SOCIAL MEDIA

Newsletter

PARTNER SITES
Select Language Select State

काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी! नियुक्तीची अधिकृत घोषणा

गोकुळच्या निवडणुकीत मैदान गाजवणाऱ्या सतेज पाटील यांच्या खांद्यावर आता काँग्रेस पक्षाने एक नवीन जबाबदारी टाकली आहे.

Reported By Shivraj Yadav Written By Shivraj Yadav
Published: Nov 16, 2026, 22:29 IST | Updated: Nov 16, 2026, 22:45 IST
Image Credit: सतेज उर्फ बंटी पाटील यांची गोव्यात नियुक्ती
Join

काँग्रेसकडून पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी स्क्रीनिंग कमिटींची (उमेदवार निवड समिती) घोषणा करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्रातील नेत्यांना महत्त्वाच्या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. गोकुळचं मैदान गाजवणारे सतेज उर्फ बंटी पाटील यांची गोव्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच सचिन सावंत यांची पंजाबमध्ये नियुक्ती केली आहे.

काँग्रेसने सोमवारी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांसाठी 'स्क्रीनिंग कमिटी' म्हणजेच छाननी समिती स्थापन केल्या आहेत. उत्तर प्रदेशातील समितीचे प्रमुख म्हणून ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे खजिनदार अजय माकेन यांची, तर पंजाबमधील समितीचे प्रमुख म्हणून सिरिव्हेल्ला प्रसाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, काँग्रेसने उत्तराखंडमधील स्क्रीनिंग कमिटीच्या प्रमुखपदी पक्षाच्या सरचिटणीस दीपा दासमुन्सी यांची, गोव्यातील समितीच्या प्रमुखपदी कर्नाटकचे मंत्री के. जे. जॉर्ज यांची आणि मणिपूरमधील समितीच्या प्रमुखपदी बी. एम. संदीप यांची नियुक्ती केली आहे.

“काँग्रेस अध्यक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकांसाठी संबंधित राज्यांमध्ये ‘स्क्रीनिंग कमिटी’ गठित केली असून, हा आदेश त्वरित प्रभावाने लागू होईल,” असे एआयसीसी (AICC) सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे. संबंधित राज्यांचे प्रभारी एआयसीसी सरचिटणीस, प्रदेश काँग्रेस कमिटीचे (PCC) अध्यक्ष, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि संबंधित राज्यांच्या प्रभारी सरचिटणीसांसोबत नियुक्त केलेले एआयसीसी सचिव हे या समितीचे पदसिद्ध सदस्य असतील.

 

 

उत्तर प्रदेशसाठी गठित स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष अजय माकेन असतील, तर अस्लम शेख आणि बी. व्ही. श्रीनिवास हे या समितीचे सदस्य असतील. पंजाबमधील समितीचे अध्यक्ष सिरिवेला प्रसाद असतील, तर सचिन सावंत आणि निवेदित अल्वा हे या समितीचे सदस्य असतील. उत्तराखंडमधील समितीचे अध्यक्षपद दीपा दासमुन्सी भूषवतील. तर अनिल चौधरी आणि पाल भाई अंबालिया हे या समितीचे सदस्य असतील.

गोव्यासाठी, काँग्रेस प्रमुखांनी के. जे. जॉर्ज यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली असून, सतेज पाटील आणि शफी परांबिल हे सदस्य असतील. मणिपूरसाठी नेमलेल्या स्क्रीनिंग कमिटीचे अध्यक्ष बी. एम. संदीप असतील, तर हिबी ईडेन आणि राजेश ठाकूर हे या समितीचे सदस्य असतील. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. पाचही राज्यांत निवडणुका पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणार आहेत.
 

Add Zee News as a Preferred Source
TAGS:

About the Author

शिवराज यादव झी 24 तास डिजिटलमध्ये सीनिअर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. राज्यासह देश, विदेशातील चालू घडामोडींसह राजकीय, गुन्हेगारी विषयांवरील लिखाण ते करतात. हे लिखाण करताना ते सखोल पद्धतीने करण्याकडे कल असतो. वाचकाला बातमी अत्यंत सहजपणे समजावी यासाठी ती समजेल अशा पद्धतीने लिहितात. याशिवाय क्रीडा, मनोरंजन यांचीही आवड असल्याने त्या क्षेत्राशी संबंधित घडामोडींवरही लिखाण करतात.करिअरशिवराज यांनी 2009 मध्ये आपल्या पत्रकारितेतील करिअरला सुरुवात केली. सर्वात आधी Fotocorp संस्थेत कॅप्शन रायटर म्हणून काम केल्यानंतर पुढील 7 वर्ष त्यांनी टीव्हीमध्ये प्रदीर्घ अनुभव घेतला. लोकमतमधून ऑनलाइन पत्रकारितेला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर लोकसत्ता आणि सध्या झी 24 तास अशाप्रकारे त्यांच्याकडे 9 वर्षांचा अनुभव आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशिवराज यादव यांनी मुंबईतच आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठ मान्यताप्राप्त एमडी कॉलेजमध्ये त्यांनी आर्टसमधून 12 वी उत्तीर्ण केली. यानंतर पुढील 3 वर्षं BMM मधून शिक्षण घेत पत्रकारितेत पदवी घेतली. यादरम्यान बातम्यांचं जग, त्याची समाजाला असणारी गरज आणि त्याचं महत्व याबद्दल चांगली समज निर्माण झाली.लेखन शैली आणि दृष्टीकोणशिवराज यांचं म्हणणं आहे की, प्रत्येक व्यक्तीला आपल्या आजुबाजूला तसंच देश, विदेशात नेमक्या कोणत्या घडामोडी घडत आहेत हे माहिती असलं पाहिजे. ही जबाबदारी माध्यमांवर जास्त असून, त्यांनी ती अवितरपणे पार पडली पाहिजे. प्रत्येक माहिती जशीच्या तशी वाचकांपर्यंत पोहोचवताना माध्यमांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी असते.कोणत्या विषयांची सखोल जाणराजकीय घडामोडीचालू घडामोडीमनोरंजनक्रीडा
Read More

ZEENEWS TRENDING STORIES