर केंद्र सरकार मोठी घोषणा

केंद्र सरकार डिसेंबरअखेर स्विगी, झोमॅटो, ओला-उबर कामगारांसाठी मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत.

Written By Neha Chaudhari Edited By Neha Chaudhari
Published: Nov 28, 2026, 10:02 IST | Updated: Nov 28, 2026, 10:10 IST
Image Credit: Swiggy Zomato
Join


फूड डिलिव्हरी, कॅब सेवा, बाईक टॅक्सी, घरगुती सेवा आणि इतर डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे काम करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशभरातली 15 लाख गिग आणि प्लॅटफॉर्म कामगाऱ्यांना या वर्षाच्या अखेरीस नवीन वर्षाचं गिफ्ट मिळणार आहे. केंद्र सरकार डिसेंबरच्या अखेर कामगारांसाठी निवृत्तीवेतन, आरोग्य विमा आणि इतर सामाजिक सुरक्षा लाभांची योजनाची घोषणा करण्याची शक्यता आहे. या घोषणेचा फायदा स्विगी, झोमॅटो, उबर, ओला, रॅपिडो आणि अर्बन कंपनी यांसारख्या प्लॅटफॉर्मशी जोडलेल्या कर्मचाऱ्यांना होणार आहे.

 

     प्रस्तावित सुविधा       कामगारांना होणारे संभाव्य फायदे

  1. पेन्शन           - वृद्धापकाळात नियमित आर्थिक सुरक्षा
  2. आरोग्य विमा  -  वैद्यकीय आणि रुग्णालयाच्या खर्चात मदत
  3. मातृत्व लाभ  -  गर्भधारणा आणि प्रसूतीदरम्यान आर्थिक मदत
  4. जीवन विमा  -  मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणारी आर्थिक सुरक्षा
  5. अपंगत्व विमा  -  अपंगत्वाच्या बाबतीत आर्थिक मदत

केंद्र सरकारच्या या मॉडेलनुसार, स्विगी, झोमॅटो, उबर आणि ओला यांसारख्या एग्रीगेटर कंपन्यांना त्यांच्या वार्षिक उलाढालीच्या 2% सामाजिक सुरक्षा निधीमध्ये योगदान देणे बंधनकारक करावे लागण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की, कंपनीचे योगदान तिच्या व्यवसायाच्या आकारानुसार निश्चित करण्यात येणार आहे.

सरकारकडून सांगण्यात आलंय की, योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वात मोठा अडथळा म्हणजे त्यासाठीचा निधी आहे. सामाजिक सुरक्षा निधीसाठी निधी उभारण्याकरिता सरकारकडे दोन संभाव्य प्रारूपे तयार करण्यात आला आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहेय. 

हेसुद्धा वाचा - भाजप खासदाराच्या कारला भीषण अपघात, हात फ्रॅक्चर अन्...; नेमकं काय घडलं?

राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळाची पुढील बैठक गिग कामगारांसाठी प्रस्तावित सामाजिक सुरक्षा उपाययोजना आणि निधी मॉडेलवर चर्चा करण्यासाठी नियोजित करण्यात येणार आहे. या मंडळात सरकार, एग्रीगेटर कंपन्या, कामगार संघटना आणि इतर हितधारकांचे प्रतिनिधी समाविष्ट राहणार आहे. विशेष म्हणजे, सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 मध्ये प्रथमच गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांची स्पष्ट व्याख्या केली गेली. ही संहिता जीवन आणि अपंगत्व संरक्षण, अपघात विमा, आरोग्य आणि प्रसूती लाभ, आणि वृद्धापकाळ संरक्षणाची तरतूद करण्यात येत आहे. तसंच, यात सामाजिक सुरक्षा निधीच्या स्थापनेचीही तरतूद राहणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

नॅशनल फ्रंट ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सचे अध्यक्ष आणि मंडळाचे सदस्य दीपक जैस्वाल यांनी सामाजिक सुरक्षा निधीसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करावी, अशी सूचना केल्याची माहिती समोर आली आहे. तसंच कंपन्यांनी या निधीसाठी द्याव्या लागणाऱ्या योगदानाचा आर्थिक भार कामगारांवर टाकू नये, असं सांगण्यात आलंय. 

 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत.शैक्षणिक पात्रतानेहा चौधरी यांनी बॅचरल ऑफ कम्युनिकेशन आणि जर्नालिझम ही पदवी घेतली आहे. संरक्षण शास्त्रातून बीए, नाशिक भोसला मिलटरी कॉलेजमधून केलं आहे. डिजिटल मार्केटिंग या विषयाचा सुद्धा अभ्यास केलाय.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी  त्या ज्योतिषशास्त्र, सणवार, विज्ञान, ट्रेंडिंग विषय आणि आरोग्याशी संबंधित तज्ज्ञांच्या मुलाखत घेतात.  यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.या विषयांमध्ये हातखंडत्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही लिखाण करतात.  ज्योतिष, अंकशास्त्र, टॅरो कार्ड आणि धर्म यावर लिखणा करतात. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन करुन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व, याबद्दल बातम्यांमधून समतोल राखतात. मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, खाद्य पदार्थ बनवणे, संगीताची आवड आहे.
Read More

ZEENEWS TRENDING STORIES