• हिन्दीEnglishमराठीবাংলাதமிழ்മലയാളംગુજરાતીతెలుగుಕನ್ನಡଓଡ଼ିଶାZ BharatPHHBusinessWION
  • facebookyoutubetwitterwhatsapp
Zee News Marathi
  • न्यूज
  • व्हिडीओ
  • फोटो
  • व्हिडिओ रील्स
  • शहर

Add Zee Business As A Preferred Source
App
  • LIVE टीवी
  • महाराष्ट्र
  • भारत
  • विश्व
  • स्पोर्ट्स
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • हेल्थ
  • धर्म
  • कामाची बातमी
  • करिअर
  • झी न्यूज मराठी
  • /भारत
  • /जवळच्या नात्यामध्ये लग्न करणं पडेल महागात; कायद्यात बदल होणार? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

जवळच्या नात्यामध्ये लग्न करणं पडेल महागात; कायद्यात बदल होणार? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

जवळच्या रक्तसंबंधातील विवाहांमुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो का? सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस बजावत कायदा आणि जनजागृतीबाबत भूमिका विचारली.

Reported ByPravin Dabholkar
Published: Nov 21, 2026, 13:28 IST|Updated: Nov 21, 2026, 14:54 IST
joinshare
जवळच्या नात्यामध्ये लग्न करणं पडेल महागात; कायद्यात बदल होणार? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
Image Credit: सुप्रीम कोर्ट

About the Author

Pravin Dabholkar

Pravin Dabholkar

प्रविण दाभोळकर हे झी 24 तास डिजिटलमध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत असून मीडिया क्षेत्रातील 16 वर्षांहून अधिक अनुभव असलेले पत्रकार आहेत. शिक्षण, करिअर, रोजगार, सरकारी योजना, गुंतवणूक, अर्थकारण, सार्वजनिक धोरणे आणि राजकीय घडामोडी यांसारख्या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. वाचक-केंद्रित पत्रकारिता, तथ्याधारित माहिती आणि सोप्या, स्पष्ट भाषेत गुंतागुंतीचे विषय समजावून सांगणे हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.करियरची सुरुवातवयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी वृत्तसंकलन, रिपोर्टिंग आणि लेखन यामध्ये महत्त्वाचा अनुभव मिळवला. त्यानंतर प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया या तिन्ही माध्यमांमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पत्रकारितेचा व्यापक अनुभव संपादन केला. बदलत्या मीडिया विश्वाशी जुळवून घेत त्यांनी डिजिटल पत्रकारितेमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक पार्श्वभूमीशैक्षणिकदृष्ट्या त्यांनी मुंबईतील एम.डी. महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र (Masters in Sociology) विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे साठ्ये महाविद्यालयातून मराठी पत्रकारितेमध्ये मास्टर्स ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ही पदवी संपादन केली. या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे सामाजिक प्रश्नांची सखोल समज, वस्तुनिष्ठ विश्लेषण आणि जबाबदार पत्रकारिता यांचा मजबूत पाया त्यांना लाभला आहे.लेखन शैली आणि दृष्टीकोनसंशोधनात्मक लेखन, सखोल विश्लेषण आणि फीचर स्टोरीज याकडे त्यांचा विशेष कल आहे. सामान्य वाचकांपर्यंत महत्त्वाच्या पण दुर्लक्षित राहिलेल्या कथा पोहोचवणे, गुंतागुंतीच्या विषयांचे सोप्या भाषेत विश्लेषण करणे आणि अचूक माहिती सादर करणे यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या लेखनात तथ्यांची पडताळणी, संदर्भांची अचूकता आणि वाचकांसाठी उपयुक्त माहिती यांना नेहमीच प्राधान्य दिले जाते.व्हिडीओ कंटेटझी 24 तास सोशल मीडियासाठी ते फिटनेस, सरकारी योजना, तसेच इतर महत्वाच्या बातम्यांसाठी व्हिडीओ बनवतात. यातून लेखनासोबतच व्हिडीओच्या माध्यमातून पोहोचण्यास मदत होते.विशेष ज्ञानाची क्षेत्रेह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज, शिक्षण, करिअर मार्गदर्शन, रोजगार, सरकारी योजना, सामाजिक प्रश्न, गुंतवणूक आणि सार्वजनिक हिताच्या विषयांवरील लेखन हे त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे. वाचकांना केवळ बातमी नव्हे, तर त्या बातमीचा परिणाम, पार्श्वभूमी आणि उपयोग समजून देण्यावर त्यांचा भर असतो.
Read More

ट्रेंडिंग

  • न्यूज
  • फोटो
  • व्हिडीओ
खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

खाटूश्यामच्या दर्शनावरुन येताना काळाचा घाला, महाराष्ट्रातील 9 जण ठार, भीषण अपघातात गाडीचा चक्काचूर

2

मुंबईत मॅनहोलच्या एका झाकणासाठी 25 हजार रुपये! चोरी रोखण्यासाठी BMC आणणार नवी यंत्रणा!

3

टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईचं नेपाळ कनेक्शन, अभिनेत्यावर गोळी चालवण्याआधी...

4

रविवार 22 नोव्हेंबर रोजी किती आहेत LPG गॅस सिलेंडरच्या किंमती? जाणून घ्या आजचे रेट्स

5

सोन्याच्या किंमती घसरल्यानंतर PM मोदींची पुन्हा मोठी भविष्यवाणी, पुढील 20 वर्षांचं सांगितलं भाकीत

logo
  • contact us
  • privacy policy
  • legal
  • investor info
  • advertise with us
© 1998-2026 Indiadotcom Digital Private Limited, All Rights Reserved.

जवळच्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तींमध्ये होणाऱ्या विवाहांचे प्रमाण वाढते आहे. अशावेळी जन्माला येणाऱ्या मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. हा मुद्दा उपस्थित करणाऱ्या जनहित याचिकेची सुप्रीम कोर्टाने दखल घेतलीय. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या तीन सदस्यीय खंडपीठाने केंद्र सरकारला नोटीस बजावली. अशा विवाहांबाबत स्वतंत्र कायदा आणण्याची गरज आहे का?, तसेच लोकांमध्ये जनजागृती कशी करता येईल? यावर केंद्राने विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले. काय घडलंय नेमकं? सविस्तर जाणून घेऊया.

कायद्याच्या विद्यार्थिनीची जनहित याचिका

चार्वी एस. या कायद्याच्या विद्यार्थिनीने ही जनहित याचिका दाखल केली आहे. त्या 40 टक्के दृष्टिबाधित असल्याचा उल्लेख याचिकेत आहे. त्यांच्या पालकांचा विवाह प्रथम चुलत भावंडांमध्ये झाला होता. त्यांच्या समाजात ही परंपरा प्रचलित असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. अशा विवाहांमुळे पुढील पिढ्यांना संभाव्य आनुवंशिक धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे केवळ परंपरेच्या नावाखाली या विषयाकडे दुर्लक्ष करता कामा नये, असा युक्तिवाद याचिकेत करण्यात आला आहे. नागरिकांना या विवाहांशी संबंधित संभाव्य आरोग्यविषयक परिणामांची माहिती मिळावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

कायद्यातील तरतुदींना आव्हान

याचिकेत हिंदू विवाह कायदा, 1955 मधील कलम 5(4) आणि 5(5) तसेच विशेष विवाह कायदा, 1954 मधील कलम 4(ड) यांना आव्हान देण्यात आले आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार, निषिद्ध नातेसंबंधातील व्यक्तींमध्ये विवाह करता येत नाही; मात्र संबंधित समाजाची मान्य प्रथा किंवा परंपरा अशा विवाहाला परवानगी देत असेल, तर अपवाद लागू होऊ शकतो.

मुलांच्या आरोग्याला कोणते संभाव्य धोके?

याचिकेत वैद्यकीय संशोधनांचा हवाला देत जवळच्या रक्तसंबंधातील विवाहांमुळे मुलांमध्ये काही आनुवंशिक आजारांचा धोका वाढू शकतो, असे म्हटले आहे. अशा पालकांकडून मुलांना एकसारखी जनुकीय वैशिष्ट्ये मिळण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे काही अप्रभावी जनुकीय विकार व्यक्त होण्याचा धोका वाढू शकतो. जन्मजात व्यंग, ऐकण्यास किंवा पाहण्यासंबंधी अडचणी आणि विकासातील समस्या यांचा उल्लेखही याचिकेत आहे.

कायदा बदलणार की जनजागृतीवर भर?

अशा विवाहांचे नियमन करणे हा विधिमंडळाच्या अधिकारक्षेत्रातील विषय आहे. न्यायालय सरकारला कायदा करण्याचे निर्देश देत नाही; तर या विषयाकडे लक्ष वेधत आहे.सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने स्पष्ट हे स्पष्ट केले. शाळा-महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमातून तसेच विविध माध्यमांतून जनजागृती करण्याचा पर्यायही न्यायालयाने मांडला. याचिकेत विवाहापूर्वी जनुकीय समुपदेशन आणि ऐच्छिक तपासणीसारख्या उपायांचा विचार करण्याची मागणी करण्यात आली आहे. आता केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Add Zee News as a Preferred Source
TAGS:
india
Supreme court